डेली मन्ना
बदलण्यासाठी उशीर हा कधीहीझालेला नाही
Tuesday, 5th of March 2024
26
17
915
Categories :
बदल
कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालीत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो व बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यात घालतात. (मार्क २:२२)
अनेक वर्षांपूवी, द्राक्षारस हा बाटली ऐवजी कातड्यांच्या थैली मध्येठेवला जात होता. जेव्हा ती कातडी नवीन असे, ती नरम व लवचिक असे, परंतु जसे जुनी होत असे, ती कठीण होत असे व वाढू शकत नव्हती. जर नवीन द्राक्षारस कातडीच्या जुन्या थैलीत टाकला, तर ती थैली फाटत असे व द्राक्षारस सांडत असे.
हे मला सांगते की परमेश्वर ते नवीन आशीर्वाद ओतण्यास तयार आहे, तो नवीन दरवाजा उघडावा याची खात्री करून की परमेश्वर जे देत आहे ते धरण्यास किंवा जपण्यास आपण सक्षम आहोत. देवाला काय सीमित करते की वाढण्याची आपली क्षमता, बदलण्यासाठी आपल्या इच्छेचा अभाव. मी ऐकत आहे की आत्मा कुजबुजत आहे: 'तुमची कातड्याची थैली बदला, तुमची जीवनशैली बदला.'
तुम्ही दिवसेंदिवस तेच करीत राहू शकता व वेगळ्या परिणामाची अपेक्षा करता- तो वेडसरपणा आहे.
जेव्हा मी वचन वाचत होतो, फारच मनोरंजक वास्तविकता मला मिळाली, जेव्हा प्रभु येशूने लोकांसाठी प्रार्थना केली, त्याने विचारले ते ह्या अवस्थेत किती वर्षांपासून आहेत. बेथसदा येथे पडून राहिलेल्या पंगु मनुष्याला तो म्हणाला, "तूं येथे केव्हापासून आहे?" मनुष्याने उत्तर दिले, "अडतीस वर्षे." (योहान ५ वाचा)
प्रभु येशूने एका स्त्रीला विचारले जी वाकलेली होती की ती अशा अवस्थेत किती वर्षांपासून आहे. तिने उत्तर दिले, "अठरा वर्षे" (लूक १३). काही आई-वडिलांनी त्यांच्या एका आंधळ्या मुलाला येशू कडे आणले. येशूने विचारले, तुमचा हा पुत्र केव्हापासून आंधळा आहे?" ते म्हणाले, तो"त्याच्या जन्मापासून" आंधळा आहे. (योहान९:१-१२)
येशूवेळेच्या कालावधी मध्ये का रुची ठेवत होता? का नाही केवळ त्याने त्यांना बरे करावे व पुढे जावे? हे याकारणासाठी की येशूला हे पाहिजे होते की आपण पाहावे की काहीही कायमचे नाही. त्यास हे पाहिजे होते की येणाऱ्या सर्व पीढी साठी ते वचनात नोंदले जावे म्हणजे आपण हे जाणावे की बदलण्यासाठी उशीर हा कधीहीझालेला नाही. याची पर्वा नाही की तुमची सध्याची परिस्थिती कशी आहे, बदलण्यासाठीउशीर हा कधीहीझालेला नाही.
कोणीतरी म्हटले आहे, "कोणीही मागे भूतकाळात जाऊ शकत नाही व एक नवीन सुरुवात सुरु करावी, परंतु कोणीही आज सुरु करू शकतात आणि एक नवीन शेवट करावा."
प्रार्थना
पित्या, तुझ्याबरोबर सर्व गोष्टी शक्य आहेत. तूं माझीपरिस्थितीपूर्णपणे बदलेल, तूं माझे स्वप्न पूर्ण करेल. पवित्र आत्म्या, मला नवीन कर, मला बदल म्हणजे तूं जे ओतत आहे ते मी जतन करू शकावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस १८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना● धन्य व्यक्ती
● भविष्यात्मक गीत
● आत्म्याची नावे आणि शीर्षक: देवाचा आत्मा
● बीज चे सामर्थ्य - ३
● दुष्ट विचार पद्धती विरुद्ध संघर्ष (दिवस 9)
● दिवस ०४ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या