“प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या [जाणीव घेत आणि दर्शवित] सहनशीलतेकडे लावो...” (२ थेस्सलनीकाकरांस ३:५)
जरी देव आमच्यावर पूर्णपणे प्रेम करतो, तरी हे प्रेम अनुभवण्यासाठी आम्हाला स्वत:स गुंतवून ठेवण्याची गरज आहे; ते स्वयंचलित नाही. जेव्हा आपला प्रभु येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता, अशी उदाहरणे होती की काही लोक त्याच्याकडून तो चांगुलपणा घेऊ शकले नाही तरी त्याने त्यांच्यावर प्रेम केले आणि त्यांना आशिर्वाद द्यावा अशी त्याची इच्छा होती (पाहा मार्क ६:१ - ६, मत्तय १३:५४ - ५८). समस्या त्याची नव्हती; त्यांनी त्याला कसे स्वीकारले त्यात ती होती.
त्याचप्रमाणे, देवाने आपले अफाट प्रेम जगाला दाखवून दिले आहे आणि आम्हास त्याचे सर्वोत्कृष्ट देण्यासाठी आपल्या पुत्राला आमच्या पापासाठी मरण्यास पाठवले, पुष्कळ लोकांना अजूनही ते स्वीकारायचे आहे किंवा या प्रेमाचा अनुभव घ्यावयाचा आहे. तथापि, हे प्रेम प्राप्त करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे ख्रिस्ताने जे केले यावर विश्वास ठेवणे आणि त्याला प्रभु म्हणून कबूल करणे आणि त्याद्वारे तारण प्राप्त करुन घेणे ही होय (रोम १०:९).
तरीही, देवाच्या प्रेमाचा अनुभव कधीही तारण प्राप्त करुन घेण्यापुरता मर्यादित नाही. देवाच्या प्रेमाचे आणखी बरेच परिमाण आहेत जे आम्हाला उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. रोम ८:३२ मध्ये आपल्याला ठळक मुद्दा सांगितला आहे: “ज्याने आपला स्वत:च्या पुत्रास राखून न ठेवता, त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही?” (रोम ८:३२, KJV). हे अतिशय सुंदर आहे!
आपण पापी असतानाचं देवाने आपल्यावर एवढे प्रेम केले की त्याने आमच्या पापासाठी आपल्या पुत्राला मरण्यास दिले, आता आपण त्याची मुले आहोत म्हणून कशाचीही आशा कमी बाळगू नये. पवित्र शास्त्राची दुसरी आवृत्ती या प्रमाणे सांगते: “जर देवाने आपल्यासाठी सर्व काही ठिक करण्यास संकोच केला नाही, आमच्या परिस्थितीचा स्वीकार करून आणि स्वतःच्या मुलाला पाठवून सर्वात वाईट स्थितीत तो स्वतःस प्रकट करतो, तर तो आमच्यासाठी आनंदाने आणि स्वेच्छेने काहीही करु शकणार नाही काय?” (रोम ८:३२ MSB). आपण खरोखर याबद्दल विचार केला तर, आपणास कळेल, असे काहीच नाही की देवाचे प्रेम आपल्यासाठी काहीही करु शकत नाही!
आपल्याला हे विचारात घेण्याची गरज आहे की त्याचे प्रेम आम्ही कसे स्वीकारावे. जर आम्ही त्याला वाव दिली तर तो कोणत्याही मर्यादेपर्यंत आमच्यासाठी जाण्यास तयार आहे. योहान १:१२ हे वचन आम्हाला स्पष्ट सांगते की परंतू जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला.
तर मग सतत देवाच्या प्रेमामध्ये टिकून राहण्यासाठी आपले मन मोकळे करा. जसे तुम्ही हे करता तसे तुम्हाला त्याच्या अद्भुत प्रेमाच्या वास्तविकतेचा अनुभव येईल. तुम्ही त्याच्या प्रेमात त्याच्या सहवासामध्ये, त्याचे वचन, प्रार्थना, उपासना आणि ख्रिस्ती लोकांच्या सहभागीता याद्वारे टिकून राहा. प्रत्येक क्षणी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला समर्पित करा.
प्रार्थना
हे स्वर्गीय पित्या, माझ्यावर एवढे प्रेम केले त्याबद्दल तुझे आभार. प्रत्येक परिस्थितीत तुझ्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी मला नेहमी ग्रहणशील होण्यास साहाय्य कर. येशुच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● असामान्य आत्मे● दिवस १८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● आदर आणि मूल्य
● उदारपणाचा सापळा
● तुमच्या अंत:करणाचे परिश्रमपूर्वक रक्षण करा
● दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दैवी व्यवस्था-१
टिप्पण्या