डेली मन्ना
तुमच्या परिवर्तनाला काय अडथळा करते ते समजा
Thursday, 7th of March 2024
33
18
739
Categories :
बदल
मागील वेळ काळानुसार, मी पाहिले आहे काही मुख्य घटक जे बदल विरोधात कार्य करतात. हे ते घटक आहेत जे लोकांना जीवनाचा आशीर्वाद अनुभविण्यापासून प्रतिरोध करतात. हे घटक फारच सूक्ष्म असू शकतात, तरीही वेळ काळानुसार, ते अनेकांना जीवनाच्या प्रवासात पुढच्या स्तरावर जाण्यापासून अडथळा करतात.
३. बंडखोरपणा
बंडखोरपणा म्हणतो मला बदलावयाचे नाही आहे.
मला ठाऊक आहे मला बदलण्याची गरज आहे परंतु मला बदलावयाचे नाही आहे.
पवित्र शास्त्रात, बंडखोरपणाची चेटूक च्या पाप शी तुलना केली आहे.
अवज्ञा जादूगिरीच्या पातकासामान आहे, आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन यासारखा आहे. (१ शमुवेल १५:२३)
शौल हा इस्राएल मध्ये एक सर्वात देखणा पुरुष होता. आणि तरीही ह्या सर्व गोष्टीचा विषय नव्हता. शौल बंडखोरपणा मध्ये गेला व त्याच्या अंतिम नियतीला गमाविले. दुसरे शौल होऊ नका. बंडखोरपणाचा उपाय करा व तुम्ही पाहाल ते बदल होत आहेत.
४. आळशीपणा
आळशीपणा म्हणतो मला बदलण्यास नको वाटते.
बदल मध्ये शिस्तबद्धतेची मागणी असते. आणि काही लोकांना वाटते की हे जास्त काम आहे की बदलावे. सरासरीपेक्षा वर उठण्यास ते तयार नाहीत. सर्वात मोठी फसवणूक ही तुम्हाला वाटते की तुम्ही चांगले करीत आहात.
नीतिसूत्रे ६:९-११ आळशी व्यक्ति विषयी वर्णन करते
अरे आळशा, तूं किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो,
आणखी थोडीशी डुलकी खालो, आणखी हात उराशी धरून निजतो.
असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य,
दरोडोखोराप्रमाणे, आणि गरिबी सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील.
५. अज्ञानता
अज्ञानता म्हणते, मी बदलण्यासाठी कधीही विचार केला नाही. अज्ञानता ही देवाला स्वीकारण्याजोगे कारण नाही.
टीप: लक्षात घ्या, जो सेवक त्याच्या स्वामीच्या इच्छेविषयी अज्ञानी होता त्यास शिक्षा सुद्धा झाली. त्यास सोडले नाही (लूक १२:४८). अज्ञानता हे निश्चितच देवाच्या राज्यात हर्ष नाही. अज्ञानता हे मुख्य कारण आहे की देवाचे अनेक लोक हे नाश पावत आहेत. (होशेय ४:६)
प्रार्थना
पित्या, मला आतूनबाहेरून वाढण्यास साहाय्य कर म्हणजे परिस्थिती माझ्या जीवनात तुझ्या उपस्थिती समोर नतमस्तक होवोत. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वैराचारास पूर्ण उपाय● वाईटपद्धतींनानष्ट करणे
● येशू एक बाळ म्हणून का आला
● तुमची प्रमाणता उंचवा
● दिवस ३९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● शेवटच्या समयाच्या चिन्हांची पारख करावी?
● लहान बियापासून ते उंच झाडांपर्यंत
टिप्पण्या