डेली मन्ना
आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२
Tuesday, 27th of August 2024
29
22
338
Categories :
आध्यात्मिक शक्ती
जो [अन्य] भाषेत बोलतो तो स्वत:ची सुधारणा व उन्नती करतो, (१ करिंथ १४:४ विस्तारित).
"सुधारणा" हा शब्द ग्रीक “ओइकोडोमेओ" या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ तयार करणे किंवा बांधणे असा आहे, ज्याप्रकारे इमारत तयार केली जाते किंवा बांधली जाते. १ करिंथ १४:४ मध्ये, प्रेषित पौल, आत्म्याद्वारे आपल्याला शिकवितो की जसे बांधकाम साइटवर कामगार विटांवर विटा रचून भव्य इमारत बांधतात तसे अन्य भाषांमध्ये बोलतो तेव्हा आपण स्वतःला बांधत आहोत.
स्वाभाविक जीवनातील परिस्थिती आणि दैनंदिन घडामोडी आध्यात्मिक शक्ती आणि सामर्थ्य वापरुन आपणाला आध्यात्मिकरित्या कमकुवत करु शकतात आणि थकवू शकतात. जेव्हा लोक स्वतःला पुन्हा 'भरुन काढत' नाहीत तेव्हा ते आध्यात्मिकरित्या दुर्बळ होतात आणि खाली पडतात.
तुमच्यातील काही जण कदाचित परमेश्वराची सेवा करत असतील आणि नंतर क्षीण झाले असतील. कदाचित आपण एखादी नोकरी करत असाल आणि आपल्या समोर येणाऱ्या तीव्र दबावामुळे आपण हार मानू इच्छित असाल. या सर्वांचे कारण म्हणजे आपली आंतरिक आध्यात्मिक शक्ती कमी झाली आहे.
आध्यात्मिकरित्या कमकुवत झाल्याने विश्वासाची पातळी कमी होते आणि निराशा येते. तुम्हाला पवित्र शास्त्र वाचावेसे वाटत नाही; चर्चमध्ये जाणे कंटाळवाणे वाटते.या सर्वांसाठी उपाय आहे.
निरनिराळ्या भाषांमध्ये प्रार्थना करणे आणि बोलणे आपणास आध्यात्मिकदृष्ट्या उत्तेजन देईल कारण ते परमेश्वराबरोबर आध्यात्मिक संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे, जे स्वाभाविक मनाची मर्यादा ओलांडते. (१ करिंथ १४:१४). सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तुम्हाला असे करण्यासाठी काही खास प्रसंगांची वाट पाहण्याची गरज नाही; तुम्हाला जेव्हा आणि जेथे वाटेल तेथे निरनिराळ्या भाषेत बोला. जेव्हा तुम्ही असे नियमितपणे करता, तेव्हा आपण स्वतःची आवृत्ति 2.0 होऊ. तुमच्या आसपासच्या लोकांना तुमच्यातील फरक लक्षात येईल.
२ करिंथ ११:२३-२७ मध्ये, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करण्यासाठी त्याच्या प्रयत्नात प्रेषित पौलाने त्याचे संघर्ष व दु: ख यांचा उल्लेख केला.
“.... बेसुमार फटके, वारंवार तुरुंगवास, पुष्कळ वेळा मृत्युच्या दाढेत पडलो. पाच वेळा मी यहुद्यांच्या हातून एकोणचाळीस फटके खाल्ले.तीन वेळा छड्यांचा मार खाल्ला; एकदा मला दगडमार झाला; तीन वेळा माजे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवली; कितीतरी प्रवास केला, नद्यांवरील संकटे, लुटारूमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रावरील संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे; श्रम व कष्ट, कितीतरी वेळा जागरण, तहानभुक, पुष्कळ उपासतापास, थंडी व उघडेवागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे”
या सर्व गोष्टींमधून जाऊनही कोणालाही आश्चर्य वाटेल की प्रेषित पौलाने हार मानली नाही. काय आहे की ज्यामुळे तो प्रत्येक वेळी परत मजबूत झाला? हे रहस्य १ करिंथ १४:१८ मध्ये उघड झाले आहे, पौल करिंथकरांस म्हणतो, “ मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो.”
तासंतास निरनिराळ्या भाषेत प्रार्थना करणे हे प्रेषित पौलाचे रहस्य होते. असे केल्याने त्याचा अध्यात्मिक मनुष्य अगदी उच्च पातळीवर प्रस्थापित केला गेला जेथे त्याला सहन करणे आणि त्याच्यावर टाकलेल्या कोणत्याही गोष्टीवर विजय मिळविणे शक्य होते.
दक्षिण भारतात देवाचे एक महान दास, संदेष्टा इझेकीया फ्रान्सिस हे आहेत. मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही परंतु त्यांचे जीवन व त्यांच्या शिकवणीमुळे मी खूप आशीर्वादीत झालो आहे. [मला त्यांना भेटायला आवडेल] दोन दशकांहून अधिक काळ, त्याच्या जीवनाने आणि सेवेने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानातील उच्च स्तर सातत्याने प्रदर्शित केले आहेत. कसे? मी नुकताच सेवेत प्रारंभ करत होतो (आता १९९७ च्या सुरुवातीला), मी त्यांच्या एका शिक्षणाच्या टेपवर त्यांना बोलताना ऐकले; ते म्हणत होते की आंघोळ करतानाही मी अन्य भाषेत प्रार्थना करतो. हे ऐकून मी थक्क झालो.
निरनिराळ्या भाषां बोलण्याचे दान असूनही, बरेच ख्रिस्ती लोक नियमितपणे निरनिराळ्या भाषा बोलण्यात अपयशी ठरतात; आज विश्वासणाऱ्यांमध्ये इतकी आध्यात्मिक दुर्बलता आहे यात काही आश्चर्य नाही. हे त्या सेवकासारखे आहे ज्याने आपली भेट जमिनीमध्ये लपून ठेवली. (मत्तय २५:१४-३०)
परंतु प्रिय मित्रांनो, पवित्र आत्म्याने प्रार्थना करत आपल्या अति पवित्र विश्वासात [प्रगती करा, एखाद्या इमारतीप्रमाणे उच्च आणि उच्च व्हा], स्वत:ला प्रस्तापित [बांधणी] करा. (यहुदा २०)
यहुदा २० मध्ये, ऑयकोडोमेओ, हा तोच ग्रीक शब्द ज्याचा अर्थ बांधणे आहे तो वापरण्यात आला आहे. शब्दांकडे लक्ष द्या, प्रगती करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करुन विश्वासाच्या पायावर इमारतीसारखे उंच आणि उंच व्हा. तुम्हाला तसे आवडत नाही काय?
जेव्हा येशु म्हणाला शहाण्या मनुष्याने खडकावर घर बांधले, तेव्हा त्याने तोच ग्रीक शब्द ऑइकोडोमेओ याचा वापर केला. “म्हणून, जो कोणी माझी वचने ऐकतो व त्या प्रमाणे करतो, मी त्याची तुलना एक शहाण्या माणसाशी करतो, ज्याने आपले घर खडकावर बांधले आहे: मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. वारा सुटला. आणि तो घरावर आदळला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता.” (मत्तय ७: २४-२५)
येशूचे म्हणणे ऐकण्याने व त्याप्रमाणे करण्याने आपल्याला सुज्ञ पुरुष व स्त्री बनण्यास मदत होईल. एक यशस्वी घर बांधणारा होण्यासाठी आणि विश्वासाच्या पायावर आपले घर प्रभावीपणे बांधण्यासाठी, आपण देवाच्या वचनाचे मनन करत असताना व ऐकत असताना, निरनिराळ्या भाषेत प्रार्थना केली पाहिजे. मार्गदर्शकाच्या साहाय्याने, म्हणजे पवित्र आत्मा, निरनिराळ्या भाषेत प्रार्थना केल्यामुळे आपल्या जीवनात प्रकटीकरणाच्या ज्ञानाच्या सामर्थ्याचा प्रवेश होईल. येशू म्हणाला की प्रकटीकरणाचे ज्ञान हा एक खडक आहे ज्याच्यावर तो आपली (ओइकोडोमेओ) मंडळी रचीन, आणि अधोलोकाच्या द्वाराचे त्यापुढे काहीही चालणार नाही.
अंगीकार
मी प्रभुमध्ये जोडल्या गेलो आहे आणि मी त्याच्याबरोबर एक आत्मा आहे. मी सदैव त्याच्यात राहील. मला येशु ख्रिस्ताचे मन आहे, व देवाची समज माझ्याद्वारे वाहते.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कालेबचा आत्मा● दिवस ३४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● भविष्यात्मक गीत
● सैतान तुमच्या कार्यात कसे अडथळे आणतो
● सिद्ध सिद्धांताचे महत्त्व
● कोठवर?
● सुवार्ता घेऊन जाणारे
टिप्पण्या