"देव प्रीति आहे" (१ योहान ४:८)
"प्रीति कधी चुकत नाही" (१ करिंथ १३:८)
मी नेहमी आश्चर्य करतो की प्रेषित पौल हे वचन कसे लिहू शकला असेन. ख्रिस्ती लोकांचा छळ केला जात होता. रोमी लोकांद्वारे त्यांना सिंहाच्या गुहे मध्ये टाकले जात होते ह्या प्रयत्नात की त्यांना प्रभूचा नकार करावयास लावावा. असे दिसत होते की देवाच्या लोकांविरुद्ध नरकाचे द्वार हे आक्रमक स्वरूपाने उघडले गेले होते. अशी वचने लिहिण्यास, प्रेषित पौला ला अलौकिक प्रकटीकरण असले पाहिजे होते. ही वचने मानवी दृष्टीकोनापासून लिहिली जाऊ शकत नाही. पौल हा निश्चितपणे संपूर्ण चित्र पाहत होता.
हा समय ज्यातून आपण सध्या जात आहोत, ते आपल्याला याचा अभास देते की परमेश्वराने आपल्याला अपयशी केले आहे. काहीही चांगले होत असताना दिसत नाही. नकारात्मकता ही तशीच कायम राहत असलेली दिसत आहे आणि आपण सतत हे आश्चर्य करण्याकडे घेऊन गेले जात आहोत, ह्या सर्वांमध्ये परमेश्वर कोठे आहे?
रुथ चे पुस्तक आपल्याला नामी ह्या स्त्री शी परिचित करविते. एक कुटुंब म्हणून जेव्हा त्यांनी दुष्काळाचा सामना केला, तेव्हा ते मवाब देशी राहण्यास गेले. परिस्थिती निवारण्याऐवजी, नामी, तीचा पती व तिच्या दोन पुत्रांच्या मृत्यूला तोंड देत होती. तिच्यासारखेच तिच्या दोघी सुना ह्या आता विधवा झाल्या होत्या. ह्याक्षणी एक सून तिला सोडून जाते व तिच्या इच्छेनुसार निघून जाते. नामी ला पीडा वर पीडा, संकटांवर संकटाचा उपाय शोधायाचा होता. शोक-ग्रस्त, दरिद्री व एकाकी, नामी ला निश्चितच असे वाटले असेन की देवाने तिला अपयशी केले आहे.
निराशेत, तिने तिच्या स्वतःच्या गावी, बेथलेहमला जाण्याचा निर्णय केला. नामी घरी आलेली पाहण्यास लोक उत्साही झाले होते. "....आणि स्त्रियांनी म्हटले ही नामी च काय?" ती त्यास म्हणाली, मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मारा (क्लेशमया) म्हणा; कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणिले; परमेश्वर मला प्रतिकूळ झाला, सर्वसमर्थाने मला पीडिले आहे, तर मला नामी का म्हणता? (रुथ १:१९-२१)
नामी परिस्थितीचा केवळ थोडासा भागच पाहत होती. तिला काय ठाऊक नव्हते ते हे की ह्या सर्वांमध्ये परमेश्वर त्याच्या तारणाच्या योजने मध्ये तिला काहीतरी गौरवी याकडे मार्गदर्शन करीत आहे. नामी ची विश्वासू सून, रुथ ही बवाज शी विवाह करणार आहे. बवाज व रुथ हे दाविदाचे आजोबा-आजी होणार आहेत, जो पुढे मशीहा, प्रभु येशू ख्रिस्ताची वंशावळी पुढे नेणार आहे.
रोम मध्ये काय घडले हे तुम्हाला ठाऊक आहे काय? अनेक रोमी लोकांनी येशूला त्यांचा प्रभु व तारणारा असे स्वीकारले. छळाच्या मध्य ख्रिस्ती विश्वास रोम मध्ये वनातील अग्नीप्रमाणे वाढला. इतिहास हा पुरावा आहे, की तीस वर्षापेक्षा कमी कालावधी मध्ये, संपूर्ण रोम साम्राज्यात सुवार्ता ही पसरविली गेली. रोमन साम्राज्य ज्यावर मात करणे शक्य दिसत नव्हते ते देवाच्या प्रीतिद्वारे जिंकले गेले व ख्रिस्ती धर्म हा रोम चा अधिकृत धर्म झाला.
ह्या समयात, तुम्ही कदाचित स्वतःला हे विचारताना पाहाल, "देवाने मला उत्तर का दिले नाही?". मला तुम्हांला प्रोत्साहन दयायचे आहे की ह्यावर ठाम राहा. परमेश्वर हा त्रासदायक काळ व कठीण परिस्थितीचा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी एक शिडी म्हणून उपयोग करेन. वास्तवात. परमेश्वर कधीही चुकत नाही. त्याच्या चांगुलपणाची तुम्ही लवकरच साक्ष द्याल!
प्रार्थना
पित्या, मला कृपा पुरीव की माझ्या जीवनातील ह्या परिस्थिती मध्ये तुझ्या वचनात स्थिर उभे राहावे. तूं माझ्या पक्षाचा आहे ज्या जाणिवेसह आत्मविश्वासाने प्रत्येक दिवसाला तोंड देण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आई-वडिलांचा मान राखणे (दिवस ८)● किंमत मोजणे
● जबाबदारीसह परिपक्वता सुरु होते
● ख्रिस्ती लोक देवदूताला आदेश देऊ शकतात काय?
● सर्वशक्तिमान परमेश्वराबरोबर भेट
● अडथळ्यांपासून ते पुनरागमनापर्यंत
● नवीनजीव
टिप्पण्या