ते पलीकडे गेल्यावर एलीया अलीशास म्हणाला, मला तुजपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुजसाठी काय करू ते मला सांग. अलीशा म्हणाला, आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा. (२ राजे २:९)
परमेश्वरामध्ये महान सामर्थ्य व अधिकारामध्ये जाण्यासाठी पहिली आवश्यकता ही की त्यासाठी भुकेले होणे होय. ही भूक परमेश्वरापासून जन्म घेते व ती कृतीमरित्या चेतविली जाऊ शकत नाही. अलीशा परमेश्वराप्रती भुकेला होता. एलीयाचा सेवक म्हणून अलीशा ने अनेक चमत्कार पाहिले होते. परंतु त्यास अधिक पाहिजे होते. त्यास एलीयाच्या आत्म्याचा दुप्पट वाटा पाहिजे होता.
जेव्हा त्याने एलीयाला हे मागितले, संदेष्ट्याने प्रत्युत्तर दिले, "तूं कठीण गोष्ट मागितली आहे." हे याकारणासाठी नाही की ती देऊ शकली नसती. एलीयाला ठाऊक होते की महान अभिषेक सह मोठया जबाबदारीचा भार व कठीणता येते.
दुसरे, आदर अगोदर नम्रता येते. अलीशा हा 'एलीयाचा सेवक' असे ओळखला जात होता. "कोणाचा सेवक" म्हणून ओळखले जावे हे तुम्हाला कसे वाटेल? तुमच्या नावाचा अजून उल्लेख सुद्धा केलेला नाही. अलीशाची ही तयारी होती. देवाच्या अनेक पुरुषांची ही तयारी होती. योसेफ चा विचार करा, फारो चा सेवक. दाविदाचा विचार करा, शौलाचा सेवक.
तिसरे, अलीशा ने त्याच्या पाचारणास पूर्णपणे समर्पित केले होते. पवित्र शास्त्र सांगते की जेव्हा अलीशा ला एलीयाबरोबर येऊन मिळावे म्हणून बोलाविण्यात आले, त्या तरुण मनुष्याने त्याचे शेत व्यवसाय पूर्णपणे सोडून दिला. त्याने त्याच्या बैलांना कापले व समाजासाठी मोठी जेवणावळ दिली (१ राजे १९:१९-२१). हे सर्व किंवा काहीही नाही. तो त्याच्या शेतीच्या व्यवसायाकडे पुन्हा जाऊ शकला नाही जर त्याचे नवीन कार्य कार्यान्वित होत नसेल. पुढे जाण्यामध्ये अलीशाचे नवीन काहीतरी करण्याचा आत्मा हे दर्शवितो, पुढे काय ठेवले आहे हे न जाणता. त्याने त्याच्या मागील सर्व पूल जाळून टाकले. त्याच्याकडे आता काही भूतकाळ नव्हता जेथे तो परत जाऊ शकत होता.
परमेश्वरामध्ये अभिषेकच्या मोठया परिमाण मध्ये तुम्हाला चालण्याची इच्छा आहे काय? "तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांस पावेन" (यिर्मया २९:१३). परमेश्वराच्या अभिषेक साठी तुमच्या अंत:करणात आज तहानेले होण्यास सुरुवात करा. येणाऱ्या महान गोष्टीसाठी हे सुरुवातीचे ठिकाण आहे.
४० दिवसांची बायबल वाचन योजना
लूक २-८
प्रार्थना
पित्या, तुझी उपस्थिती व तुझ्या वचना साठी माझ्यामध्ये एक भूक निर्माण कर. मी तुझ्याकडे धावा करतो. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आनंद कसा अनुभवायचा● तुम्ही कशा साठी वाट पाहत आहात?
● चालण्यास शिकणे
● एल-शादाय चा परमेश्वर
● आध्यात्मिक प्रवेश द्वारांचे रहस्य
● चांगले हे उत्तमतेचे शत्रू आहे
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- ३
टिप्पण्या