कामाच्या ठिकाणाचे जीवन हे मागणी, ठरलेला कालावधी आणि उच्च अपेक्षांनी भरलेले असते. एखाद्या दिवशी पूर्णपणे प्रेरणाहीन भावनेने सकाळी उठणे सहज असते. मला एकदा एका तरुण कार्यकारी अधिकाऱ्याकडून हे म्हणत संदेश आला, “पास्टर, कृपा करून आज माझ्यासाठी प्रार्थना करा कारण काम करण्याची आज मला इच्छा नाही.” सरळ सत्य हे आहे की, जर तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या काम करण्यासाठी निर्देश देऊ देता, तर तुम्ही तुमच्या संभाव्य शक्तीपर्यंत कधीही पोहचू शकणार नाही. तर मग जेव्हा तुम्हाला काम करण्याचे मन नाही आणि तरीही अशा दिवशी काहीतरी निर्माण करणारे असे राहता तेव्हा तुम्ही यावर कशी मात करता?
मनाच्या इच्छेप्रमाणे प्रेरित कामाची समस्या
जेव्हा तुम्हाला असे वाटते तेव्हाच काम करण्याचा मोह तुमच्या यशाला गंभीरपणे मर्यादित करू शकतो. तुम्ही कदाचित अशी वाक्ये ऐकली असतील, “तुमच्या आवडीच्या कामाचे अनुसरण करा” किंवा “काम हे मनोरंजन झाले पाहिजे.” तुम्ही जे करता त्याचा तुम्ही आनंद घेतला पाहिजे हे खरे असले तरी, सत्यता ही आहे की प्रत्येक दिवस हा उत्साहाने भरलेला असणार नाही. कल्पना करा जर खेळाडू केवळ तेव्हाच सराव करतील, जेव्हा त्यांना तसे करण्याचे मन आहे,-तर अनेक जण ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणे तुमच्या कारकिर्दीची भरभराट होणार नाही, जर तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या कृत्यांवर नियंत्रण करू द्याल.
नीतिसूत्रे १४:२३मध्ये असे म्हटले आहे, “सर्व श्रमात लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्रय येते.” हे वचन आपल्याला शिकवते की, तुम्हाला काहीही वाटत असले तरी यश हे परिश्रमिक कामाने येते. कठीण दिवसांमधून पुढे जाण्यात मूल्य आहे. महानता ही दैनंदिन जीवनातून पिळून निघण्याने येते.
तुमच्या भावनांना समजणे
तुम्ही तुमच्या मनाच्या वृत्तीवर मात करण्यापूर्वी, त्यास समजणे हे महत्वाचे आहे. आपल्या भावनांवर अनेक घटकांचा प्रभाव असतो- तणाव, पुरेशी झोप नाही, न सोडवले गेलेले विषय, किंवा सरळपणे काहीतरी जसे भूक देखील असते. कमी उत्तेजना-असणाऱ्या दिवशी, तुम्हाला असे का वाटत आहे हे तुमच्या स्वतःला विचारण्यासाठी काही क्षण घ्या. मूळ कारण ओळखणे हे त्यावर मात करण्यासाठी कधीकधी पहिले पाऊल होऊ शकते.
नीतिसूत्रे ४:२३मध्ये बायबल आपल्याला स्वयं-जागृतीच्या महत्वाविषयी सांगते, “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.” तुमच्या भावना आणि आध्यात्मिक अवस्थेविषयी विचार करण्याद्वारे, तुम्ही तुमची कृत्ये आणि प्रतिसादांना उत्तमरित्या नियंत्रणात ठेवू शकता.
भावनांपासून कटिबद्ध होण्याचा बदल
तुम्हाला प्रेरणा का वाटत नाही हे एकदा तुम्ही ओळखले, तर दुसरी पायरी ही भावनांपासून कटिबद्ध होण्याकडे बदल करणे आहे. तुमच्या कामासाठी तुमच्या कटिबद्धतेला तुमच्या मनाच्या इच्छेने नाही ठरवले पाहिजे. तुम्हाला आवडत नसले तरी जेव्हा तुम्ही कामावर हजर होता, तेव्हा तुम्ही दीर्घकालीन यशासाठी आवश्यक शिस्त बनवत असता.
प्रभू येशूने स्वतः ह्या तत्वाला प्रदर्शित केले. जेव्हा त्याने गेथसेमाने येथे प्रार्थना केली, तो अत्यंत दु:खात होता, दु:खाचा प्याला त्याच्यावरून टळून जावो ह्यासाठी देखील विनंती करत होता (मत्तय २६:३९). तरीही, त्याने भावनांपेक्षा कटिबद्ध असण्याची निवड केली, हे म्हणत, “ माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” हे एक शक्तिशाली स्मरण आहे की आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कधीकधी आपल्याला असमाधानकारक भावनांमधून पुढे वाट काढली पाहिजे.
तुमच्या कार्यशीलतेला चालना देण्यासाठी काही व्यवहारिक सूचना
मनाच्या इच्छेवर आधारित कामाच्या सवयींवर मात करण्यास मदत करण्यासाठी येथे काही व्यवहारिक योजना आहेत :
- उद्धीष्टाला लहान पायऱ्यांमध्ये विभागा नेहमी, भारावून जाण्याच्या भावनेमुळे विलंब होऊ शकतो. उद्धीष्टाला लहान पायऱ्यांमध्ये विभागल्याने, व्यवस्थापन करता येणाऱ्या पायऱ्या, तेव्हा तुम्ही भारावून जाण्याच्या भावनेला कमी कराल, आणि तुमच्या प्राप्तीच्या भावनेला वाढवाल.
- एक दिनचर्या तयार करा खेळाडू त्यांना कसे वाटते यावर आधारित ते सराव करण्याचा निर्णय करत नाहीत. त्यांच्या मनाची इच्छा काहीही असली तरी, त्यांना एक नियमित दिनचर्या असते जे ते पाळतात. एक दिनचर्या स्थापित केल्याने, जेव्हा तुम्हाला आवडत नसले तरी तुम्ही तुमच्या मनाला काम करण्यासाठी प्रेरित करू शकता. उपदेशक ९:१० आपल्याला हे सल्ला देते, “जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर.” कृत्यांमध्ये सातत्य कालांतराने परिणाम निर्माण करते.
- तुमच्या “का” वर केंद्रित राहा जेव्हा प्रेरणा धूसर होते, तेव्हा मोठ्या दृश्याची तुम्हाला आठवण देण्यास ते मदत करते-तुमचा “का.” तुम्ही हे पाऊल का उचलले? तुमच्या कुटुंबाला साहाय्य करण्यासाठी, अनुभव प्राप्त करण्यासाठी किंवा एखादा आवेश पूर्ण करण्यासाठी ते केले का? तुमचा उद्देश मनात ठेवण्याने, कठीण दिवसांमधून पुढे वाटचाल करण्यासाठी ते तुम्हाला मानसिक चालना देईल.
- प्रार्थना आणि वचन जेव्हाजेव्हा कामामध्ये तुमचे मन अडथळा करते, तेव्हा काही क्षण घ्या आणि थांबा आणि प्रार्थना करा. फिलिप्पै. ४:१३ म्हणते, “मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे.” प्रार्थना तुम्हाला पुनः लक्ष्य केंद्रित करू देते, आणि पुढे वाटचाल करण्यासाठी तुम्हाला आवश्यक भावनात्मक आणि आध्यात्मिक शक्ती प्रदान करते.
- पुढे वाटचाल करत राहा कधीकधी, एक थोडेसे अंतर चालणे किंवा शारीरिक हालचाल ही आळशीपणाला काढून टाकते. तुमच्या शरीराची हालचाल करणे हे तुमच्या मनाला चालना देते, जे शक्तिवर्धक उर्जा निर्माण करते जे तुमच्या मनाच्या इच्छेला प्रेरणा देऊ शकते.
तुमच्या मनाला रूपांतरित करा
शेवटी, मनाच्या इच्छेनुसार कामावर मात करणे हे तुमच्या मनाला रूपांतरित करण्याबद्दल आहे. रोम. १२:२ आपल्याला शिकवते, “म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ द्या. “तुमच्या हृदयाचे अनुसरण करा” किंवा “तुम्हाला जेव्हा प्रेरणा वाटेल तेव्हा काम करा” हे जग तुम्हाला सांगू शकते, परंतु बायबल आपल्याला प्रोत्साहन देते की आपण आपल्या स्वतःला परिश्रम, शिस्तबद्धता, चिकाटीशी कटिबद्ध करावे.
जर तुम्ही ह्या तत्वांचा सातत्याने सराव केला, तर तुम्हाला हे आढळेल की तुम्ही अधिक प्रभावी झाले आहात आणि मनाच्या इच्छेप्रमाणे बदलण्यास कमी झाले आहात.
ह्या संघर्षामध्ये तुम्ही केवळ एकटेच नाहीत. प्रत्येक व्यक्ती, मग तो कितीही यशस्वी असो, ह्यांच्या जीवनात असे दिवस येतात जेव्हा त्यांना काम करण्यास मन लागत नाही. परंतु जे यशस्वी होतात आणि जे होत नाहीत यांच्यामधील फरक हा त्यांमधून पुढे वाटचाल करण्याची त्यांची क्षमता आहे. प्रार्थना आणि वचनाच्या सामर्थ्याने प्रेरित लहान, सातत्यपूर्ण पाऊले उचलण्यास कटिबद्ध होण्याद्वारे आजच सुरुवात करा. तुम्ही लवकरच हे ओळखाल की तुमच्या प्रभावी कार्यामध्ये तुमच्या मनाची इच्छा ही अंतिम नाही.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, जेव्हा माझी शक्ती धूसर होते आणि प्रेरणा कमी होते, तेव्हा मला तुझी शक्ती आणि उद्देशाने भरून टाक. तुझ्या योजनेवर भरवसा ठेवून, प्रत्येक आव्हानामधून पुढे जाण्यास मला मदत कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● यातना-मार्ग बदलणारा● ते व्यवस्थित करा
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
● तुम्ही त्यांच्यावर प्रभाव टाकला पाहिजे
● प्रार्थनेचा सुगंध
● ख्रिस्ती लोक डॉक्टर कडे जाऊ शकतात काय?
● ते खोटेपण उघड करा
टिप्पण्या