english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
ई पुस्तके

ख्रिस्तविरोधकाची व्याख्या करणे

0 15
नावामागील अर्थ
“ख्रिस्तविरोधक” हा शब्द दोन ग्रीक घटकांपासून घेतला जातो : “विरोधक” म्हणजे विरोधी किंवा त्याच्याऐवजी आणि “ख्रिस्त” म्हणजे “अभिषिक्त जन”. म्हणून, ख्रिस्तविरोधक हा केवळ ख्रिस्ताचा विरोध करणारा केवळ व्यक्ती नाही, परंतु अधिक धोकादायकरित्या, एक व्यक्ती जो ख्रिस्ताच्या ऐवजी स्वतःला पाहू इच्छितो- एक नकली ख्रिस्त. ही दुहेरी ओळख –ख्रिस्ताचे अनुकरण करत असताना त्याचा विरोध करणे –हेच ते ख्रिस्तविरोधकाला अत्याधिक फसवे आणि धोकादायक बनवते.

प्रेषित योहान, तोच केवळ नावाने “ख्रिस्तविरोधक” ह्या शब्दाचा वापर करतो, त्याने लिहिले,

“मुलांनो, ही शेवटली घटका आहे, आणि ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे” (१ योहान २:१८).

येथे योहान अनेक ख्रिस्तविरोधक (खोटे शिक्षक, फसवणूक करणारे) आणि एक ख्रिस्तविरोधक, वैश्विक प्रभाव टाकणारा शेवटच्या काळातील एक व्यक्ती यांच्यामध्ये फरक करतो.

ही शेवटची घटका आहे.
ही हेलावून टाकणारी घोषणा-“ही शेवटली घटका आहे”- जी तातडीची आवश्यकता आहे हे सांगते. प्रेषित योहान प्रकटीकरणात्मक नाट्याचा वापर करत नाही; तो गजर वाजवत आहे. हे विधान शब्दशः ६० मिनिटांना संबोधत नाही परंतु देवाने उद्धार करण्याच्या समयाचा शेवटच्या टप्प्याचा कालावधी, याला पवित्र शास्त्रात नेहमी “शेवटले दिवंस” असे म्हटले आहे.

🔍पवित्र शास्त्राचा संदर्भ :
  • इब्री. १:२- “तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे.”
  • प्रेषित. २: १७- “देव म्हणतो, शेवटल्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.”
  • २ तीमथी ३: १- “शेवटल्या काळात कठीण दिवस येतील हे समजून घे.”
जरी आता जवळजवळ २००० वर्षे होऊन गेली आहेत. तथापि, भाविष्यात्मक वेळ ही मानवी कॅलेंडरनुसार मोजली जात नाही. २ पेत्र. ३: ८ नुसार, प्रभूला एक दिवस हा एक हजार वर्षांसारखा आहे. “शेवटली घटका” ही ख्रिस्ताचे स्वर्गारोहण आणि त्याचे दुसरे येणे यांच्यामधील वेळेच्या कालावधीबद्दल बोलते, जे फसवणूक, स्वधर्मत्याग आणि आध्यात्मिक संघर्षाने चिन्हित असेल.

तुम्ही तर हे ऐकले आहे की, ख्रिस्तविरोधक येणार आहे.
प्रेषित योहान शिष्यांना मिळालेल्या पूर्वीच्या शिकवणीचा संदर्भ देत आहे –“हे तुम्ही ऐकले आहे”-हे दाखवते की ख्रिस्तविरोधकाचा सिद्धांत प्रारंभीच्या मंडळीमध्ये नवीन किंवा महत्वाची कल्पना असा नव्हता. जरी “ख्रिस्तविरोधक” हा शब्द फक्त योहानाच्या पत्रांमध्येच आढळतो, तरी ही कल्पना पौलाच्या “पापपुरुष” (२ थेस्सलनिका २:३-४), दानीएलाचे “लहान शिंग” (दानीएल ७:८), आणि प्रकटीकरणातील “श्वापद” (प्रकटी. १३) मध्ये प्रतिध्वनित होतो.

“आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत”
हे विधान स्फोटक आहे. प्रेषित योहान प्रकट करतो की जेव्हा भविष्यात ख्रिस्तविरोधक येईल, तरी आधीच अनेक ख्रिस्तविरोधक कार्य करत आहेत, हे दर्शवते की ख्रिस्तविरोधकाचा आत्मा हा केवळ एक व्यक्ती नसून, युगांपासून वारंवार घडणारा नमुना आहे.
  
