डेली मन्ना
22
13
205
तुमची कल्पना वापरा की तुमच्या वचनाला योग्य स्वरूप दयावे
Friday, 27th of June 2025
आज, मला तुमच्या कल्पने विषयी बोलावयाचे आहे. तुम्ही गोष्टींबद्दल दिवस रात्र विचार करीत राहतात. शब्द जे तुम्ही ऐकता ते तुमच्या कल्पने मध्ये चित्र निर्माण करतात.
दुर्दैवाने व देवाच्या वचनाच्या विरोधात अधिकतर लोक ज्यांस ते भितात किंवा त्यांच्या जीवनात काहीतरी वाईट होऊ शकते त्यासंबंधात विचार करीत असतात. वर्तमानपत्रे व माध्यमे केवळ बातम्यांचा भडिमार करीत त्यास पेटवित असतात जे नकारात्मक विचारांना बढावा देत असते.
तुमची कल्पना ही सामर्थ्यशाली साधन होऊ शकते की तुमचे अस्तव्यस्त जीवन पुन्हा निर्माण करावे. मी असे का म्हणत आहे? मला ते स्पष्ट करू दया. तुम्ही जे विचार करता, ते शब्दाला प्रेरित करते व ते शब्दामध्ये व्यक्त करते जे सर्व बाबतीत परिणाम करते ज्यामध्ये तुमचा विश्वास व शांति सुद्धा येते.
यशया २६:३ म्हणते, "ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्यास तूं पूर्ण शांति देतोस, कारण त्याचा भाव तुजवर असतो."
एके दिवशी परमेश्वराने अब्रामाला रात्रीचे उठविले व त्यास त्याच्या तंबू बाहेर नेले: "मग त्याने (परमेश्वराने) त्याला (अब्रामाला) बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले तुझी संतति अशीच होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला." (उत्पत्ति १५:५-६)
परमेश्वराला पाहिजे होते की अब्रामाला आशीर्वाद दयावा परंतु त्यास अब्रामाची कल्पना पाहिजे होती. अब्राम, ज्यास अजूनही मुलबाळ नव्हते, तरीही तो केवळ चेतनेने जगत होता, तो ही कल्पना करू शकत नव्हता की त्याचे वंशज हे पृथ्वीवरील वाळू सारखे होतील जसे देवाने म्हटले होते. म्हणून देवाला त्याच्या कल्पनेला आवाहन करावयाचे होते आणि हे करण्यासाठी त्याने त्यास बाहेर नेले, त्यास तारे दाखविले व त्यास ते मोजण्यास सांगितले.
जेव्हा अब्राम ताऱ्यांकडे पाहत होता, त्यास देवाची कल्पना कळली; त्या ताऱ्यांमध्ये तो त्याच्या लेकरांच्या चेहऱ्याची कल्पना करू शकत होता. बायबल घोषित करते की त्याने देवावर विश्वास ठेविला; त्यानंतर देवाने त्याचे नांव 'अब्राम' याचा अर्थ 'श्रेष्ठ पिता' पासून 'अब्राहाम' याचा अर्थ 'अनेकांचा पिता' असे बदलले. तुम्ही पाहा, परमेश्वर त्यास अब्राहाम बोलू शकत नव्हता जोपर्यंत त्याने विश्वास ठेविला नाही व जे त्याने म्हटले त्या दृष्टांतास त्याच्या अंत:करणात घेऊन चालला नाही.
परमेश्वराने त्याची पत्नी 'साराय' अर्थ 'वादग्रस्त' पासून 'सारा' अर्थ 'राजकुमारांची राणी किंवा राजकुमारांची माता' असे बदलले. परमेश्वराने असे केले जेणेकरून जे चित्र त्याने अब्राहामाच्या मनात ठेविले होते त्यास जिवंत ठेवावे.
तुमची कल्पना हे एक सामर्थ्यशाली साधन आहे ज्याचा तुम्ही उपयोग करू शकता की तुमचे जग हे बनवावे किंवा पुन्हा निर्माण करावे.
Bible Reading: Psalms 27-34
प्रार्थना
पित्या, मला माझी कल्पना तुझ्या वचनानुसार वापरण्यास साहाय्य कर म्हणजे त्याने माझ्या स्वतःच्या जीवनाला आकार दयावा. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● देवाने-दिलेले स्वप्न● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल
● शुद्धीकरणाचे तेल
● प्रार्थनेची निकड
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती
● एस्तेरचे रहस्य काय होते?
● उपासना: शांतीसाठी किल्ली
टिप्पण्या