डेली मन्ना
दिवस ११:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Thursday, 21st of December 2023
37
27
1325
Categories :
उपास व प्रार्थना
कृपेने उन्नत
“तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो.” (१ शमुवेल २:८)
“कृपेने उन्नत” साठी “दैवी प्रकटीकरण” हा आणखी एक शब्द आहे.
तुमच्या सध्याच्या स्तराचे यश काहीही असो, येथे दुसरे स्तर आहे, आणि ते उत्तम स्तर आहे. आपल्याला ताऱ्यासारखे चमकावयाचे आहे आणि आपला मार्ग सिद्ध दिवसासाठी प्रज्वलित आणि प्रज्वलित चमकावयाचा आहे. (मत्तय. ५:१४; नीतिसूत्रे ४:१८)
कृपा ही देवाकडून पात्र नसतानाही झालेली पसंती आहे. आपण त्यासाठी पात्र ठरत नाही; आपण त्यासाठी काम करू शकत नाही, हे काहीतरी आहे जे केवळ तो आपल्याला देतो. पवित्र शास्त्र येशूला “अनुग्रह आणि सत्याने परिपूर्ण” असा व्यक्ती म्हणून वर्णन करते (योहान. १:१४, १७). आजारी लोकांना बरे करण्याने, मृतांतून उठविण्याने, भुकेल्यांना भोजन दिल्याने, आणि काना येथील विवाह समारंभात जोडप्याची लाज राखण्याने येशू ख्रिस्ताने देवाची कृपा स्पष्टपणे प्रदर्शित केली. जे सर्वकाही येशूने आपल्याला दाखवले हे तेच होते जे देवाची कृपा लोकांच्या जीवनात करू शकत होती.
म्हणून, मित्रा, तुम्हांला देवाच्या कृपेची आवश्यकता आहे.
आपल्याला देवाच्या कृपेची आवश्यकता आहे का? देवाची कृपा मनुष्याच्या जीवनात काय करू शकते? जर कृपेचा अभाव असला, तर काय घडेल?
देवाच्या कृपेचे महत्व
१. जेव्हा तुमच्या मानवी शक्तीने तुम्हांला अपयशी केले आहे तेव्हा देवाच्या कृपेची आवश्यकता असते
तुमच्या जीवनात काही क्षण येतात जेथे तुमची शक्ती तुम्हांला अपयशी करते. या क्षणी, तुम्ही तुमच्या स्वतःला साहाय्य करू शकत नाही, आणि तुम्ही केवळ देवावर विसंबून राहता कारण तुम्हांला पराभूत व्हायचे नसते. जर तुम्ही या मुद्द्यापर्यंत पोहचले आहात, तर लक्षात ठेवा २ करिंथ. १२:९ म्हणते, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.”
२. अशक्य वाटणारी कामे करण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते
“तेव्हा त्याने मला उत्तर केले, ‘जरुब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे; बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे महान पर्वता, तू काय आहेस? जरुब्बाबेलपुढे तू सपाट मैदान होशील; व तो त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह, असा गजर करत कोनशीला पुढे आणील.” (जखऱ्या ४:६-७)
३. जेव्हा सर्व आशा नष्ट होतात तेव्हा देवाच्या कृपेची आवश्यकता असते
“शिमोनाने त्याला उत्तर दिले, ‘गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो” (लूक. ५:५). जेव्हा सर्व आशा नष्ट होतात, तेव्हा जसे त्याने पेत्रासाठी केले तसे देव अशक्य ते करू शकतो.
४. जेव्हा तुमच्याकडून काहीही चांगले होणार नाही असे लोकांना वाटते तेव्हा देवाच्या कृपेची आवश्यकता असते
“नथनेल त्याला म्हणाला, ‘नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?’ फिलीप्प त्याला म्हणाला, ‘येऊन पाहा.’” (योहान. १:४६)
“तो (गिदोन) त्याला म्हणाला, ‘प्रभो, इस्राएलाला मी कसा सोडवणार? माझे कूळ मनश्शे वंशात सर्वात दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.’ परमेश्वर त्याला म्हणाला, ‘खरोखर मी तुझ्याबरोबर असेन; जसे एका माणसाला मारावे तसे एकजात साऱ्या मिद्यानाला तू मारशील.” (शास्ते ६:१५-१६)
५. आशीर्वाद ज्यासाठी तुम्ही पात्र नाहीत त्याचा आनंद घेण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते
“ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापायला मी तुम्हांला पाठवले; दुसऱ्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमाचे वाटेकरी झाला आहात.” (योहान. ४:३८)
६. जेव्हा तुम्हांला मोठी कामे करायची असतात तेव्हा देवाच्या कृपेची आवश्यकता असते
“मी तुम्हांला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.” (योहान. १४:१२)
त्याने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा दिला आहे; म्हणून, एखाद्याला कोणताही बहाणा नाही. परमेश्वरासाठी आज महान कामे करण्यासाठी देवाच्या कृपेचा पूर्ण लाभ घ्या.
७. देवाकडून काहीही प्राप्त करण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते
कृपेवाचून, तुम्ही देवाबरोबर काहीही बोलण्यास किंवा त्याच्याकडून काहीही प्राप्त करण्यासाठी पात्र नाही.
“तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.” (इब्री. ४:१६)
८. तुमचे परिश्रम तुम्हांला ३० वर्षांमध्ये जे देऊ शकले नाही ते देवाची कृपा तुम्हांला ३ महिन्यात देऊ शकते
अलौकिक वेगासाठी कृपा ही योग्यता आहे की जीवनाच्या कोणत्याही पैलूंमध्ये जे लोक आधीच तुमच्या पुढे आहेत त्यांच्याही पुढे जावे. दैवी प्रकारे हे सर्व प्रक्रिया आणि शिष्टाचारांना काढून टाकणे आहे, आणि तुम्हांला थोड्याशा वेळेत अद्भुतरित्या सर्वांच्या पुढे आणणे आहे.
“परमेश्वराचा वरदहस्त एलीयावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून अहाबापुढे इज्रेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला” (१ राजे १८:४६). मी प्रार्थना करतो की देवाचा हा हात जो संदेष्टा एलीयावर होता तो इतरांपेक्षा यशस्वी होण्यासाठी येशूच्या नावाने तुमच्यावर आणि माझ्यावर येवो.
हे शक्य आहे की वरदान प्राप्त केलेले असावे पण उन्नत केलेले नाही. आपल्या समाजात पुष्कळ बुद्धिमान लोक अजूनही बेरोजगार आहेत. पुष्कळ सुंदर स्त्रिया या अजूनही अविवाहित आहेत. वैवाहिक जीवनात स्थिर होण्यासाठी, चांगली नोकरी मिळण्यासाठी, आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते. काही निश्चित सद्गुण जीवनास मधुर करतात, आणि देवाची कृपा ही त्यांपैकी एक आहे. जीवन ज्यात कृपेचा अभाव आहे ते संघर्ष करेल. तुमची शक्ती जे तुम्हांला देऊ शकत नाही ते कृपा प्रदान करू शकते.
माझी इच्छा आहे की तुम्ही आज देवाच्या कृपेसाठी आक्रोश करावा. जितके अधिक तुम्हांला देवाच्या कृपेबद्दल जाणीव असते तुमच्या जीवनात तितकेच अधिक ती सक्रीय आहे हे तुम्ही पाहाल.
कृपेद्वारे ज्यांना उन्नत केले गेले त्यांची पवित्र शास्त्रातील काही उदाहरणे
अ]. मफीबोशेथ
पांगळ्या लोकांना राजवाड्यात येऊ दिले जात नसत; पण देवाच्या कृपेने, मफीबोशेथला उन्नत करण्यात आले. एक दिवस असा आला जेव्हा राजा दाविदाने सीबा नामक माणसाला आज्ञा दिली, जो पूर्वी राजा शौलाचा सेवक होता. त्याला प्रश्न विचारण्यात आला, “ज्याच्यावर देवाप्रीत्यर्थ मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय?” सीबा राजाला म्हणाला, ‘योनाथानाचा एक पुत्र अजून आहे, तो पायांनी लंगडा आहे” (२ शमुवेल ९:३). दाविदाने ताबडतोब लो-दबाराहून मफीबोशेथला आणले, जेथे तो राहत होता. (२ शमुवेल ९:१-१३ वाचा)
ब]. योसेफ
योसेफ एक अनोळखी व्यक्ती म्हणून मिसर देशावर राज्य करण्यासाठी पात्र नव्हता; पण कृपेने त्यास पात्र ठरवले. कृपा तुमच्या आणि माझ्यासारख्या व्यक्तींना आपल्या शत्रूंच्या मध्ये शासन करू देते.
“४२ मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली; मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले; आणि ‘मुजरा करा’ असे ते त्याच्यापुढे ललकारत चालले. ह्या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले. फारो योसेफाला म्हणाला, ‘मी फारो खरा,’ पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलवणार नाही.” (उत्पत्ती ४१:४२-४४)
क]. एस्तेर
कृपेने, एक गुलाम मुलगी एका अनोळखी देशात राणी झाली. कृपा ही शिष्टाचारामध्ये हस्तक्षेप करते.
इतर सर्व स्त्रियांपेक्षा राजाला एस्तेर आवडली आणि सर्व कुमारीकांपेक्षा तिने त्याच्या दृष्टीत कृपा आणि पसंती मिळवली, म्हणून त्याने राजेशाही मुकुट तिच्या डोक्यावर ठेवला आणि वश्ती ऐवजी तिला राणी केले. (एस्तेर २:१७)
ड]. दावीद
कृपेने दाविदाला जीवनाच्या मागील बाकावरून पुढील बाकावर नेले. रानात मेंढरे चारण्यापासून दैवीरित्या संपूर्ण राष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी त्याला उन्नत करण्यात आले.
“तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले.” (२ शमुवेल ७:८). हेच तुमच्या बाबतीतही घडू शकते.
कृपेचा आनंद घेण्यासाठी आणि कृपेत वाढण्यासाठी काय केले पाहिजे?
१. कृपेसाठी प्रार्थना करा
“आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास, तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात घे.” (निर्गम ३३:१३)
२. नम्र बना
“तो अधिक कृपा करतो; म्हणून शास्त्र म्हणते, ‘देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” (याकोब ४:६)
३. इतरांप्रती कृपाळू राहा
देवाने तुमच्याशी जसे वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही लोकांशी वागा. (मत्तय. ७:१२)
४. देवाच्या कृपेबद्दल अधिक जाणीव ठेवा, आणि त्याविषयी अधिक अध्ययन करा.
“तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर.” (२ तीमथ्य. २:१५)
५. मोठ्या आणि लहान सर्व गोष्टींबद्दल देवाचे आभार माना
“सर्व स्थितीत उपकारस्तुती करा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.” (१ थेस्सलनीका. ५:१८)
६. जे पुरुष आणि स्त्रिया कृपेला धारण करून आहेत त्यांच्याकडून कृपेची मागणी करा
कृपा ही अभिषिक्त पात्राने हस्तांतरित केली जाऊ शकते.
“मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन, आणि तुझ्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील; मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही.” (गणना ११:१७)
प्रार्थना
तुमच्या मनातून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच मग पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार करा, त्यास वैयक्तिक करा आणि कमीत कमी १ मिनिटासाठी तसे प्रत्येक प्रार्थना मुद्द्याबरोबर करा.)
१. मागासलेपणा आणि कुंठीत होण्याच्या आत्म्याचा येशूच्या नावाने मी नाकार करतो. (फिलिप्पै. ३:१३-१४)
२. मी येशूच्या नावाने गौरवापासून गौरवापर्यंत प्रगती करतो. (२ करिंथ. ३:१८)
३. पित्या, माझ्या जीवनात प्रगती करण्यासाठी मला येशूच्या नावाने कृपा प्रदान कर. (रोम. ५:२)
४. पित्या, येशूच्या नावाने मला उत्कृष्ट आत्मा प्रदान कर. (दानीएल ६:३)
परमेश्वरा, प्रत्येक बाजूने माझी महानता येशूच्या नावाने वाढव. (स्तोत्र. ७१:२१)
५. परमेश्वरा, तुझ्या कृपेने येशूच्या नावाने हेवा वाटावा अशा स्थानापर्यंत मला उन्नत कर. (स्तोत्र. ७५:६-७)
६. पित्या, आशीर्वादाच्या स्थानी मला येशूच्या नावाने स्थिर कर. (अनुवाद २८:२)
७. पित्या, मला उत्तम म्हणून निवडण्यात आणि प्राधान्य देण्यात यावे म्हणून येशूच्या नावाने मजवर कृपा कर आणि त्यासाठी कारणीभूत कर. (१ शमुवेल १६:१२)
८. परमेश्वरा, तुझी कृपा येशूच्या नावाने उच्च स्थानी माझ्यासाठी बोलावी असे कर. (एस्तेर ५:२)
९. देवाच्या कृपेने, येशूच्या नावाने मी स्वीकारला जाईल; नाकारला जाणार नाही. मी वर असेन, खाली नाही; मी उसणे देणारा असेन, उसणे घेणारा नाही. (अनुवाद २८:१३)
१०. पित्या, ते सर्व जे ४० दिवसांच्या उपास कार्यक्रमाचा हिस्सा आहेत, त्या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांना येशूच्या नावाने उच्च स्थानी उन्नत कर. (यशया ५८:११)
११. परमेश्वरा, माझ्या जीवनाच्या विरोधातील शत्रूची कोणतीही योजना उधळून टाक, आणि तुझे सत्य माझी ढाल व कवच होवो. (स्तोत्र. ९१:४)
Join our WhatsApp Channel
Most Read
● २१ दिवस उपवासः दिवस ०३● संकटाच्या काळाकडे पाहणे
● बारा मधील एक
● तुमची सुटका आणि स्वास्थ्याचा उद्देश
● तुमच्या अनुभवांना वाया घालवू नका
● दुसऱ्यावर दोष लावणे
● ते खोटेपण उघड करा
टिप्पण्या