🔥पवित्र शास्त्रातील ह्या वचनांकडे पाहा :
  • १ योहान ४: ३, “आणि जो जो आत्मा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करत नाही, तो तो देवापासून नाही. हाच, ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे... .”
  • २ योहान १:७, “....देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.”
ख्रिस्तविरोधक ते आहेत जे ख्रिस्ताच्या खऱ्या तत्वांना विरोध करतात, विशेषकरून त्याचे देह धारण करणे, दैवत्व किंवा प्रभुत्वाचा नकार करतात. त्यामध्ये ह्या गोष्टींचा समावेश आहे :

१. खोटे शिक्षक दुसऱ्या कोणत्यातरी येशूचा प्रचार करतात (२ करिंथ. ११:४)
२. पंथ आणि तत्वज्ञान ख्रिस्ताचे दैवत्व आणि मानवतेचा नकार करतात.
३. विश्वासणाऱ्यांना सत्यापासून दूर नेणाऱ्या व्यवस्था.

🔥ऐतिहासिक उदाहरण : एरियस आणि एरियन पाखंडवाद
कालावधी : चौथ्या शतकाच्या सुरुवातीला
स्थान : आलेक्झांद्रिया आणि मिसर
 
🔍एरियस कोण होता?
एरियस हा आलेक्झान्द्रीयामध्ये एक ख्रिस्ती पाळक (वडील) होता जो खोटे ख्रिस्ती ज्ञान देण्यासाठी कुप्रसिद्ध झाला होता-त्यातील एक म्हणजे जे ख्रिस्ताच्या पूर्ण दैवी असण्याचा नकार करते. त्याच्या शिकवणींमुळे प्रारंभीच्या चर्च इतिहासात सर्वात महत्वाच्या संकटांपैकी एक निर्माण केले होते.

❌एरीयसने काय शिकवले?
एरीयसने शिकवले की :
  • येशू हा एक निर्मित जीव आहे –देव पित्यासारखा सार्वकालिक नाही.
  • अशी एक वेळ होती जेव्हा येशू अस्तित्वात नव्हता.
  • येशू हा सर्व निर्मित जीवांपेक्षा सर्वोच्च होता, परंतु स्वयं देव नव्हता.
हे सरळपणे योहान १:१ च्या विरोधात जाते, जे म्हणते :
“प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.”

एरीयसच्या तत्वज्ञानाने कमी प्रतिष्ठेच्या येशूवर विश्वास ठेवण्याकडे नेले –जो पित्यासह समान नव्हता आणि त्यामुळे पवित्र शास्त्रातून “दुसरा येशू” प्रकट केला गेला.

⚠️आजची प्रासंगिकता :
एरीयन तत्वज्ञानाचे आधुनिक प्रकार आजही अस्तित्वात आहेत –उदाहरणार्थ :
  • यहोवा विटनेस हा पंथ ख्रिस्ताच्या दैवत्वाचा नकार करतात, ते हा दावा करतात की तो प्रमुख देवदूत मीखाएल आहे. 
  • काही एकेश्वरवादी आणि उदारमतवादी ईश्वरविज्ञानी येशूला एक नैतिक गुरू किंवा संदेष्टा म्हणून सादर करतात, परंतु दैवी म्हणून नाही.
  • दमास्कसचा संत योहान (६७६-७४९ इसविसन), एक प्रारंभीचा ईश्वरविज्ञानी, हा दावा करतो की मुहम्मद हा एका एरीयन साधूमुळे प्रभावित झाला होता, संभवतः त्याचे नाव बहिरा होते, जो मुस्लीम परंपरेतील एक व्यक्ती होता. 
ही शिकवण ‘दुसऱ्या येशू”चा प्रचार करते.

ऐतिहासिक समज :
ज्ञानवादी हे वैचारिक धार्मिक लोकांचा गट होते जे प्रेषित योहानाच्या काळातील होते ज्यांनी ख्रिस्ती शब्दरचना आणि विधर्मी तत्वज्ञानाच्या धोकादायक मिश्रणाचा प्रचार केला. “ग्नोस्टिक” शब्द हा “ग्नोसीस” या शब्दापासून येतो, ज्याचा अर्थ ‘ज्ञान” आहे. ज्ञानवादी गुप्त आध्यात्मिक ज्ञान असल्याचा दावा करतात जो तारणासाठी आवश्यक आहे –ज्ञान जे सहसा पवित्र शास्त्रात प्रकट केले आहे किंवा प्रेषितांनी शिकवले आहे त्याहीपेक्षा वेगळे दिसते.

