आणि आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालापर्यंत गौरव असो. आमेन." (२ पेत्र ३:१८)
अनेक जण कृपेच्या कल्पनेस समजण्यास चुकतात. ते विश्वास ठेवतात की पापा पासून ही क्षमे ची पूर्तता व एक बेपर्वा जीवनशैली जगण्यासाठी बहाणा आहे. कृपा ही पापा ला न्यायी ठरविण्यासाठी बहाणा नाही. बायबल रोम ६:१ मध्ये म्हणते, "तर आतां आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापांत राहावे काय?"
कृपेच्या पुरवठ्यासाठी देवाचा उद्देश हा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे व त्यांनी नीतिमान असे जगावे. सतत पापात राहून व पावित्रीकरणासाठी त्याच्या हाकेकडे सतत दुर्लक्ष करण्याद्वारे आपण त्याच्या कृपेला निराश करीत राहावे याची तो मान्यता देत नाही. प्रियांनो, तुम्हांला त्याच्या कृपे द्वारे विश्वासाच्या कुटुंबात बोलाविले गेले आहे आणि तुम्ही त्यामध्ये वाढावे याची अपेक्षा केली जात आहे. देवाकडून इतर कोणत्याही प्रगटीकरण सारखे, येथे नेहमीच अल्पांश लोक असतील जे देवाच्या कृपेला समजणार नाहीत व त्याचा गैरवापर करतील.
कृपे मध्ये वाढणे याचा अर्थ तुमच्या आध्यात्मिक जीवना विषयीच्या सर्व जबाबदाऱ्या देवावर सोडून देणे नाही जसे अनेक जण विचार करतात की कृपे ने त्यांना आळशी होऊ दिले पाहिजे. नाही! कृपे मध्ये वाढणे हे देवाचे ज्ञान व त्याच्या वचना मध्ये वाढणे होय. ते नीतिमत्व, शुद्धीकरण व पावित्रीकरण मध्ये वाढणे होय. परमेश्वर इच्छा बाळगतो की सर्व मनुष्यांनी कृपे मध्ये वाढावे व जसे तो पवित्र आहे तसे पवित्र व्हावे, की एक ख्रिस्ती असे परिपक्व व्हावे, व शुद्ध व्हावे, व त्याच्या साठी सत्यात व प्रीतीत वेगळे केलेले व्हावे. प्रार्थना व वचनाच्या सेवेला समर्पित व्हावे. (प्रेषित ६:४)
कृपे मध्ये वाढण्याचा अर्थ हा नाही की जी कृपा देवाने दिली आहे त्यामध्ये वाढ व्हावी. त्याऐवजी, ही त्या समजेची गहनता आहे जे ख्रिस्ताने आपल्यासाठी केले आहे व वचनास स्वतःला समर्पित करण्याद्वारे हे सत्य जगावे व आपल्या जीवनात त्याचे कार्य होऊ दयावे. देवाचे मुल म्हणून, तुम्ही जी कृपा प्राप्त केली आहे त्यास तुम्ही समजावे ही अपेक्षा आहे. देवाच्या पूर्णते मध्ये प्रवेश करण्यासाठी व विश्वासणाऱ्याचे जतन व्हावे म्हणून हे दान महत्वाचे आहे. कृपा एका ख्रिस्ती व्यक्तीला सहज वाढी साठी समर्थ करते!
जरी आपण आपल्या देवाबरोबरच्या चालण्यात मोठे पल्ले गाठलेले असले व पवित्र आत्म्यासह अधिक घनिष्ठ झालेलो असलो, आपण कृपे मध्ये वाढतो जेव्हा आपण येशू सारखे जास्त होत जातो, त्याच्या प्रतिमे मध्ये परिवर्तीत होतो आणि आपल्या पूर्वीच्या स्वयं च्या जीवनात कमी होत जातो. आज्ञाधारक राहण्यात तुम्ही स्वतःला संघर्षात पाहत आहात काय? गुप्त पापा बरोबर संघर्षात आहात? प्रार्थना व वचन साठी काहीही इच्छा किंवा आतुरता नाही?
देवाच्या कृपे मध्ये जो पुरवठा उपलब्ध केला गेला आहे तो तुम्हाला मान्य करावयाचा आहे. सत्य हे आहे की, कृपे मध्ये वाढल्या शिवाय तुम्ही तारणाचा मार्ग चालू शकत नाही. सुवार्ता! परमेश्वराने त्याच्या अमर्यादित ज्ञानामध्ये, जितक्यांना त्याच्यामध्ये वाटेकरी व्हावयास वाटते तितक्यांसाठी त्याची कृपा उपलब्ध केली आहे. आपले नीतिमत्वाचे चालणे हे आपल्या सामर्थ्याने नाही परंतु त्याच्या कृपे द्वारे आहे. हे समजणे तुमच्या गरज व वाढी साठी त्याच्यावर विसंबून राहावयास लावेल.
देवाच्या कृपे मध्ये वाढणे हाच केवळ त्याच्याबरोबर आपल्या घनिष्ठ संबंधात स्थिर होण्याचा मार्ग आहे. एक वैचारिक निर्णय घेण्याद्वारे कृपे मध्ये वाढण्याची निवड करा की आजच वचनाचे एक विद्यार्थी व प्रार्थनेची आवड असणारे व्हावे. देवाची कृपा ही उपलब्ध आहे जेव्हा तुम्ही त्याच्या वाढी साठी प्रयत्नशील राहता. शालोम!
प्रार्थना
पित्या, तुझ्या कृपे साठी मी तुझे आभार मानतो. ह्या कृपेचा मी एक कृतज्ञ स्वीकारणारा आहे. मी स्वीकारतो की माझ्या स्वतःहून मला सामर्थ्य नाही. मी मागत आहे की तुझी कृपा माझ्यासाठी यावी हे परमेश्वरा. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अविश्वास● भूतकाळातील कपाट उघडणे
● प्रीति-जिंकण्याची योजना -२
● कुटुंबात चांगला वेळ घालवा
● समृद्धीची विसरलेली किल्ली
● देवाच्या वचनात बदल करू नका
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 4
टिप्पण्या