डेली मन्ना
ऐक्य आणि आज्ञाधारकपणाचा दृष्टांत
Tuesday, 16th of July 2024
20
20
423
Categories :
आज्ञाधारकपणा
१४ जुलै २०२४च्या रविवारी, आम्ही करुणा सदन येथे, आमच्या सर्व शाखा चर्चबरोबर, “संगतीचा रविवार” म्हणून साजरा केला. ऐक्य, उपासना आणि आमच्या समाजातील बंधन मजबूत करण्याबद्दल हा दिवस होता. तुमच्यापैकी अनेक जण ह्या दृष्टांतामध्ये सामील झाले, देवाच्या वचनाच्या प्रती आज्ञाधारकपणात मनापासून त्यात भाग घेतला, आणि त्यासाठी, मी तुमचा अत्यंत आभारी आहे आणि प्रभू निश्चितच तुम्हांला यासाठी सन्मान देईल.
आज्ञाधारकपणाने साकार झालेला दृष्टांत
तुमचा सहभाग देवाने आपल्यासमोर ठेवलेल्या दृष्टांताशी समर्पित आहे हे प्रतिबिंबित केले. इफिस. ४:१६ आपल्याला सांगते, “त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते.” हे वचन जे आपण काल अनुभवले त्यास सुंदरपणे मांडतो. दृष्टांतास यशस्वी करण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने आपली महत्वाची भूमिका पार पाडली, प्रगतीसाठी आणि आपल्या आध्यात्मिक कुटुंबाला मजबूत करण्यासाठी योगदान दिले.
इब्री. १०:२४-२५मध्ये, आपल्याला उपदेश देण्यात आला आहे, “आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा.” एकत्र येण्यासाठी तुमचे समर्पण, आणि एकमेकांना प्रोत्साहन देणे, आणि एकमेकांना प्रीती आणि चांगल्या कृत्यांसाठी चालना देणे ही तुमच्या विश्वासूपणाची साक्ष आहे.
अस्सल कारणे समजून घेणे
मी पूर्णपणे समजू शकतो की तुमच्यापैकी बरेच जण अस्सल कारणांसाठी ह्यात सामील होऊ शकले नाहीत, आणि मी तुम्हांला पूर्ण सहकार्य देतो. जीवन आव्हाने आणि कर्तव्ये सादर करू शकतात जे प्रत्येक समारंभात सहभागी होण्यासाठी कठीण करू शकते. आपण एक कुटुंब आहोत जे एकमेकांना सहकार्य करतो आणि मी ह्या परिस्थितींचा आदर करतो आणि त्यांना स्वीकारतो. संगतीचा हिस्सा व्हावे अशी तुमच्या हृदयाची भावना होते, जरी शारीरिकदृष्ट्या उपस्थित झाले नसले तरी, ते ओळखले जाते आणि त्याची किंमत केली जाते.
वचनबद्दतेसाठी पाचारण
तथापि, ज्यांनी सोयीस्करपणे ह्या दृष्टांताच्या सभेला येण्याचे टाळले त्यांच्याबद्दल मला बोलायचे आहे. हा अत्यंत चिंतेचा विषय आहे, केवळ एक पास्टर म्हणून नाही, तर एक सहकारी विश्वासू म्हणून, आपल्या सामुहिक आध्यात्मिक वाढीसाठी गंभीरपणे निवेश केलेला आहे. वैध कारणांवाचून अशा महत्वाच्या सभेला टाळणे हे चर्चचे ऐक्य आणि उद्देशाला कमी लेखते.
प्रभू येशूने स्वतः एकत्र मिळण्याच्या महत्वावर भर दिला आहे. मत्तय १८:२०मध्ये, तो म्हणतो, “कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.” जेव्हा आपण अशा सभांना टाळण्याची निवड करतो, तेव्हा आपण ख्रिस्त आपल्यामध्ये असल्याचे अनोखे सानिध्य आणि आशीर्वाद गमावतो.
