डेली मन्ना
प्रभू येशू : शांतीचा स्त्रोत
Friday, 18th of October 2024
23
17
301
Categories :
मानसिक आरोग्य
“मी आपली शांती तुम्हाला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.” योहान 14:27
जीवनाची गोंधळ आणि आव्हानांच्यामध्ये-शांतीचा शोध हा अनेकदा न संपणारा प्रवास असा वाटतो. आपण विविध ठिकाणी त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो-सुट्टी, यश, नातेसंबंध आणि वित्तीय स्थिरता-केवळ हे जाणून घेण्यासाठी की हे बाह्य स्त्रोत आपल्या अंत:करणाच्या तळमळीला कधीही संतुष्ट करू शकत नाहीत. परंतु शांती हे अंतिम ठिकाण, प्राप्ती, किंवा काहीतरी जे विकत घेऊ शकतो तसे नाही. खरी शांती ही एका व्यक्तीमध्ये प्राप्त होते : प्रभू येशू ख्रिस्त.
शांती जी प्रभू येशू प्रदान करतो ती जे जग काही देऊ शकते त्यापेक्षा वेगळी आहे. त्याची शांती तात्पुरती नाही किंवा जे काही आपल्या सभोवती घडत आहे त्यावरही ती अवलंबून नाही. ही ती शांती आहे जी कठीण वादळांच्या मध्ये देखील आपल्यासोबत राहते, कारण ती त्याची सार्वकालिक उपस्थिती आणि प्रीतीत रुजलेली आहे.
माझी एक प्रार्थना सभा संपविल्यावर, एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि म्हणाला तो एक महिन्यासाठी एका डोंगरावर जाणार आहे, त्याची नोकरी आणि इतर जबाबदाऱ्यांचा त्याग करून शांतीचा शोध घेणार आहे. आपल्यापैकी अनेक जण याशी संबंधित असू शकतात- हा विश्वास ठेवून की शांती ही दृश्य बदलल्यामुळे, एका नवीन अनुभवामुळे, किंवा काही बाह्य घटनांमुळे येऊ शकते. मग ते आराम करणारी सुट्टी, एक उत्तम नोकरी, किंवा एक नवीन नातेसंबंध काहीही असो, आपण नेहमी विचार करतो, “जर मी केवळ हे प्राप्त करू शकलो, किंवा या ठिकाणी पोहचू शकलो, तर मला शेवटी शांती मिळेल.” परंतु वेळोवेळी, आपल्याला आढळते की ह्या गोष्टी केवळ क्षणिक आराम देतात.
सत्य हे आहे की शांती ही एखाद्या ठिकाणाशी किंवा कोणत्याही संसाधनांना प्राप्त करण्याशी संबंधित नाही. योहान 14:27 मध्ये प्रभू येशू म्हणतो, “मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हाला देतो.” ही ती शांती नाही जी आपण प्राप्त करू शकतो किंवा आपल्या स्वतःहून मिळवू शकतो. ते येशूकडून दान आहे, एक जे तो सर्वांना देतो जे त्याच्यावर भरवसा ठेवतात. त्याची शांती एकमेव आहे कारण ती बाह्य परिस्थितींकडून येत नाही. त्याऐवजी, ते गहन नातेसंबंधातून प्रवाहित होते जे आपले त्याच्याबरोबर आहे. जेव्हा आपण येशूवर लक्ष देतो, तेव्हा आपली अंत:करणे विसावा प्राप्त करू शकतात, मग आपल्या सभोवती काय घडत आहे याची पर्वा नाही.
येशूच्या शांतीचा अर्थ संकटांची अनुपस्थिती नाही. अनेक वेळा, आपण विचार करतो की जेव्हा आपल्या सर्व समस्या सुटतात तेव्हा शांती येते. परंतु येशूने आपल्याला संकटापासून मुक्त जीवनाचे अभिवचन कधीही दिलेले नाही. वास्तवात, त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले की त्यांना ह्या जगात संकटांचा सामना करावा लागेल (योहान 16:33). शांती जी येशू देतो ते वादळांपासून सुटण्याबद्दल नाही, परंतु वादळांच्या मध्ये देखील शांत आणि स्थिर राहण्याची क्षमता आहे.
मार्क 4:39मधील वादळास येशूने शांत केले त्या क्षणाबद्दल विचार करा. वारा आणि लाटा जेव्हा शिष्यांच्याभोवती उसळत होत्या तेव्हा शिष्य भयंकर घाबरले होते. परंतु येशू उभा राहिला आणि वादळास बोलला आणि लगेचच शांतता आणली. तोच येशू, एकमेव ज्याला वारा आणि लाटांवर अधिकार आहे त्याची शांती आपल्याला देतो. ही त्या प्रकारची शांती आहे जी जीवन भारावून टाकणारी आहे असे वाटत असले तरी आपल्याला स्थिर राहू देते कारण आपल्याला ठाऊक आहे की तो नियंत्रण ठेवून आहे.
जग हे कदाचित तात्पुरती शांती देऊ शकते, परंतु येशूची शांती कायमची आहे. जगाची शांती अटींसह येते-गोष्टी चांगल्या होत आहेत, आरामदायक वाटत आहे, किंवा आपल्याला जे सर्वकाही पाहिजे ते मिळणे यावर अवलंबून असते. परंतु येशूची शांती ह्या परिस्थितीच्याही पलीकडे जाते. ते आपली अंत:करणे आणि मनाला राखते, जसे फिलिप्पै. 4:7 आपल्याला स्मरण देते, आणि आपल्या सभोवती सर्वकाही अनिश्चित असतानाही आपल्याला भितीवाचून जगू देते.
मनन करण्यासाठी काही क्षण विचार करा जेथे तुम्ही येशू व्यतिरिक्त शांतीचा शोध घेत होता. तुमच्या परिस्थितीतील बदलामुळे तुम्हाला हवी असलेली विश्रांती मिळेल हा विश्वास ठेवून बाह्य परिस्थितींमध्ये तुम्ही शांतीचा शोध घेत होता काय? जर तसे आहे तर मग तुमचे अंत:करण पुनः येशूकडे वळवा, जो खऱ्या शांतीचा स्त्रोत आहे. योहान 14:27वर मनन करा आणि हे लक्षात ठेवा की त्याची शांती आता सध्या तुमच्यासाठी उपलब्ध आहे, मग तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात त्याची पर्वा नाही.
त्याच्या उपस्थितीत शांत वेळ व्यतीत करण्याने सुरुवात करा, त्याच्या शांतीने तुमची अंत:करणे भरण्यासाठी त्याला विनंती करा. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत त्या सोडून द्या-मग त्या वित्तीय चिंता, आरोग्याची काळजी किंवा नातेसंबंधाचा संघर्ष काहीही असोत-आणि त्यांना त्याच्या हातात ठेवा. जेव्हा तुम्ही हे करता, तेव्हा त्याची शांती तुमचे अंत:करण व मनाचे रक्षण करेल यावर भरवसा ठेवा.
दैनंदिन काम म्हणून, तुमच्या जीवनाचा एक क्षेत्र लिहून काढा जेथे तुम्ही चिंतीत किंवा त्रासात होता. त्यावर प्रार्थना करा, आणि त्या परिस्थितीत त्याची शांती आणण्यासाठी प्रभू येशूला विनंती करा. मग, संपूर्ण दिवसभर, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटते की चिंता ही परत येत आहे, तेव्हा थोडे थांबा आणि तुमच्या स्वतःला योहान 14:27ची आठवण करून द्या. त्याचे अभिवचन मोठ्याने म्हणा : “येशू, तू तुझी शांती मला दिली आहे.”
प्रार्थना
प्रभू येशू, खऱ्या शांतीचा स्त्रोत होण्यासाठी तुझे आभार. माझे समाधान करू न शकणाऱ्या गोष्टींमध्ये शांती न शोधण्यासाठी आणि त्याऐवजी तुझ्या शांतीत विसावा घेण्यासाठी मला मदत कर. याची पर्वा नाही की कोणत्या वादळांना मी सामोरे जात आहे, मी भरवसा ठेवतो की तुझी शांती मला सांभाळेल. तुझ्या मौल्यवान नावात, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुम्ही किती मोठ्याने बोलू शकता?● संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III
● इतरांची सेवा करण्याद्वारे आशीर्वाद जो आम्ही अनुभवितो
● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● तुमच्या पीडे मध्ये देवाच्या अधीन होण्यास शिकणे
● त्याच्या पुनरुत्थानाची साक्ष कसे बनावे
● पारख उलट न्याय
टिप्पण्या