ज्ञानवादी, येशू खरेच देहात आला होता याचा नकार करतात (१ योहान ४:२-३). त्यांनी शिकवले की तो केवळ मानव असा दिसला –एक पाखंडवाद ज्यास डोसेटीझम म्हणतात. प्रेषित योहानाने अशा सिद्धांतांचे जोरदारपणे खंडन केले, हा इशारा देत की पाखंडवाद हे केवळ असहमती नाही- ही सैतानी फसवणूक आहे.

एक कुशल फसवणुक करणारा, फक्त फसवणूक नाही.
ख्रिस्तविरोधक हा केवळ एक नास्तिक किंवा ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा नाही. तो एक कुशल फसवणूक करणारा आहे, एक जो चमत्कारिक, मुत्सदीपणा आणि अलौकिक शक्तीच्या माध्यमातून प्रसिद्ध होईल. त्याचे ध्येय हे ख्रिस्ताच्या ऐवजी त्याची उपासना केली जावे असे असेल (प्रकटीकरण १३:४, ८). ही फसवणूक इतकी मोठी असेल की देवाच्या लोकांमधून देखील काही जण त्याचे अनुसरण करण्यास मोहात पडतील जर दैवी संयम नसेल तर (मत्तय.२४:२४). 

ज्याप्रमाणे शलमोनाने, शहाणपणात सुरुवात केलेली असतानाही, शांती आणि राजनीतिक संबंधासाठी त्याने शेवटी आध्यात्मिक तडजोड केली, ख्रिस्तविरोधक ही खोट्या शांतीसाठी तडजोड करेल, विशेषकरून अस्थिर मध्य पूर्वेत. जग “शलमोनासारख्या” व्यक्तीची इच्छा करेल जो यहूदी आणि मुस्लीम लोकांमध्ये शांती घडवून आणेल, आणि ही जागतिक प्रशंसा ख्रिस्तविरोधकाला   मसीहा विषयक नायक म्हणून स्थिर करेल.

पवित्र शास्त्रात त्याची अनेक नांवे 
ख्रिस्तविरोधक बायबलमध्ये अनेक संबंधांमध्ये दिसतो, प्रत्येकामध्ये त्याचे चरित्र आणि कार्यक्रमाची झलक दर्शवते :

जुन्या करारात ख्रिस्तविरोधकाची नांवे 
  • लहान शिंग : दानीएल ७:८ त्याला दहा राजांमधून आलेले शिंग म्हणून चित्रित करतो, ज्याला मनुष्यासारखे डोळे आहेत, आणि तोंड मोठ्या गोष्टी बोलते.
  • बाबेलचा राजा : स्तोत्र. १४०:१, १०-११, ही वचने ख्रिस्तविरोधकाच्या क्रूर स्वभावाला प्रदर्शित करतात –एक जो रक्तपात करणे, खोटे बोलणे आणि सापळा पसरवतो. त्याची हिंसा ही आध्यात्मिक आणि राजनीतिक आहे, ज्याचा उद्देश नीतिमत्तेचा नाश आणि सत्याला नष्ट करणे आहे. अराजकता आणि क्रूरतेचा खरा प्रतिनिधी.
  • प्रमुख अधिपती : यहेज्केल ३८च्या भविष्यवाणीमध्ये, “गोग ला रोष, मेशेख व तुबाल ह्यांचा अधिपती म्हटले आहे, हे सहसा ख्रिस्तविरोधकाच्या सैन्याच्या प्रभुत्वाची छाया आहे. तो एक भौगोलिक राजकीय नेता म्हणून उदयास येतो, जो राष्ट्रांना देवाच्या लोकांविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र आणतो –सैतानी कार्य करणारा असा एक कुशल हाताळणी करणारा.
  • अधिपती जो येईल : आणि बासष्ट आठवड्यानंतर मसीहाला कापून टाकण्यात येईल, परंतु स्वतःसाठी नाही; आणि लोकांचा अधिपती जो येणार आहे जो नगराचा आणि पवित्र स्थानाचा नाश करील. त्याचा शेवट पुराने होईल, आणि युद्ध संपेपर्यंत उजाडपणा निश्चित आहे. (दानीएल ९:२६)
  • हा अधिपती लोकांमधून उदयास येईल ज्याने दुसरे मंदिर (रोमन साम्राज्यातील)उध्वस्त केले होते, जो पुनरुज्जीवित रोमन साम्राज्याचे संकेत देईल (युरोप) किंवा हा अधिपती मुस्लीम राष्ट्रांमधून देखील उदयास येऊ शकतो. सर्वात निश्चित गोष्ट ही आहे की, हा अधिपती इस्राएलबरोबर फसवणुकीच्या करारास निश्चित करेल, केवळ ते मोडण्यासाठी-ज्यामुळे पुढे संकटे आणि अपवित्रता होईल.
  • इच्छाशक्तीचा राजा : मग राजा त्याच्या इच्छेनुसार करेल : तो स्वतःला इतर सर्व दैवतांपेक्षा उंच आणि मोठा करेल, आणि देवांच्या देवाबद्दल निंदाजनक गोष्टी बोलेल आणि क्रोध संपेपर्यंत समृद्ध होईल; कारण जे निश्चित केले गेले आहे ते पूर्ण केले जाईल. (दानीएल ११:३६)
  • स्वतःलाच उंच करणारा शासक जो सर्व दैवतांचा अस्वीकार करेल : त्याच्या पूर्वजांच्या वडिलांचा देखील. तो स्वतःला प्रत्येक दैवतांपेक्षा उंच करेल, निंदाजनक गोष्टी बोलेल, आणि तात्पुरता समृद्ध होईल. त्याची इच्छा हा नियम असेल, आणि त्याचा गर्व त्याचे इंधन असेल.
  • एक दुष्ट सल्लागार : “परमेश्वराविरुद्ध दुष्ट संकल्प करणारा व अनिष्ट योजनारा असा एक तुझ्यातून निघाला आहे.” (नहूम १:११)
  • तो नरकाच्या खड्ड्यातून त्याच्या योजनांना बनवेल-रणनीती म्हणजे राष्ट्रांचा नाश करावा आणि पुष्कळांना फसवावे. चमत्काराने युक्त असेल परंतु बंडखोरीने प्रेरित असेल, तो खोटे बोलतो जे राजांना भुरळ पाडते आणि न्याय करण्यास प्रेरणा देते.
  • गर्विष्ठ माणूस : वास्तवात, यासाठी की तो द्राक्षारसाने मस्त होऊन उल्लंघन करेल, तो एक गर्विष्ठ माणूस आहे आणि तो घरी राहत नाही. कारण तो त्याच्या इच्छांना नरकाएवढे मोठे करतो, आणि तो मृत्यूसारखा आहे, आणि त्याचे समाधान केले जाऊ शकत नाही. तो स्वतःकडे सर्व राष्ट्रांना एकत्र करतो आणि स्वतःसाठी सर्व लोकांना एकत्र करतो. (हबक्कूक २:५)
  • अतृप्त महत्वाकांक्षेने प्रेरित आहे, तो त्याच्या सत्तेला मृत्यूसारखे वाढवतो-कधीही समाधानी होत नाही. ही प्रतिमा लोभ, फसवणूक आणि उद्धटपणाला स्पष्ट करते. काळ्या छिद्राप्रमाणे, तो राष्ट्रांना आणि लोकांना गिळून टाकतो, आणि तरीही अधिक साठी भुकेला राहतो.

नवीन करारात ख्रिस्तविरोधकाची नांवे :
  • ओसाडीचा अमंगळ पदार्थ –जरी प्रत्यक्षात ते नाव नसले तरी, हा वाक्यांश दानीएलातून येतो आणि मत्तय २४:१५ मध्ये येशूने ज्याचा संदर्भ दिला आहे, जे या व्यक्तीशी जुळलेल्या अपवित्र कृत्याचे वर्णन करते.
  • विनाशाचा पुत्र : २ थेस्सलनीका. २:३, एक शीर्षक जे यहूदा इस्कर्योतसाठी देखील वापरले आहे जे विश्वासघात करण्याची गहन पातळी आणि भविष्यातील नाशाला सुचवते.
  • पापपुरुष /स्वैराचार - २ थेस्सलनीका. २:३, एका व्यक्तीचे वर्णन करते जो स्वतःला देव म्हटल्या जाणाऱ्या सर्वांपेक्षा उंच करतो.
  • श्वापद – प्रकटीकरण १३  त्याला सैतानाद्वारे शक्ती अधिकारप्राप्त केलेला म्हणून दर्शवतो, जो चिन्हे करतो आणि स्वतःची उपासना केली जावी अशी मागणी करतो.
प्रत्येक नाव त्याची राजकीय धूर्तता, धार्मिक निंदा आणि सैतानी पाठबळाच्या वेगवेगळ्या पैलूंना स्पष्ट करते.

एक नकली ख्रिस्त-जो सैतानाकडून अधिकारप्राप्त असलेला- ख्रिस्तविरोधकाचा उदय हा स्वाभाविक नसेल परंतु स्वयं सैतानाद्वारे अलौकिक शक्तीने प्रेरित असेल :
“पापपुरुषाचे येणे हे सैतानाच्या कृत्याने, सर्व शक्ती, चिन्हे आणि अद्भुतेनुसार असेल... .” (२ थेस्सलनीका. २:९)

ज्याप्रमाणे प्रभू येशूने स्वतः चमत्कार केले की त्याच्या सेवेला वैध ठरवावे, त्याप्रमाणेच ख्रिस्तविरोधक पुष्कळ लोकांना फसवण्यासाठी खोट्या चिन्हांचा वापर करेल. प्रकटीकरण १३:१३-१४ स्वर्गातून अग्नी बद्दल बोलते, आणि त्याच्या खोट्या दैवत्वाला वैध ठरवण्याच्या प्रयत्नात एलीयाची आणि ख्रिस्तासारख्या शक्तीची नक्कल करते.

शलमोन आणि ख्रिस्तविरोधकाची सावली
एका आकर्षक भविष्यसूचक समांतरात, शलमोनाची शेवटची वर्षे ख्रिस्तविरोधकाच्या फसवणुकीचे पूर्वचित्रण दर्शवते.

  • शलमोनाने सोन्याची वृद्धी केली –प्रतिवर्षी सहाशे सहासष्ट किक्कार (१ राजे १०:१४), हा आकडा सरळपणे श्वापदाशी जुळतो (प्रकटीकरण १३:१८).
  • त्याने विधर्मी दैवतांसाठी वेद्या बनवल्या, त्यांमध्ये एक दैवत मिलकोमचाही समावेश आहे, जे देवाप्रती निंदनीय असे होते (१ राजे ११:७).
  • त्याने परदेशी स्त्रियांशी विवाह केला आणि राजकीय संबंधांसाठी उपासनेमध्ये तडजोड केली –सत्याची किमत चुकवून शांती मिळवण्याचा प्रयत्न केला.
“त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले.” (१ राजे ११:४)

ख्रिस्तविरोधक ह्या पद्धतीचा पुन्हा वापर करेल. ख्रिस्तविरोधक हा एक यहूदी असू शकेल (लक्षात घ्या-मी म्हटले असू शकेल) जो त्यांच्या पूर्वजांच्या देवाला विसरला आहे, सहसा तो दुसऱ्या धर्माचा स्वीकार करेल (दानीएल ११:३७). शलमोनासारखे, तो शस्त्रांचा व्यापार करेल, संपत्तीचा गैरवापर आणि मूर्तीपूजेचे नमुने उभारिल, पण जागतिक स्तरावर.

शांतीचा खोटा अधिपती 
ख्रिस्तविरोधक हा प्रारंभी एक क्रूर अत्याचारी नव्हे, तर चमत्कार करणारा, शांतताप्रिय, उत्तम वक्ता म्हणून उदयास येईल. तो खऱ्या शांतीचा अधिपती, प्रभू येशू ख्रिस्ताविरोधात एक मोहक बनावटपणा सादर करेल. परंतु त्या मुखवट्यामागे विनाश, निंदा आणि देवाविरुद्ध अंतिम बंडखोरी असेल.

“कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रकट होईल.” (२ थेस्सलनीका. २:३)
ख्रिस्तविरोधकाला समजण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. फसवणूक अज्ञानामध्ये वाढते, परंतु सत्य पारख करण्यास साहाय्य करते. जसे हे ई-पुस्तक उघड करते, आपण ह्या शेवटल्या व्यक्तीचे उदयास येणे, राज्य करणे आणि विनाश होणे हे स्पष्ट समजणार आहोत –जेणेकरून तुमची फसवणूक होऊ नये, तर ख्रिस्तामध्ये मुळावलेले असावे.
Join our WhatsApp Channel
अध्याय
  • ख्रिस्तविरोधकाची व्याख्या करणे
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन