english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. महान पुरुष आणि स्त्रिया का पतन पावतात - ६ (आपल्या विचारांना बंदी बनवने)
डेली मन्ना

महान पुरुष आणि स्त्रिया का पतन पावतात - ६ (आपल्या विचारांना बंदी बनवने)

Tuesday, 23rd of February 2021
20 16 1500
Categories : जीवनाचे धडे मन विचार सुटका
आपल्या या मालिकेतीला हा शेवटचा हप्ता आहे “महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात”. 

दावीदाच्या जीवनातून,आपण हे स्पष्टपणे पाहू शकतो की आपण आपल्या  मनात जे आणतो त्याचा आपल्या विचारांवर परिणाम होतो. मग चुकीच्या विचारांमुळे चुकीच्या भावना निर्माण होतात आणि लवकरच आम्ही त्या भावनेचा प्रभाव आपल्यावर पडू देतो. त्यानंतर आपण आपल्या भावनांना उद्युक्त करतो - आपण स्वैर होतो. आणि लवकरच आपलं आयुष्य वेगळीकडे ओढल्या जाते!

नीतिसुत्रे २३:७ आम्हाला असे सांगते की आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे: “कारण ज्याप्रमाणे [मनुष्य] मनात विचार करतो, तसाच तो आहे.”

प्रभु येशूने स्पष्टपणे सांगितले की अशुद्ध (वाईट) विचार एखाद्या व्यक्तीला अशुद्ध करतात.

कारण अंत:करणातून दुष्ट कल्पना  खून, व्यभिचार, जारकर्मे, चोरी, खोट्या साक्षी, शिवीगाळ ही  निघतात. या गोष्टी माणसाला अशुद्ध करतात .. (मत्तय १५:१९-२०) म्हणून आपण आपले विचारपूर्वक जीवन जगण्यासाठी योग्य मूल्यमापन करणे अत्यंत आवश्यक आहे.

 
यामुळे आपल्याला हा प्रश्न पडतो, "ख्रिस्ताने आपल्याला दिलेल्या अभिवचनात आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दररोज चालण्यासाठी आपण कोणती पावले उचलण्याची गरज आहे?"

[जरी आपण] युक्तिवादाच्या, सिद्धांतांच्या आणि तर्कांच्या आणि प्रत्येक गर्व व उन्मतपणा जो देवाच्या [खऱ्या] ज्ञानाविरूद्ध आहे त्या गोष्टींचे खंडन करतो; आणि आम्ही प्रत्येक विचार व हेतू यांना कैद करून ख्रिस्ताच्या आज्ञापालनाकडे नेतो (मसीहा, अभिषिक्त) (२ करिंथकरांस पत्र १०:५ विस्तारित)

आपले विचार कैद करणे  म्हणजे आपण स्वतःबद्दल आणि आयुष्याबद्दल काय विचार करतो यावर नियंत्रण मिळविणे होय. आपण चालत असलेल्या विश्वासाच्या मार्गावर स्वातंत्र्य आणि विजय राखण्यास हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

जरी विचार पाहिले जाऊ शकत नाहीत, तोलले, किंवा मोजले जाऊ शकत नाहीत, तरी ते वास्तविक आणि सामर्थ्यवान आहेत. अशुद्ध विचारांवर विजय मिळविण्यासाठी मला काही आत्मा-नेतृत्त्वाची रणनीति सामायिक करण्याची परवानगी द्या.

१. केवळ आपले वर्तन बदलले नाही, तर आपले विचार बदलले पाहिजे.

आपले जीवन नेहमी आपल्या सर्वात प्रबळ विचारांच्या दिशेने जाईल. देव आम्हाला त्याचा सन्मान न करणाऱ्या पापी  वर्तनाला  बदलण्यासाठी पाचारण करतो. तसे घडण्यासाठी, आपण आपल्या मनाला शिस्त लावण्याचे कार्य केले पाहिजे ज्यावरून ही वर्तने दिसून येतात.

आपल्या मनाच्या नूतनीकरणाद्वारे देवाला आपले रूपांतर करु द्या आपण आपल्या मनाचे नूतनीकरण कसे करावे? आपल्या संस्कृतीत इतके सुसंगत होऊ नका की आपण त्यात विचार न करता सामावून जावू.

त्याऐवजी, देवाकडे आपले लक्ष केंद्रित करा. तुम्ही आंतरिक आणि बाह्यरीतीने बदलले जाल. त्याला आपल्याकडून काय हवे आहे हे सहजपणे ओळखा आणि त्वरित त्यास प्रतिसाद द्या. (रोमकरांस पत्र १२:२ एम.एस. जी) देवाच्या वचनाशी सुसंगत नसणाऱ्या विचारांचे मनोरंजन करण्यास नकार द्या. देवाच्या वचनाच्या विरुद्ध असलेल्या विचारसरणीस जाणीवपूर्वक नकार द्या.

२.तुमच्या विचारांपेक्षा मोठ्याने बोला

प्रत्येक विचारांचा आवाज असतो. सुरुवातीच्या काळात, विचारांचा हळू आवाज येऊ शकतो, परंतु आपण हे विचार ऐकत असता ते अधिकच जोरात आणि जोरात होत जातात..

प्रेषित पौल लिहितो: “ख्रिस्ताचे आज्ञापालन करण्यास  प्रत्येक विचार बंधीस्त करा” (रोमकरांस पत्र १२:२१) असे करण्याचा एक मार्ग म्हणजे आपण आपल्या मनात जे वाईट विचार ऐकत आहोत त्याऐवजी देवाच्या वचनाचा स्विकार करा. 

उदाहरणार्थ, एक वाईट विचार म्हणतो, “तू लवकरच प्रत्येकाप्रमाणे आजारी पडणार आहेस”.

हे मोठ्याने म्हणा, “माझे शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, म्हणून माझ्या शरीराला कोणताही आजार स्पर्श करणार नाही.

 येशूच्या नावात. मी आयुष्यभर निरोगी राहीन.” पुन्हा विचार आला तर पुन्हा म्हणा. आपल्या अक्षम विचारांचा सामना करा. निष्क्रीय होऊ नका. प्रत्येक वेळी जेव्हा  विचार मनात येतात तेव्हा त्यांना बंधीस्त करण्यास काही कार्य करावे लागतील. पण परमेश्वर नक्कीच तुम्हाला मदत करील.

३. केंद्रित विचार

आपले विचार योग्य गोष्टींवर केंद्रित करण्याचे निवडा. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते, “आणि आता, प्रिय बंधूनो आणि बहीणींनो, आणि एक शेवटची गोष्टी. जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुध्द, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय. जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा.” (फिलिप्पैकरांस पत्र ४:८ एन.एल.टी) जेव्हा आपण जाणीवपूर्वक या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करतो, तेव्हा देव आपल्याला शांती देण्याचे अभिवचन देतो.

मार्गदर्शनाचे वचन; स्वत: वर संयम ठेवा. आपण आपल्या विचारांची पद्धत बदलत असताना स्वतःबद्दल  कठोर आणि टीकात्मक असू नका, जर तुम्ही तुटलेल्या खोट्या शरणस्थानाचा विचार करण्यास सुरवात केली, तर तुम्हाला त्याबद्दल माहिती होताच पश्चात्ताप करा.

चला पश्चात्तापाला आपली जीवनशैली बनवू या म्हणजे कशालाही मुळ धरण्यास संधी मिळत नाही. आपल्या स्वातंत्र्यात पुढे चालत राहा. तुम्ही विचार करण्याचे नवीन मार्ग शिकत असताना अधीर होऊ नका.
प्रार्थना
चिंता आणि नैराश्य जे मला ग्रासून टाकावयास पाहत आहे,   येशूच्या नावाने निघून जा.

देवाची शांती जी सर्व ज्ञानापेक्षा पुढे आहे, ती ख्रिस्त येशूमध्ये माझे हृदय व मनाचे रक्षण करीत आहे.

Join our WhatsApp Channel


Most Read
● सात-पदरी आशीर्वाद
● विश्वासात किंवा भयात
● तुमच्या नवीन वाटचालीस प्राप्त करा
● वचनामध्ये ज्ञान
● नरक हे खरे स्थान आहे
● बुद्धिमान व्हा
● नीतिमान रागास स्वीकारणे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन