'दानधर्म करण्याची कृपा' ही आपली शृंखला आपण पुढे चालू ठेवत आहोत. आपण त्या कारणांकडे पाहणार आहोत की दानधर्म करणे हे आपल्या आध्यात्मिक वाढी साठी का महत्वाचे आहे.
२. परमेश्वर आपल्या दानधर्मात हर्ष करतो.
लूक ६:३८, "दया म्हणजे तुम्हांस दिले जाईल; चांगले माप दाबून, हालवून व शींग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही दयाल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल."
खरे दानधर्म करणे हे समजण्याने सुरु होते की "त्याच्याकडून, त्याच्याद्वारे आणि त्यासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याला युगानुयुग गौरव असो." (रोम ११:३५. ३६) दुसऱ्या शब्दात, तोच सर्व जीवनाचे स्त्रोत, माध्यम व ध्येय आहे.
आपण जेव्हा परमेश्वराला अशा मनाने देतो, ते त्या आशीर्वादास मोकळे करते जे वाढीची शास्वती देते. मार्टिन लुथर ने एकदा म्हटले, "मी माझ्या हातात काही गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या सर्व गमाविल्या, परंतु परमेश्वराच्या हातात ज्या मी दिल्या, त्या अजूनही माझ्याकडे आहेत.
लूक ६:३८ वाचणे हे मोहात पाडणारे होऊ शकते आणि केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करावे की दिल्यानंतर आपण काय प्राप्त करतो, परंतु असे करण्याने आपण मुद्दा गमावू शकतो. आपण प्रामुख्याने देतो कारण परमेश्वर आपल्या उदारतेमध्ये हर्ष करतो. परमेश्वर दान देणाऱ्याकडे आकर्षित होतो. "हर्षाने देणारे परमेश्वरास आवडतात" (२ करिंथ ९:७)
३. आपले दानधर्म करणे द्वार उघडते
"तिने जाऊन एलीयाच्या सांगण्याप्रमाणे केले; तो, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला." (१ राजे १७:१५)
विधवेला आशीर्वादित केले व तिने तिच्या कुटुंबासह अवश्य अनेक दिवस भोजन केले. तिच्या देण्याने तिच्यासाठी व तिच्या कुटुंबासाठी आशीर्वादाचे द्वार उघडले. अनेकांना ही समज नसते आणि म्हणूनच जेव्हा अभाव असतो त्यावेळी दान देण्यात संघर्ष करतात.
त्याने (कर्नेल्य) दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेल्या, अशी आपणास हाक मारीत आहे. तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय, महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. (प्रेषित १०:३-४)
कर्नेल्य हा कोणी असा नव्हता की ज्याने परमेश्वराची उपासना केवळ शब्दाने केली होती; त्याने त्याची उपासना कृती मध्ये पूर्ण केली होती. पवित्र शास्त्र कर्नेल्या ला असे संबोधिते की ज्याने नियमितपणे देवाच्या कार्यासाठी व देवाच्या लोकांसाठी दानधर्म केले होते.
कर्नेल्याच्या दानधर्म करण्याने देवदूताकडून एक अद्भुत भेटी साठी द्वार उघडे केले होते. परमेश्वराने त्याच्या महान प्रेषित-पेत्रा ला सुद्धा मार्गदर्शन केले की, जावे आणि कर्नेल्याच्या कुटुंबियांना तारणाचा संदेश सांगावा.
तर मग तुम्ही पाहा, की बीज पेरणे हे परमेश्वराच्या-प्रमाणाच्या पीक साठी द्वार उघडते. प्रत्येक बीज जे तुम्ही कधी पेरले असेन ते परमेश्वरा समोर स्मरणार्थ आणण्यात येईल आणि त्या बीज च्या प्रत्युत्तरात तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तो तुम्हाला पुरवेल.
यशया ४५:१-२ मध्ये परमेश्वराने हे आश्वासन दिले आहे हे म्हणत, "परमेश्वर म्हणतो, त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करितो......मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करून, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन."
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी घोषणा करतो की मी दिले आहे आणि चांगले माप दाबून, हालवून व शींग भरून माझ्या पदरी घालतील; सर्व पुरुष व स्त्री मला दानधर्म करतील. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-२● भेट देणे व प्रकटीकरण देण्यामध्ये
● दिवस ३७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दिवस १४ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● ऐक्य आणि आज्ञाधारकपणाचा दृष्टांत
● विश्वासाची शाळा
● आपल्या तारणाऱ्याची विनाअट प्रीति
टिप्पण्या