दुर्लक्ष करण्याचे पवित्र शास्त्रातून धोके
संगतीकडे दुर्लक्ष करण्याबद्दल बायबल आपल्याला ताकीद देते. नीतिसूत्रे १८:१ स्पष्ट करतो, “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.” एकाकीपणा स्वार्थीपणाकडे आणि देवाच्या शहाणपणापासून दूर नेऊ शकतो. शत्रू (सैतान) एकाकी राहणाऱ्या विश्वासणाऱ्यावर नेहमी आक्रमण करतो, आणि त्यांना आध्यात्मिक हल्ल्यासाठी अधिक संवेदनाक्षम बनवतो. हे अनेक कारणांपैकी एक आहे की काही लोक पूर्ण सुटका प्राप्त करत नाहीत.
इब्री. ३:१३मध्ये, आपल्याला स्मरण दिले आहे, “आणि दुष्ट व भेंदू माणसे ही दुसऱ्यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.” नियमितपणे संगती पापाच्या फसवणुकीच्या विरोधात संरक्षक म्हणून कार्य करते. आपल्या स्वतःला एकाकी करण्याने, आपण आपल्या हृदयांना कठोर करण्याचा आणि देवाच्या सत्यापासून दूर जाण्याचा धोका पत्करतो.
पुन्हा वचनबद्ध होण्यासाठी प्रोत्साहन
ज्यांनी या सभेला येण्याचे टाळले, मी तुम्हांला तुमच्या प्राथमिकतेवर पुन्हा विचार करण्यास प्रोत्साहन देतो. देव आपल्याला समाजाचा हिस्सा होण्यासाठी, एकमेकांना साहाय्य देण्यासाठी आणि उन्नती करण्यासाठी पाचारण करतो. संगतीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी पुन्हा वचनबद्द व्हा. तुमची उपस्थिती ही केवळ दुसऱ्यांसाठी आशीर्वादच नाही परंतु तुमच्या स्वतःच्या आध्यात्मिक वाढीसाठी देखील महत्वाची आहे.
१ करिंथ १२:१२-१४ वचनांना स्मरण करा, “कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहूदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे.” आपण प्रत्येक जण ख्रिस्ताच्या शरीराचा हिस्सा आहोत आणि जेव्हा एक अवयव गमावतो, तेव्हा संपूर्ण शरीराला त्रास होतो.
याकोब १:२२ मध्ये असलेल्यांसारखे आपण होऊ नये, जे देवाचे वचन ऐकत तर होते पण त्यानुसार कार्य करत नव्हते, अशा प्रकारे ते स्वतःची फसवणूक करत होते. त्याऐवजी, चला आपण वचनाप्रमाणे आचरण ठेवणारे असावे, आपल्यासमोर ठेवलेल्या दृष्टांतासाठी सक्रियपणे सहभागी होऊ या. प्रेषित २:४२मध्ये, प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांनी, प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर राहण्यास स्वतःला समर्पित केले होते. या भक्तीने मोठे आध्यात्मिक संजीवन आणि वाढ केली, आणि अशीच भक्ती करण्यासाठी आपल्याला पाचारण केलेले आहे.
प्रार्थना
पित्या, तुझ्या दृष्टांतासाठी आमच्या समर्पणाला बलशाली कर. एकमेकांना साहाय्य देण्यासाठी आणि उन्नती करण्यासाठी, आणि विश्वास आणि आज्ञाधारकपणात एकत्र मिळून प्रगती करण्यासाठी आम्हांला मदत कर. येशूच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● भविष्यात्मक गीत● बुद्धिमान व्हा
● तुमचा गुरु कोण आहे- II
● देव पुरस्कार देणारा आहे
● दयाळूपणाचे मोल आहे.
● परमेश्वराची महती वर्णा व तुमच्या विश्वासाला प्रेरणा दया
● नरक हे खरे स्थान आहे
टिप्पण्या