"ते त्याला उपकारस्मरणरूपी यज्ञ अर्पोत, व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णोत." (स्तोत्रसंहिता 107:22)
जुन्या करारात बलिदान सोबत रक्ताचे सांडणे हे नेहमीच सामाविलेलेआहे. नवीन करारात, आपल्या प्रभु येशूने स्वतःला आपल्या सर्वांसाठी एक सिद्ध अर्पण असे दिले. आता रक्त सांडण्याची गरज राहिलेली नाही.
तथापि, बायबलअवश्य"धन्यवादाचे अर्पण" याविषयी बोलते
बायबल आपल्याला आदेश देते की आपल्याला देवाच्या उपस्थितीसमोर नेहमीच धन्यवाद आणि स्तुती द्वारे आले पाहिजे (स्तोत्रसंहिता 100:4). आता काही वेळ अशी येते जेव्हा आपल्या जीवनात काही गोष्टी ह्या चांगल्या होत नसतात;
आपल्या कुटुंबात, आणि तरीसुद्धा आपण देवाला धन्यवाद आणि स्तुतीचे अर्पण सादर करण्यास निवडतो. हे अक्षरशः आपल्या आतमध्ये रक्त वाहविते.
मला तुमच्याबद्दल ठाऊक नाही परंतु माझ्या जीवनात अशी एक वेळ आली होती जेव्हा मी ह्या दरी मधून गेलो. तुमचेशरीर तुमच्याकडे पुन्हा ओरड करते हे म्हणत, "तू देवाला कशा बद्दल धन्यवाद देत आहे? येथे काहीही चांगले घडत नाही आणि तरीसुद्धा तुम्ही ही निवड करता हे म्हणत, "परमेश्वरा, तुझ्या तारणा बद्दल मी तुझा आभारी आहे. मी तुझा आभारी आहे की येथपर्यंत मला आणले आहे." एक बलिदान म्हणजे ते तुम्हाला काही किंमत मोजावयाला लावेल. तुम्ही अक्षरशः रडू लागाल.
म्हणून यास धन्यवादाचे अर्पण म्हटले आहे. ह्या प्रकरणात अर्पण हे तुमच्या शिवाय इतर नाही.
कधीकधी आपल्या शारीरिक शरीरास देवाला धन्यवाद देण्याची इच्छा होत नाही. तथापि, "सर्वपरिस्थितीमध्ये" आपल्याला देवाला धन्यवाद दिला पाहिजे कारण आपल्यासाठी देवाची हीच इच्छा आहे (1 थेस्सलनी 5:18). आपल्यासाठी देवाची हीच इच्छा आहे की नेहमी, प्रतिदिवशी त्यास धन्यवाद दयावे, मग याची पर्वा नाही की आपण कोणत्या परिस्थिती मधून जात आहोत.
जेव्हा आपण संपूर्ण दिवसातून जातो, तेथे काही आवाहने असतील जी आपल्या विरोधात येतात. ही आवाहने आपल्याला सर्व गोष्टींमध्ये कुरुबुर आणि तक्रार करावयास लावतात. अशा वेळेला, आपल्या मधील देवाची शांति आपण कशी सांभाळून ठेवतो. बायबल आपल्याला यामधील रहस्य कलस्सै 3:15 मध्ये प्रकट करते,
"ख्रिस्ताचीशांति तुमच्या अंतःकरणात राज्य करो; तिच्याकरिता तुम्हांला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा."
संपूर्ण दिवसभर धन्यवादाचे आचरण सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, बोला, "परमेश्वरा, मी तुझा आभारी आहे की तू मला साहाय्य करेल की ह्या परिस्थिती वर नियंत्रण मिळवावे. मी तुझा आभारी आहे की तूं सिंहासनावर विराजमान आहेस आणि विजय हा माझा आहे. येशूच्या नांवात.
त्यामुळे, त्याचे नाव पत्करणाऱ्या 'ओठांचे फळ' असा'स्तुतीचा यज्ञ आपण' त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा' (इब्री 13:15).
इतरत्र पाहण्या ऐवजी आणि ह्या जगाच्या नकारात्मकतेला बळी पडण्याऐवजी, सभोवतीपाहा ज्या कशाविषयी तुम्ही धन्यवादी व्हावे. शब्द'नित्य' ह्या कडे लक्ष दया.
दुसऱ्याशब्दात,आपल्याला धन्यवाद ही सवय लावून घ्यायला पाहिजे आणि हीकेवळ एक घटना नाही.
जेव्हा तुम्ही असे सतत करीत राहता, तुम्ही हे पाहाल की देवाची शांति प्रत्येकपरिस्थिती मध्ये प्रवाहित होण्यास सुरुवात होईल. हे तुम्हाला देवाबरोबर घनिष्ठ संबंधात जाण्यास प्रेरित करेल. आपले मन, शरीर आणि आत्म्या मध्ये शांति हे धन्यवाद देण्याच्या आपल्या आचरणाशी संबंधित आहे.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी तुझा आभारी आहे की तू मला येथपर्यंत आणले आहे आणि तूविश्वासयोग्य आहे की तू मला येथून पुढे सुद्धा नेईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार कसे व्हावे-२● दानीएलाचा उपास
● तुमच्या अंत:करणाचे परिश्रमपूर्वक रक्षण करा
● २१ दिवस उपवासः दिवस ०१
● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● प्रीति साठी शोध
● आत्म्यात उत्सुक असा
टिप्पण्या