english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. दानीएलाच्या उपासादरम्यान प्रार्थना
डेली मन्ना

दानीएलाच्या उपासादरम्यान प्रार्थना

Saturday, 27th of August 2022
30 17 1533
Categories : उपास व प्रार्थना
उपास हा स्वाभाविक मनाला कदाचित काही अर्थ देत नसेल परंतु अनुभवाने मला आणि माझ्यासारख्या इतर अनेक हजारो लोकांना शिकविले आहे की उपास हा अवश्य गोष्टींना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रथम बदलतो आणि मग स्वाभाविक क्षेत्रामध्ये.

शरीराला वधस्तंभी खिळा
अनेक जण कदाचित विचार करतील की उपास करणे हे सोपे आहे, आणि काही जण त्याची चेष्टा देखील करतील. याउलट, दानीएलाच्या उपासामध्ये येथे त्याग व अधिक शिस्तबद्धपणा समाविष्ट आहे. काही लोकांसाठी जेव्हा ते साखर, तळलेले अन्न आणि पेय सोडून देतात तेव्हा त्याची लालसा ही काही लोकांसाठी फारच कठीण असते. परंतु तुम्हीं जेव्हा पाहता, उपास हा शरीराला वधस्तंभी खिळणे हेच सर्व काही आहे म्हणजे आध्यात्मिक मनुष्य हा देवामध्ये उभारून यावा.
मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे" (मत्तय १६:२४).

अनेक ख्रिस्ती लोक सतत त्यांच्या देहासंबंधी आवाहनांना सामोरे जातात, ज्यामध्ये काय बरोबर आहे ते करणे, देवाचे ऐकणे व त्यावर भरवसा ठेवणे, आणि सहनशील राहावे, आणि आत्म्याच्या फळांमध्ये चालावे हे सर्व समाविष्ट आहे. ही आवाहने अनेक ख्रिस्ती लोकांना आत्म्यामध्ये चालण्यात कठीण असे करतात. प्रश्न हा आहे की हे युद्ध कसे कमी करावे, व स्वतःवर नियंत्रण करण्यास सुरुवात करावी, आणि त्यास अधिनतेमध्ये आणावे हेच काय आहे ज्याविषयी मला सतत विचारले जाते. उत्तर हे रोम. ८:१३-१४ मध्ये सापडते.

१३ कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहां; परंतु जर तुम्हीं आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. १४ कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. (रोम. ८:१३-१४)

सर्वात उत्तम मार्ग की शरीराच्या अधीन होऊ नये तो हा आहे की त्याच्या लालसाच्या अधीन होऊ नये. दानीएलाच्या उपासाचे हे मर्म आहे. जर तुम्ही आध्यात्मिक मनुष्याचे पोषण करीत असताना देहाच्या लालसांना वंचित ठेवता, तेव्हा आध्यात्मिक मनुष्य देहावर विजय मिळवू लागेल. आध्यात्मिक मनुष्याचे तुम्ही पोषण करू शकता त्याचा एक मार्ग हा वचन वाचणे व त्यावर मनन करणे व प्रार्थना करण्याद्वारे आहे.

देवाचे वचन वाचणे व त्यावर मनन करणे
दानीएलाच्या हया उपासादरम्यान, तुम्ही जितके वचन वाचू शकता तितके वाचा. बातम्या वाचण्याऐवजी, जाणीवपूर्वक निवड करा की त्याऐवजी देवाचे वचन वाचावे. नाट्यमय परिणाम जे पुढे येतील त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ते ज्यांस ध्येयाची आवड आहे, मी त्यांच्यासाठी सल्ला देत आहे की उपासादरम्यान बायबलचे कमीत कमी सात अध्याय वाचा.

तुमच्या उपासादरम्यान जितके शक्य होईल तितके टेलीव्हिजन पाहणे टाळा आणि देवाचे वचन वाचणे व त्यावर मनन करण्यात तो वेळ घालवा किंवा सुवार्ता संदेश ऐकण्यात तो वेळ घालवा. (वर्गवारीनुसार संदेशाच्या यादीसाठी नोहा ऐप वर तुम्ही नोहा ट्यूबवर तुम्ही भेट देऊ शकता)

प्रार्थना
ह्या फर्मानावर सही झाली आहे असे दानीएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघडया होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. (दानीएल ६:१०)

पारस साम्राज्यामध्ये दानीएल हा सरकारी अधिकारी होता, आणि त्यामुळे, दररोज अनेक तणावपूर्ण समस्यांना तोंड दयावे लागत असे. तथापि, तरीही त्याने प्रार्थनेसाठी वेळ ठेवला होता. हृद्य व मनासाठी दानीएल काय हे अद्भुत उदाहरण आपल्याला देत आहे जे पूर्णपणे देवावर स्थिर केलेले आहे!

त्याने सकाळी, दुपारी व संध्याकाळी प्रार्थना केली (आपण आपल्या परिस्थितीमध्ये ते रात्रीसाठी पालन करू शकतो). तुमच्या दिवसाची सुरुवात का नाही प्रार्थना व उपासनेद्वारे करावी? दुपार दरम्यान, तुमचे भोजन झाल्यावर (जरी तुम्ही कामावर आहात), एकाकी जा व प्रभूबरोबर काही वेळ घालवा. रात्री झोपण्यास जाण्यापूर्वी, तुमच्यासाठी त्याने ज्या सर्व गोष्टी केल्या आहेत त्यासाठी प्रभूला धन्यवाद देण्यास व उपासना करण्यात काही वेळ घालवा. मी यास दानीएलाच्या प्रार्थनेची लय असे म्हणतो. मी विश्वास ठेवतो की तुम्हीं जेव्हा प्रार्थनेची ही लय पाळता, तेव्हा त्यास तुमच्या समर्पणामध्ये ते एक मोठा फरक करेल. तुमच्या परिस्थितीमध्ये चमत्कार हे होऊ लागतील.

शेवटी, मला तुम्हांला केवळ हा इशारा द्यावयाचा आहे की आपल्या खाण्याच्या सवयीस रोख लावणे किंवा बदलणे हे चांगले आहे परंतु उपास हा प्रामुख्याने आपल्या आध्यात्मिक जीवनाविषयी आहे. उपासाच्या आध्यात्मिक पैलूंवर विचार न करता, हा केवळ एक आहार आहे. म्हणून प्रार्थना, वचन व उपासनेकडे दुर्लक्ष करू नका.

प्रार्थना
तरी हे परमेश्वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस; तू माझे गौरव आहेस, तू माझे डोके वर करणारा आहेस. माझी वर्तमान स्थिती, अवस्था व स्तरावरून मला एका उत्तम व उच्च स्तरावर येशूच्या नावात वर उचल. आमेन.


Join our WhatsApp Channel


Most Read
● इतरांसाठी प्रार्थना करणे
● आत्मसमर्पणात स्वातंत्र्य
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● तुमच्या भूतकाळाला तुमच्या भविष्यास नाव ठेवू देऊ नका
● भविष्यात्मक मध्यस्थी
● तयारी नसलेल्या जगात तयारी
● बेखमीर अंत:करण
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन