english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. एक क्षेत्र ज्यामध्ये सैतान तुम्हांला अधिक अडथळा आणतो
डेली मन्ना

एक क्षेत्र ज्यामध्ये सैतान तुम्हांला अधिक अडथळा आणतो

Thursday, 4th of September 2025
17 16 167
Categories : उपासना
"मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा; तुमची शेरडेमेंढरे व गुरेढोरे मात्र येथेच राहिली पाहिजेत; तुमच्या मुलांबाळांनाही तुमच्याबरोबर घेऊन जा." (निर्गम १०: २४)

फारो ने मोशे ला बोलाविले आणि त्यास म्हटले की जा आणि देवाची सेवा करा. वरवर पाहिले, तर असे दिसते की फारो आता धैर्य सोडून देत आहे आणि पराभव स्वीकारीत आहे. तथापि, जर तुम्ही बारकाईने पाहिले, फारो शेरडेमेंढरे मागे ठेवत होता.

कारण फारो ला पाहिजे होते कीइस्राएलला देवाची उपासना करू देण्यास त्यांच्या क्षमतेला कमी करावे. मोशेने पुन्हा योग्यरीत्या तडजोड करण्याचे नाकारीले.

जरतुम्ही ईयोब १ अध्याय वाचता, तेथे सुद्धा आपण प्रथम गोष्ट जी पाहतो की शत्रू शेरडेमेंढरांवर आक्रमण करतो. यासाठी कारण हे होते की ईयोब दररोज सकाळी परमेश्वराला होमार्पण अर्पण करीत असे जे उपासनेचे प्रतीक असे आहे. जर तेथे शेरडेमेंढरे नसती, तर मग ईयोबाने देवाची उपासना कशी केली असती?

मी परमेश्वराचा धन्यवाद करतो की आज आपल्याला उपासना करण्यासाठी बैल किंवा बकरीची गरज नाही. प्रभु येशूने त्याच्या सिद्ध बलिदानाने पडदा फाडला व उघडा केला आहे की आपण परमेश्वराच्या समक्षउपस्थितीत जाऊ शकतो.
कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केले आहे. (इब्री १०: १४)

जर येथे कोणती गोष्ट आहे तर परमेश्वर उपासना पाहतो. योहान ४:२३ आपल्याला सांगते की, "तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे. किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे."

ही एक गोष्ट आहे जी देव इतर कशाही गोष्टींपेक्षा अधिक इच्छितो.  ही ती वेळ आहे की आपण त्याच्या मुखाचा शोध घेतो. आणि शत्रू सर्व काही करण्याचा प्रयत्न करेल की तुम्हांला देवाची उपासना करण्यापासून अडथळा आणावा. प्रेषित पौलाने आपल्याला इशारा दिला आहे की आपण शत्रूच्या योजनेपासून अवगत असले पाहिजे (२ करिंथ २: ११ पाहा).

गर्व
गर्वा पेक्षा इतर काहीही उपासनेला अडथळा आणीत नाही. जर कोणी सावधान राहिले नाही तर कोणी त्याच्या नम्रतेबद्दल सुद्धा गर्व करू शकतो. काही ख्रिस्ती ज्या मार्गाने परमेश्वर त्यांचा उपयोग करीत आहेत्यात गर्विष्ठ होतात. आपण हे लक्षात ठेवण्यास काळजी घेतली पाहिजे की गाढव ज्यावर येशू बसला होता त्याने येशू सह यरुशलेमेत प्रवेश केला.

आपल्या साधनाने परमेश्वराची उपासना करण्यास चुकणे
नीतिसूत्रे ३: ९-१० मध्ये आपण ही आज्ञा पाहतो,
तूं आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर;
म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, 
तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील.

फारो ला इस्राएली लोकांनी त्यांच्या देवाची उपासना करण्यास रिकामी हाती जाण्यास काही अडचण नव्हती, मिसर मध्ये त्यांची सर्व संपत्ति मागेठेवावी.

जुन्या करारात, परमेश्वराने कोणालाही त्याच्यासमोर रिकामी हाताने येण्यास प्रत्यक्षात मनाई केली होती-त्याची उपासना करण्यासाठी त्यांच्या उत्पन्नापासून कोणतेही दान किंवा अर्पणा शिवाय येऊ नये. परमेश्वराने आदेश दिला होता, कोणीही रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये. (निर्गम ३४: २०)

परमेश्वराची उपासना आपल्या देण्याने करणे हे स्वीकारते की आपल्याकडे जे सर्व काही आहे त्याचा स्त्रोत परमेश्वरच आहे आणि त्यानेच प्रथम जे आपल्याला दिले आहे त्याचे केवळ आपण भांडारी आहोत. ह्याच ठिकाणी अधिकतर ख्रिस्ती लोक संघर्ष करतात.

Bible Reading: Ezekiel 11-13
प्रार्थना
जिवंत देवाची उपासना करण्यास जी प्रत्येक शक्ती मला अडथळा आणीत आहे ती येशूच्या नांवात दूर केली जावो. आमेन.


Join our WhatsApp Channel


Most Read
● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
● यहूदाच्या विश्वासघाताचे खरे कारण
● आपल्यामध्येच खजिना
● दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आध्यात्मिक नियम: संबंधाचा नियम
● तुम्ही कशा साठी वाट पाहत आहात?
● गुप्त गोष्टी समजून घेणे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन