विश्वास हा [आपण] आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरंवसा आणि [आपणांस] न दिसणाऱ्या गोष्टीं व त्या प्रत्यक्षते [विश्वास हा प्रत्यक्ष वास्तविकता असे पाहणे जे चेतनेला प्रगट केलेले नाही] बद्दलची खातरी [निश्चिती, मूळ दस्तावेज] आहे. (इब्री ११:१ ऐम्पलीफाईड)
देवाच्या वचनावर आज महाभोजनासाठी स्वागत आहे. आपण आजपासून पुढे विश्वासाच्या विषयावर वचनाच्या सखोलतेमध्ये वाटचाल करणार आहोत. आपण बायबल विश्वासाची व्याख्या, त्याची शक्यता व त्याच्या सर्व महत्वाकडे पाहणार आहोत. थॉमस अक्विनास ने विश्वासाची मुख्य गोष्ट समजली, की एक ज्यास विश्वास आहे, त्यास स्पष्टीकरणाची गरज नाही. एक जो विश्वासावाचून आहे, त्यास कोणतेही स्पष्टीकरण शक्य होत नाही.
तुम्ही जेव्हा विश्वास हा शब्द प्रथम ऐकला, कोणती व्याख्या जी तुमच्या मनातून निघाली? मनुष्याची चिंता व्यवस्थित करण्यासाठी देवाचा तयारीचा वर्ग. आंधळेपणे प्रश्न करणे व तयार केलेली आशामय भावना? कदाचित, अनेक जण हे विश्वासाला एका आवश्यक सिद्धांत-ख्रिस्ती सिद्धांतासाठी मेंदूची प्रगती सारखे पाहू शकतात ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आपले आजचे वचन हे स्पष्ट करते की तारून निघण्यासाठी आशेच्या वल्हवणे शिवाय वादळामय समुद्रातून तारून निघावे हा विश्वास नाही.
विश्वास हा वचनावर आधारित कृती आहे. विश्वास हा काही अभास किंवा भावना नाही जे आपण निर्माण करतो की अज्ञात गोष्टींच्या भीतीवर मात करावी. परमेश्वराने त्याच्या वचनात काय म्हटले किंवा प्रगट केले आहे त्यास मनुष्याचे हे पूर्ण प्रत्युत्तर आहे. हे काही अंधारात दगड मारणे नाही.
जेव्हा येशूने शिमोन जो मासे धरणारा यास म्हटले की जाळे खोल समुद्रात टाक. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो" (लूक ५:५).
प्रभु येशूच्या वचनाच्या आधारावर पेत्राने कृतीसह प्रत्युत्तर दिले. आपले मत, आपला अनुभव, आपले शिक्षण याचा विचार न करता विश्वास म्हणजे त्यानुसार कार्य करणे जे परमेश्वर बोलत आहे. विश्वास हे सत्यानुसार कार्य करणे आहे, मग आपल्याला सत्य वाटत असेन किंवा नाही, मग आपल्याला सत्य आवडले असेन किंवा नाही, मग आपण सत्याशी सहमत असो किंवा नाही.
तसेच, पवित्र आत्मा जे काही तुमच्या मनाला बोलत आहे त्यानुसार कार्य करता, तेव्हा तेथे विलक्षण परिणाम प्राप्त होतील. तो विश्वास आहे!
माझ्या अनेक उपासनेच्या दरम्यान, जेव्हा अभिषेक हा अधिक सामर्थ्याने प्रवाहित होतो, तेव्हा तेथे ज्ञानाचे वचन मिळते जे लोकांच्या परिस्थितीचे प्रत्यक्ष वर्णन करते. येथे अनेक लोक आहेत जे वचनाला प्रत्युत्तर देतात हे जाणून की हा तो परमेश्वर आहे जो त्यांच्याबरोबर बोलत आहे. येथे असा कोणताही मार्ग नाही की मी त्यांची परिस्थिती इतकी अचूक समजावी. ते जे वचनाला प्रत्युत्तर देतात, ते परमेश्वरापासून आरोग्य प्राप्त करतात.
आता, येथे काही लोक आहेत, जे जाणतात कि वचन जे आले आहे ते त्यांच्या परिस्थितीचे अचूक वर्णन करीत आहे परंतु ते कधीही प्रत्युत्तर देत नाहीत. ते कदाचित विचार करतात की देवाचे सामर्थ्य हे त्यांच्यावर येईल व त्यांना काहीतरी करावयास लावेल मग ते त्यांना करावयास पाहिजे किंवा नाही. तो असा मार्ग नाही की ज्याप्रमाणे पवित्र आत्मा कार्य करतो.
दुष्ट आत्मा लोकांना गोष्टी करण्यास दबाव आणतो व बळजबरी करतो जे त्यांना करावयास नको असते. पवित्र आत्मा हा याउलट एखादया सभ्य मनुष्यासारखा आहे. तो तुम्हाला काहीतरी करण्यास कधीही दबाव व बळजबरी करणार नाही. तो सौम्यपणे तुम्हाला इशारा देईल परंतु मग त्यास प्रत्युत्तर देणे हे तुमच्याकडे असेन. वचन जे तुमच्याकडे आले आहे त्यावर आधारित कृती सह प्रत्युत्तर देणे हे मग तुमच्यावर असेन.
प्रार्थना
पित्या, तुझ्या वचनाच्या विश्वसनीयतेवर माझा नांगर पूर्णपणे स्थिर करण्याने जीवनाच्या प्रवासातून तारून निघण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सत्ता हस्तांतराची ही वेळ आहे● परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे
● दिवस २५:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● विश्वासाचे सामर्थ्य
● छाटण्याचा समय– २
● दिवस १३ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● पैसा चरित्राला वाढवितो
टिप्पण्या