english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. त्वरित आज्ञापालनाचे सामर्थ्य
डेली मन्ना

त्वरित आज्ञापालनाचे सामर्थ्य

Tuesday, 30th of April 2024
21 16 638
Categories : आज्ञाधारकपणा
जीवनाची आव्हाने आणि अनिश्चिततेच्या मध्ये, देवाची वाणी ओळखणे आणि त्याचे अनुसरण करणे हे कठीण होऊ शकते. आपण आपल्या स्वतःला त्या परिस्थितीत पाहू शकतो जे त्याच्या अभिवचनाच्या विरोधात आहे असे दिसते, ते आपल्याला प्रश्न विचारते की आपण खरेच त्याची वाणी ऐकली काय? तथापि, उत्पत्ती २६ मधील इसहाकाची कथा आज्ञापालनाच्या महत्वाबद्दल आपल्याला सामर्थ्यशाली धडा शिकवते, जरी आपल्या मर्यादित दृष्टीकोनातून त्याचा आपल्याला काही अर्थ लागत नसेल.

दुष्काळादरम्यान, इसहाकाने एका महत्वपूर्ण निर्णयाचा सामना केला. तर्कपुर्ण निर्णय हा मिसर देशाला जावे असा होता, जेथे मुबलक अन्न आणि स्त्रोत होते. तथापि, देवाने त्याला गरार येथेच थांबण्यास सांगितले आणि इसहाकाचे पिता, अब्राहामाला दिलेल्या अभिवचनाशी दृढ राहावे. उघड त्रास आणि अनिश्चितता दिसत असतानाही, इसहाकाने देवाची आज्ञा पाळण्याचा निर्णय केला.

देवाची आज्ञा पाळणे हे आव्हानात्मक होऊ शकते, विशेषतः जेव्हा त्याची सूचना आपल्या स्वाभाविक वृत्ती किंवा जगाच्या ज्ञानाच्या विरोधात जाताना दिसत असते. जसे यशया संदेष्टा आपल्याला आठवण देतो, “कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत” (यशया ५५:८-९).

जेव्हा आपण देवाचे उच्च विचार आणि मार्गांवर विश्वास ठेवतो, जेव्हा ते समजणे कठीण दिसत असले तरी, तेव्हा आपण आपल्या स्वतःला त्याचा आशीर्वाद आणि पुरवठा प्राप्त करण्याच्या स्थितीत आणतो. दुष्काळाच्या मध्ये इसहाकाच्या आज्ञापालनाला शंभर पट पिकाने आणि देवाच्या आशीर्वादाने  पुरस्कृत करण्यात आले (उत्पत्ती २६:१२). देवाने त्याच्या विश्वासाचा आणि वचनबद्धतेचा आदर केला, हे दर्शवले की आज्ञापालन दैवी कृपा आणि विपुलतेसाठी द्वार उघडते.

त्याचप्रमाणे, काना येथील लग्नाच्या मेजवानी येथे, येशूने जे काही सांगितले तसे करण्यासाठी मरीयेने  त्यांना सूचना दिली, रांजण पाण्याने भरण्याची त्याची आज्ञा ही द्राक्षारसाच्या तुटवड्यासंबंधी असामान्य आणि असंबंधित वाटत होती (योहान २:५). सेवकांचे त्वरित आज्ञापालन हे महत्वाचे होते, जर कोणताही उशीर केला असता तर गोंधळ, निराशा आणि उत्सवास बिघडू शकला असता. त्वरित कृतीने येशूला त्याचा पहिला चमत्कार करू दिला, पाण्याला उत्कृष्ट द्राक्षारसामध्ये बदलणे आणि त्याचे गौरव प्रकट करणे.
जर सेवकांनी दिरंगाई केली असती किंवा येशूच्या सूचनेला प्रश्न केला असता, तर त्याच्या सामर्थ्याच्या ह्या असामान्य प्रदर्शनाचे साक्षीदार आणि सहभागी होण्याची संधी ते गमावू शकले असते. लग्नाच्या मेजवानीला द्राक्षारसाच्या तुटवड्याने मात केली असती, ज्यामुळे वधू, वर आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास झाला असता. तथापि, उत्सव वाढला कारण सेवकांनी त्वरित आज्ञापालन केले, आणि देवाची तरतूद विपुल प्रमाणात दिसून आली.

शिकवण येथे स्पष्ट आहे : आज्ञापालनाला उशीर करणे हे अवज्ञा करणे आहे. जेव्हा आपण देवाच्या वचनाचे पालन करण्यास संकोच करतो किंवा त्याच्या सूचनांचे पालन करत नाहीत, तेव्हा त्याने आपल्यासाठी ठेवलेल्या त्याच्या आशीर्वादाला प्राप्त करण्यात आपण चुकतो. विलंबामुळे संधी गमावणे, अनावश्यक संघर्ष आणि दीर्घकाळापर्यंत त्रास होऊ शकतो.
माझ्या स्वतःच्या जीवनात, व्यवहारिक अनुभवातून त्वरित आज्ञापालनाच्या महत्वाला मी शिकलो. अशा वेळ आल्या होत्या, जेव्हा देव माझ्याबरोबर बोलला, मला आग्रह करत होता की एक विशेष कृती करावी किंवा एखादा निर्णय करावा. ज्याक्षणी मी विलंब लावला किंवा त्याच्या मार्गदर्शनाचा दुसरा अंदाज लावला तेव्हा मला अनेकदा अतिरिक्त आव्हाने आणि मनातील वेदनांना तोंड द्यावे लागले जे टाळता येऊ शकले असते जर मी सरळपणे त्वरित आज्ञा पाळली असती.

एक असा प्रसंग माझ्या मनात येतो जेव्हा माझ्या एका संघर्ष करणाऱ्या मित्राकडे प्रोत्साहनपर शब्दाने जावे असे देवाने मला स्पष्टपणे सांगितले होते. मला माहित होते, या हळुवार बोलण्यावर मला कार्य करणे आवश्यक होते, परंतु मी माझ्या व्यस्त कार्यक्रमात अडकलो होतो. मग नंतर, शेवटी जेव्हा मी त्याला फोन केला, तेव्हा माझा मित्र अगोदरच निराशेच्या खोल अवस्थेत घसरलेला होता आणि माझ्या प्रोत्साहनाचा प्रभाव कमी झाला होता. जर मी त्वरित आज्ञापालन केले असते, तर देवाची प्रीती आणि साहाय्याचा योग्य वेळेवर आणि प्रभावी पात्र मी होऊ शकलो असतो. मी देवाचे आभार मानतो तो आता व्यवस्थित आहे.

त्वरित आज्ञापालन हे देवावरील आपल्या विश्वासाचे आणि त्याच्या सिद्ध इच्छेच्या अधीन होण्याच्या आपल्या तयारीचे चिन्ह आहे. त्याचा चांगुलपणा, ज्ञान आणि विश्वासूपणात आपल्या विश्वासाला ते प्रदर्शित करते, जरी जेव्हा पुढील मार्ग अनिश्चित किंवा आव्हानात्मक दिसत असतो. जेव्हा आपण तसे हृदय जोपासू लागतो जे त्वरित आज्ञापालन करील, तेव्हा आपण आपल्या स्वतःला देवाच्या उद्देशाबरोबर समरूप करत असतो आणि आपल्या जीवनासाठी त्याच्या उत्तमतेचा अनुभव करण्यासाठी आपल्या स्वतःला योग्य स्थितीत आणत असतो.
प्रार्थना
पित्या, मला ते अंत:करण दे जे त्वरित तुझे आज्ञापालन करते व तुझ्या वचनाप्रति ते सौम्य आहे, कारण आज्ञापालन हे अर्पणा पेक्षा उत्तम आहे. येशूच्या नांवात. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● काहीही लपलेले नाही
● प्रीति साठी शोध
● अन्य  भाषेत बोला व प्रगती करा
● भिन्नता ही स्पष्ट आहे
● विचारांच्या प्रवाहाला दिशा देणे
● ४०वा दिवस: उपास आणि प्रार्थनेचे ४० दिवस
● विश्वास जो जय मिळवितो
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन