डेली मन्ना
तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
Friday, 23rd of April 2021
27
22
1577
Categories :
प्रार्थना
सामान्यपणे, जेव्हा तुम्ही लोकांबरोबर बोलता, तेव्हा तुम्ही प्रत्युत्तरात उत्तराची अपेक्षा करता. कधीकधी तुम्ही लोकांना विनंती करता ज्यांवर तुम्ही प्रत्युत्तरासाठी पूर्णपणे भरंवसा ठेवीत नाहीत. अशा लोकांबरोबरच्या पूर्वीच्या व्यवहारा संबंधी तसे असू शकते, ज्यांबरोबर अनेक निराशांच्या ओझ्यांनी तुम्हाला कष्टी अंत:करणाने रडवले असेल.
वास्तवात, मनुष्य तुम्हांला अपयशी करू शकतो परंतु परमेश्वर कधीही अपयशी ठरत नाही! बायबल स्पष्टपणे सांगते की, "देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?" (गणना २३:१९). जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा तुमच्या विनंती साठी देवाकडे उत्तरा साठी तुम्ही भरवंसा ठेवू शकता.
देवाच्या एका महान माणसाने एकदा म्हटले होते, "आपल्या प्रार्थना ह्या कदाचित विचित्र असतील. आपले प्रयत्न हे कमकुवत असतील. परंतु कारण की प्रार्थनेचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे जो ते ऐकतो आणि एकदाही तो असे म्हणत नाही, आपल्या प्रार्थना काही फरक करीत नाहीत."
लोक जेव्हा लहान बालकांना आश्वासने देतात आपल्याला ठाऊक आहे की किती निष्पापपणे ते त्यावर विश्वास ठेवतात की जसे आश्वासन दिले आहे तसेच खातरीने ते पूर्ण केले जाईल. देवा जवळ आपल्या प्रार्थने मध्ये हे असंभव असे नाही, की परमेश्वर आपल्याला सांगतो की जे काही आपण त्याच्याजवळ त्याच्या इच्छेनुसार मागतो, तो ते ऐकतो. जर एक लहान बालक सिगारेट मागेल, तर एक समजदार वयस्कर व्यक्ति अशा गोष्टीला कधीही उत्तर देणार नाही. त्याप्रमाणेच, जोपर्यंत आपल्या प्रार्थना देवाच्या नांवाला आपल्या जीवनाद्वारे गौरव आणीत राहते, कारण आपल्याला ह्या अंधाऱ्या जगात प्रकाशा सारखे चमकायचे आहे, आपण पूर्णपणे आत्मविश्वासी आहोत की तो अशा गोष्टी ऐकतो, आणि आपण जे त्याला मागितले आहे त्यासाठी आपण उत्तर प्राप्त करतो. (१ योहान ५:१४-१५)
परिस्थिती कशीही असो, परमेश्वर तरीही प्रार्थनांचे उत्तर देतो. बायबल हे त्या पुरुषांच्या कथांनी भरलेले आहे ज्यांनी साक्ष दिली आहे की परमेश्वराने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या व त्यास प्रत्युत्तरे दिली आहेत. संदेष्टा जखऱ्या त्यापैकी एक मनुष्य होता. त्यास एक विशेष आवाहन होते, जी त्याची असमर्थता होती, त्याच्या पत्नीसह, की अधिक काळ पर्यंत बाळाला जन्म देऊ शकले नव्हते, परंतु त्याने धैर्य सोडले नव्हते. शेवटी, एका विशेष दिवशी, तो केवळ त्याच्या याजकीय कर्तव्या साठी चालला होता, तेव्हा देवदूत प्रगट झाला व म्हणाला, "भिऊ नको, जखऱ्या: कारण तुझ्या प्रार्थना ऐकण्यात आल्या आहेत." (लूक १:१३)
तुम्हांला आठवते काय जेव्हा प्रेषित पेत्रा ला तुरुंगात टाकले होते? त्याच्या सुटके साठी त्यांनी कदाचित इतर माध्यमाचा शोध घेतला असता, परंतु पेत्राच्या सुटके साठी काहीतरी अलौकिक घडले. प्रेषित १२:५ म्हणते, "ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता; परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती."
तुम्ही काय शोधत आहात-एक नोकरी, चांगले वैवाहिक जीवन, सेवाकार्यात यश, चांगले आरोग्य, एक बाळ? परमेश्वराकडे प्रार्थना करा, जो आपल्याला प्रत्येक चांगले व सिद्ध दान पुरवितो (याकोब १:१७ वाचा). तुमच्या आवाहनांना प्रार्थने मध्ये देवा कडे न्या, आणि जर तुम्ही तुमच्या समस्यांविषयी देवाला सांगू शकला, तो ते तुमच्यासाठी खातरीने पूर्ण करेल.
प्रार्थना
पित्या, तुझा धन्यवाद होवो, कारण तूं नेहमीच ऐकतो, जेव्हा मी प्रार्थना करतो. माझे अंत:करण मोठयाने आनंद करते, कारण मी त्या देवाची सेवा करतो, जो प्रार्थनांची उत्तरे देतो. मी माझ्या मार्गांना तुला सोपवीत आहे. माझा आत्मविश्वास हा इतर कशा मध्येही नाही परंतु केवळ तुझ्यामध्ये आहे. येशूच्या सामर्थी नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● धन्यवादाचे अर्पण● चांगले आर्थिक व्यवस्थापन
● कुटुंबात चांगला वेळ घालवा
● ख्रिस्ताबरोबर बसलेले
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे
● चला आपण परमेश्वराकडे वळू या
● कोणाच्या वार्तेवर तुम्ही विश्वास ठेवाल
टिप्पण्या