english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. अत्यंत प्रभावी लोकांच्या ९ सवयी: सवय क्रमांक ४
डेली मन्ना

अत्यंत प्रभावी लोकांच्या ९ सवयी: सवय क्रमांक ४

Tuesday, 13th of January 2026
19 15 189
Categories : अत्यंत प्रभावी लोकांच्या ९ सवयी
आपण दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, तर न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देतो; कारण दिसणाऱ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत, पण न दिसणाऱ्या गोष्टी अनंतकालीन आहेत. (२ करिंथकरांस ४:१८)

अत्यंत प्रभावी लोक केवळ तातडीपणा किंवा दबाव यांच्या नियंत्रणाखाली राहत नाहीत. ते अनंतकाळाच्या दृष्टीकोनाने मार्गदर्शित होतात. ते फक्त “आता काय करणे गरजेचे आहे?” असा प्रश्न विचारत नाहीत तर “दीर्घकाळात खरे महत्त्व काय आहे?” हा प्रश्न विचारतात.

बायबल आपल्याला दाखवते की अनेक लोकांचे जीवन फार व्यस्त असते, पण त्यातून फारसे फळ निर्माण होत नाही. लोक एका जबाबदारीतून दुसरीकडे धाव घेतात, घाईघाईने निर्णय घेतात आणि सतत कार्यरत राहतात पण त्याचे परिणाम टिकणारे नसतात. असे तेव्हा घडते, जेव्हा योग्य दृष्टीकोनाऐवजी दबावाखाली निर्णय घेतले जातात.

अनंतकालीन दृष्टी सर्वकाही बदलून टाकते. ती व्यक्तीला थांबायला, स्पष्टपणे विचार करायला आणि शहाणपणाने निवड करायला मदत करते. ती केवळ धावपळ आणि खऱ्या उद्देशामधील फरक स्पष्ट करते. जेव्हा एखादी व्यक्ती अनंतकाळ लक्षात ठेवून जगते, तेव्हा तिच्या कृतींना अर्थ प्राप्त होतो, तिच्या त्यागाला कारण मिळते, आणि तिचे जीवन वर्तमान क्षणाच्या पलीकडे जाऊन टिकणारा प्रभाव सोडते.

देव यशाचे मोजमाप वेगाने करत नाही, तर आमचे जीवन त्याच्या अनंतकालीन योजना व उद्देशांशी सुसंगत आहे की नाही, हे तो पाहतो.

१. दृष्टीकोन प्राधान्ये ठरवतो

प्रभु येशू कधीही गर्दी, संकटे किंवा लोकांच्या अपेक्षांमुळे घाई करत नव्हते. आजूबाजूला तातडीच्या गरजा असतानाही ते दैवी वेळेनुसार कार्य करत होते. लाझर आजारी असल्याची बातमी मिळाल्यानंतरही येशूंनी विलंब केला उदासीनतेमुळे नव्हे, तर दैवी उद्देशामुळे.

“तो आजारी आहे असे ऐकूनही, ज्या ठिकाणी तो होता तिथेच तो अजून दोन दिवस राहिला.” (योहान ११:६)

यातून एक सामर्थ्यशाली सत्य प्रकट होते: जे मनुष्याला उशीर वाटतो, ते देवासाठी योग्य वेळ असू शकते.

अत्यंत प्रभावी लोक बहुतेकांपेक्षा वेगळा प्रश्न विचारतात. “हे तातडीचे आहे का?” असा नव्हे, तर “हे अनंतकालीन आहे का?” असा. त्यांना माहीत असते की प्रत्येक उघडे दार हे देवाचे दार नसते, आणि प्रत्येक मागणी लक्ष देण्यास पात्र नसते.

मोशेने हा तत्त्व स्पष्टपणे दाखवून दिला, जेव्हा त्याने मिसरमध्ये मिळणाऱ्या तात्पुरत्या सुखांपेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करणे निवडले.

२४ विश्वासाने मोशेने, तो मोठा झाल्यावर, फिरओहाच्या मुलीचा पुत्र म्हणून ओळखले जाण्यास नकार दिला;
२५ पापाच्या क्षणिक सुखांचा उपभोग घेण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करणे त्याने निवडले;
२६ कारण त्याने मिसरच्या खजिन्यांपेक्षा ख्रिस्ताच्या अपमानाला अधिक मोठे धन मानले; कारण त्याचे लक्ष प्रतिफळाकडे होते.
(इब्री लोकांस ११:२४–२६)

मोशेने आपल्या जीवनाचे मूल्यांकन लाभाच्या दृष्टीने नव्हे, तर अनंतकाळाच्या दृष्टीने केले. हाच तो एक प्रमुख कारण होता ज्यामुळे तो इतका प्रभावी ठरला.

२. अनंतकालीन दृष्टी थकव्यापासून ((Burnout)) संरक्षण करते

थकवा (Burnout) हा बहुतेक वेळा केवळ दिसणाऱ्या परिणामांसाठी जगण्याचा परिणाम असतो. पवित्रशास्त्र आपल्याला इशारा देते,

“भले करताना थकू नका” (गलातीकरांस ६:९)

ही आज्ञा तेव्हाच अर्थपूर्ण ठरते, जेव्हा अनंतकाळ डोळ्यांसमोर असतो.

प्रेषित पौलाने छळ, कठीण परिस्थिती आणि नुकसान सहन केले, कारण त्याला माहीत होते की त्याचे परिश्रम व्यर्थ नाहीत (१ करिंथकरांस १५:५८). अनंतकालीन दृष्टी दुःखाला गुंतवणुकीत रूपांतरित करते आणि त्यागाला बीजात बदलते.
अत्यंत प्रभावी लोक टाळ्यांशिवायही कठीण काळ सहन करू शकतात, कारण त्यांना भविष्यातील प्रतिफळ दिसते. त्यांना माहीत असते की माणसे जे दुर्लक्ष करतात, ते देव पाहतो.

३. विलंबित समाधान ही एक आत्मिक सामर्थ्य आहे

अत्यंत प्रभावी लोक विलंबाची शिस्त आत्मसात करतात. ते चांगल्या गोष्टींना “नाही” म्हणतात, जेणेकरून देवाच्या गोष्टींना “होय” म्हणू शकतील. दिशा नसलेला वेग शेवटी नुकसानच करतो, हे त्यांना माहीत असते, म्हणून ते शॉर्टकट्स टाळतात. 

बायबल वारंवार अल्पकालीन (तात्पुरत्या गोष्टी) आणि अनंतकालीन (कायमच्या (शाश्वत) गोष्टी) यांतील फरक सांगते. एसावने लगेच भूक भागवण्यासाठी आपला जन्महक्क गमावला. एका जेवणासाठी त्याने आपले भविष्यच विकले (उत्पत्ति २५:२९–३४). हे लगेच मिळणाऱ्या सुखासाठी मोठे नुकसान करण्याचे दुःखद उदाहरण आहे.

प्रभु येशूंनीही सावध केले आहे,

“एखाद्या माणसाने संपूर्ण जग मिळवले, पण आपला आत्मा गमावला, तर त्याला काय लाभ होईल?” (मार्क ८:३६) 

४. अनंतकालीन दृष्टी सातत्यपूर्ण प्रामाणिकपणा निर्माण करते

जेव्हा अनंतकाळ तुमच्या जीवनावर राज्य करतो, तेव्हा प्रामाणिकपणा हा तडजोड न करता पाळायचा विषय बनतो. योसेफने पापाला नकार दिला तो परिणामांच्या भीतीमुळे नव्हे, तर देवाबद्दल असलेल्या आदरभावामुळे (उत्पत्ती ३९:९). तो माणसांच्या नजरेपेक्षा देवाच्या उत्तरदायित्वात जीवन जगत होता.

प्रेषित पौल या मनोवृत्तीबद्दल बोलतो:

“आपण सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहावेच लागेल” (२ करिंथकरांस ५:१०)

अत्यंत प्रभावी लोक असे जीवन जगतात जणू देव पाहत आहे—कारण तो खरोखर पाहत आहे. ही जाणीव उद्देश शुद्ध करते, निर्णयांना योग्य दिशा देते आणि स्वभावाला स्थिरता आणते. 

ही आहे सवय क्रमांक ४.
जेव्हा अनंतकाळच आपली दृष्टी बनतो, तेव्हा जीवनात स्पष्टता, धैर्य आणि टिकणारा प्रभाव निर्माण होतो.

बायबल वाचन योजना: उत्पत्ति ३७-३९
प्रार्थना
पित्या, मला नेहमी अनंतकाळ लक्षात ठेवून कार्य करण्यास मदत कर. माझ्या बोलावणीपासून मला दूर नेणारे प्रत्येक विचलन उपटून टाक. खरे महत्त्व काय आहे यावर लक्ष केंद्रित ठेवण्यास मला सहाय्य कर, आणि प्रत्येक दिवस तुझ्याप्रती व तुझ्या उद्देशाप्रती मी उत्तरदायी आहे, या जाणिवेत जगायला मदत कर. येशूच्या नावाने. आमेन!!

Join our WhatsApp Channel


Most Read
● मार्गहीन प्रवास
● दिवस ०९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● तुम्ही येशू कडे कसे पाहता?
● दार बंद करा
● सुदृढ मन हे एक दान आहे
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● दिवस २५:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन