english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. चांगले आर्थिक व्यवस्थापन
डेली मन्ना

चांगले आर्थिक व्यवस्थापन

Wednesday, 11th of September 2024
21 19 447
Categories : पैशाचे व्यवस्थापन
फंड (निधी) चे चांगले व्यवस्थापन हेसंपन्न जीवन जगण्यासाठी महत्वाचे आहे. शत्रूला ह्या सत्या विषयी खूप चांगले ठाऊक आहे आणि तो जितके शक्य होईल तितके लोकांना त्यांचे पैसे चुकीचे व्यवस्थापन करण्यात फसविण्याचा प्रयत्न करतो.

उत्पत्ति 41 मध्ये, आपण देवाचा मनुष्य योसेफ ला पाहतो, ज्यास स्वप्न आणि दृष्टांत स्पष्ट करण्याचे अविश्वसनीय दान आहे. जेव्हामिसरच्या फारो ला स्वप्न पडले तेव्हा त्याच्या सर्वोत्कृष्ट जादूगाराला ते स्पष्ट करता आले नाही, योसेफाला ते कार्य पूर्ण करण्यासाठी बोलाविण्यात आले.

नीतिसूत्रे 18:16 स्पष्टपणे आपल्याला सांगते की, "लाच मनुष्याचा मार्ग मोकळा करिते, व त्याला बडया पुरुष आणि स्त्रियासमोर नेते."हेच प्रत्यक्षात योसेफ च्या जीवनात घडले. एकाच दिवसात तो भिकारी कैदी पासून ते मिसर देशाचा प्रधानमंत्री असा झाला.

योसेफ कडे ज्ञानाचे अविश्वसनीय दान होते. त्यास प्रभावी ज्ञान होते कीसाधनसंपत्तीचे योग्य व्यवस्थापन करावे जेगंभीर दुष्काळास हाताळण्यास मोठया प्रमाणात प्रभावी ठरले जोमिसर देशात येणार होता.

मनोरंजकभाग हा होता कीसर्व राष्ट्रे ज्यात मिसर सुद्धा होते त्यां सर्वांनी सात वर्षे सुकाळ आणि सात वर्षे दुष्काळाचा अनुभव केला होता. मिसर आणि इतर राष्ट्रांमधील केवळ एकच फरक हा की व्यवस्थापन योजना जी मिसर कडे होती ती इतरांकडे नव्हती. जेव्हा दुष्काळ आला, सर्व राष्ट्रे जी मिसर भोवती होती ती मिसर च्या दारी मदतीसाठी रांगेत आले होते.

शत्रूला ठाऊक आहे की जर तुम्ही तुमचे आर्थिक व्यवस्थापन हे चांगले केले तर मग तुम्ही तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आणि उद्धेश हे पूर्ण कराल आणि म्हणून तो ज्या काही प्रत्येक कपटयोजना आहेत त्याचा उपयोग आणि प्रयत्न करेल की तुम्हाला ह्या बाबतीत गोंधळात टाकावे.

उदाहरणार्थ: चला असे म्हणू तुमचे वेतन प्रत्येक महिन्याला 30, 000/ रुपये आहे. तुमचा संपूर्ण खर्च हा जवळजवळ हा 27, 000/- इतका येतो. म्हणून तुमच्याकडे चांगली बचत 3, 000/- इतकी राहते.

एके दिवशी तुम्ही ह्या मॉल जवळून जाता आणि एक नवीन स्मार्टफोन पाहता. शत्रू मगतुम्हाला पटवू लागतो की तुम्हाला हा नवीन स्मार्टफोन घ्यायलाच पाहिजे (याची पर्वा करू नका की तुमच्याकडे अगोदरच एक नवीन स्मार्टफोन आहे). तो तुम्हाला ही वास्तविकता सुद्धा दाखवितो की तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुम्हीच केवळ एक आहात ज्याकडे नवीन स्मार्टफोन नाही आहे.

तुमचे क्रेडीट कार्ड स्वीप करण्याद्वारे तुम्ही ह्या जाळात सापडता. काही दिवसानंतर, प्रत्यक्षता तुमच्या चेहऱ्यावर एकटक पाहते आणि तुम्ही जाणता काय मोठी चूक तुम्ही केली आहे. तुम्ही तुमची शांति गमावू लागता. आता तुम्ही कर्जाच्या खड्ड्यात आहात. आता तुम्ही हे कर्ज भरण्यासाठी, उधार घेऊ लागता, खोटे बोलणे आणि फसवणूक करू लागता. आता तुम्ही लबाडीच्या चक्रात अडकता. तुमच्याकडे आता काही उरलेले नसते की देवाला सुद्धा दयावे.

येथे काही सिद्धांत आहे ज्याचे अनुकरण आपल्याला करावयाला पाहिजे

सुज्ञाच्या घरात मोलवानवस्तू व तेल यांचा साठा असतो, पण मूर्ख मनुष्य त्यांचा फन्ना उडवितो. (नीतिसूत्रे 21:20).

सरळ म्हटले तर, "ज्ञानी लोकांकडे पुष्कळ उरलेले राहते कारणते जे बनवितात ते सर्व खर्च करीत नाहीत. याउलट, अनेक लोक जे त्यांना मिळते ते सर्व खर्च करतात (आणि कदाचित त्याहीपेक्षा अधिक)"

सरळ सिद्धांत हा, कोणी त्याच्या वेतना पेक्षा कमी खर्च केले पाहिजे की आर्थिक प्रगती करावी. काही लोकं यात काही पर्वा नाही की किती पैसे येतात ते नेहमीच कर्जात असतात. हे ह्या कारणासाठी की ते त्यांच्या वेतना पेक्षा कमी खर्च करण्याच्या सिद्धांताची अवहेलना करतात. ज्ञानी व्हा आणि देवाच्या वचनाकडून सल्ला घ्या.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी मी तुला ज्ञान आणि समज मागतो. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -६
● आपल्या हृदयाचे प्रतिबिंब
● स्वप्न हे देवाकडून आहे हे कसे ओळखावे
● दिवस २० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● अंतिम क्षण जवळ येण्यास सुरुवात होते
● येशूचे नांव
● विश्वासाची शाळा
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन