"आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू दया, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी." (याकोब १:४)
जीवनाच्या संकटांनी तुम्ही ओझ्यामध्ये आहात काय? तुम्ही कधी आश्चर्य केले आहे किंवा इच्छा केली आहे की परीक्षा व छळ ह्यांस मानवी अनुभवातून वेगळे केले गेले आहे? तुम्ही तुमच्या विश्वासाला प्रश्न करीत स्वतःला पाहिले आहे काय कारण असंख्य वादळे ज्यात तुम्ही स्वतःला पाहता आहात? तुमच्या जीवनासाठी देवाचे उद्देश पूर्ण करण्यामध्ये कठीण समयामुळे तुम्ही आत्म्याचे सामर्थ्य कमी पडत आहे असे पाहत आहात काय? धीर धरून राहा, ही सर्व विश्वासाची परीक्षा आहे!
अनेक युगांपासून, अनेक पुरुष ज्यांस परमेश्वरा द्वारे उपयोगात आणले गेले त्यांना संकटांच्या भट्टी मध्ये तयार केले व संपूर्णरित्या घडविले गेले. अब्राहाम-विश्वासाचा पिता-याने त्याच्या देवाबरोबरच्या चालण्यामध्ये अनेक परीक्षा व संकटांना तोंड दिले. प्रत्येक परीक्षा ह्या त्याची पीडा, त्याचे संघर्ष, त्याचा त्याग, त्याच्या प्रश्नांसह आल्या. अब्राहाम त्याची पत्नी सारे ला विचारीत आहे हे चित्र स्मरणात आणा- "आपल्याला ह्या सर्व परिस्थितीमधून का गेले पाहिजे?"
परमेश्वराने अब्राहामाला त्याच्या पित्याच्या घरातून एका अज्ञात प्रदेशाकडे जाण्यास सांगितल्यावर, मुल होण्याचे आश्वासन मिळण्यासाठी आणखी २५ वर्षे लागली. मोठा धक्काच! वादळा प्रमाणे, परमेश्वराची अब्राहामाकडे मागणी की त्या एकुलत्या एक मुला ला त्यास देऊन टाकावे याने त्याला मोठा धक्काच दिला. त्याविषयी विचार करा. तुम्हांला वाटते का, अब्राहामाने ह्या प्रक्रियेचा आनंद घेतला काय? नाही, त्यास आनंद झाला नाही परंतु परमेश्वरा मधील त्याचा विश्वास, संयम व भरंवसा यांस आकार देण्यात ते आवश्यक स्तर होते. प्रत्येक संकटे जी विश्वासाच्या पित्याकडे आली ती येणाऱ्या पीढी साठी देवाच्या आश्वासनास जन्म घेण्यासाठी अत्यंत आवश्यक होती.
संयम सहनशीलता ही जी तुम्हाला आता आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही देवाची इच्छा निरंतर पूर्ण करीत राहाल. तेव्हा मग तुम्ही ते सर्व जे त्याने आश्वासन दिले आहे ते प्राप्त कराल. (इब्री १०:३६)
सुखा अगोदर पीडे ची कल्पना हे जवळजवळ जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये परिचित संकल्पना आहे. असा विश्वास ठेवला जातो की जे काही अत्यंत योग्य असे असते त्याची वाट पाहण्याच्या प्रक्रीये मध्ये ज्या पीडा सामाविलेल्या आहेत याची पर्वा न करता वाट पाहणे अत्यंत योग्यच असले पाहिजे. एक आई बाळाला जन्म देण्याअगोदर अनेक प्रसूतवेदनांच्या पीडे मधून जात राहते. परंतु जेव्हा बाळाचा जन्म होतो, बाळ असण्याच्या आनंदात सर्व वेदना ह्या विरून जातात. देवाबरोबरच्या आपल्या चालण्यात तसेच लागू आहे. आपण प्रसूत वेदनांना सहन करतो, म्हणजे आपण आश्वासनांची वाट पाहू शकतो. (१ पेत्र १:९)
प्रियांनो, देवाबरोबरचे आपले चालणे हे विश्वासाने बळकट होते, आणि आपण आपल्या आश्वासनाच्या ठिकाणी संकटांवर विजय मिळविण्याद्वारे येऊ शकतो जे जीवन आपल्यापुढे ठेवते. आज तुम्ही ज्या संकटांचा सामना करीत आहात त्या कारणांमुळे शांति, आनंद, प्रीति, विपुलता, स्थिरता, विवाह, पुनर्स्थापना, चांगले आरोग्य, संपत्ति इत्यादी विषयी देवाच्या आश्वासनांवर शंका घेण्यास तुम्ही सुरुवात केली आहे काय? बायबल म्हणते की, प्रत्येक परीक्षा किंवा मोह हे आनंदा साठी कारण आहे! विचित्र असे वाटते? याकोब १:२-३ वाचा, "माझ्या बंधुंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड दयावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांस ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो", प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुगूट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल." (याकोब १:१२)
शेवटी, आजपासून, तुमच्या संकटात आनंद करण्यास शिका. हे चिन्ह आहे की तुम्ही तुमच्या विजयाच्या मार्गावर आहात. लक्षात ठेवा, संकटे नाही तर पुरस्कार नाही!
प्रार्थना
पित्या, माझ्या जीवनात विश्वास व संयमाच्या तुझ्या कार्या साठी मी तुझा धन्यवाद करतो. सर्व समयी तुझ्यावर भरंवसा करण्यास मला साहाय्य कर की मला पूर्ण सिद्ध असे केले जावे, कशातही उणे न राहता व तुझ्या आश्वासनास पात्र असे व्हावे. येशूच्या नांवात. आमेन
Join our WhatsApp Channel
Most Read
● दयाळूपणाचे मोल आहे.● दिवस ३५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● प्रार्थनेची निकड
● राजवाड्याच्या मागील माणूस
● दिवस २२:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● फसवणुकीच्या जगात सत्याची पारख करणे
● तुम्ही प्रभूचा प्रतिकार करीत आहात काय?
टिप्पण्या