डेली मन्ना
दिवस १७ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Wednesday, 27th of December 2023
36
26
1151
Categories :
उपास व प्रार्थना
अग्नीचा बाप्तिस्मा
“तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तर थकणार नाहीत.” (यशया ४०:२९-३१)
जुन्या करारात, देवाचे सामर्थ्य किंवा उपस्थिती दर्शवण्यासाठी अग्नीचा कधीकधी उपयोग केला गेला आहे. जेव्हा एलीयाला याव्हे हा इस्राएलचा खरा परमेश्वर आहे याचा पुरावा द्यायचा होता, तेव्हा त्याने याव्हे खरा देव आहे याचा राष्ट्राला पुरावा देण्यासाठी अग्नीच्या परीक्षेचा वापर केला. त्याने म्हटले, “जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा” (१ राजे १८:२४). अग्नीच्या बाप्तिस्म्याला सामर्थ्याचा बाप्तिस्मा किंवा नवीन अग्नीचा बाप्तिस्मा देखील संबोधले जाऊ शकते. भाषा जी शत्रू समजतो ती शक्ती आहे, जेव्हाजेव्हा तुम्ही अंधाराच्या शक्तींशी सामना करता, शक्ती मोकळी केली गेली पाहिजे.
एक विश्वासणारा आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत असू शकतो. जरी त्याला देवाच्या शक्तीचे अत्यंत सामर्थ्य उपलब्ध असले तरी देवाच्या त्याच्या ज्ञानामध्ये वाढल्यावाचून आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालवल्यावाचून तो विश्वासू शक्तिहीनच असेल.
देवाचा आत्मा “अभिषेक, अग्नी, आणि देवाची शक्ती” यास संबोधते.
तुम्ही हे समजावे ही माझी इच्छा आहे की पवित्र आत्मा प्रमाणात दिला जातो, म्हणून जेव्हाजेव्हा तुम्ही अग्नीच्या बाप्तिस्म्यासाठी प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही सरळपणे अभिषेक, अग्नी आणि देवाच्या शक्तीच्या मोठ्या प्रमाणाचा धावा करत आहात. ख्रिस्ताला प्रमाणावाचून पवित्र आत्मा मिळाला, परंतु एक विश्वासणारे म्हणून, आपण आत्म्याला प्रमाणात प्राप्त करतो, आणि आत्म्यासंबंधी सतत अधिक प्राप्त करत राहू जोपर्यंत आपण ख्रिस्ताच्या पूर्ण प्रतिष्ठेप्रत वाढत नाहीत.
“कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो; कारण देव आत्मा मोजूनमापून देत नाही” (योहान. ३:३४)
बाप्तिस्म्याचे प्रकार
१. पाण्याने बाप्तिस्मा
पाण्याने बाप्तिस्मा आपल्याला ख्रिस्ताच्या शरीरात एकरूप करतो.
“कारण आपण यहूदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत.” (१ करिंथ. १२:१३)
२. अग्नीने बाप्तिस्मा
अग्नीने बाप्तिस्मा आपल्याला ख्रिस्ताच्या शक्तीच्या बाजूने एकरूप करतो. अग्नीने बाप्तिस्मा अन्य भाषेत बोलण्याच्या पुराव्यासह येतो.
“ परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रेषित. १:८)
अग्नीने बाप्तिस्म्याची तुम्हांला आवश्यकता का आहे?
१. अग्नीने बाप्तिस्मा होण्याची तुम्हांला आवश्यकता आहे म्हणजे तुम्ही ख्रिस्ताच्या सुवार्तेची प्रभावीपणे साक्ष देऊ शकाल. (प्रेषित. १:८)
२. अग्नीने बाप्तिस्मा होण्याची तुम्हांला आवश्यकता आहे म्हणजे तुम्ही शत्रूच्या हल्ल्यांवर प्रभुत्व करू शकाल.
“देवाला म्हणा, ‘तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात.” (स्तोत्र. ६६:३)
३. अग्नीने बाप्तिस्मा होण्याची तुम्हांला आवश्यकता आहे म्हणजे तुम्ही देवाच्या राज्यासाठी मोठी कामे कराल.
“मी तुम्हांला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यांपेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.” (योहान. १४:१२)
४. अग्नीने बाप्तिस्मा होण्याची तुम्हांला आवश्यकता आहे म्हणजे तुम्ही राज्यांवर प्रभुत्व कराल, अंधाराच्या कामांना नष्ट कराल, आणि वाईट भारांना मोडून काढाल.
“३३ त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, ३४ अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बंळांचे सबळ झाले, तर लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. ३५ स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणांस अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले.” (इब्री. ११:३३-३५)
५. अग्नीने बाप्तिस्मा होण्याची तुम्हांला आवश्यकता आहे म्हणजे तुम्ही बंदिवानांना मुक्त करू शकता.
“परमेश्वर म्हणतो, ‘हो, वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील; जुलमी पुरुषाने केलेली लुट सोडवण्यात येईल; कारण तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांबरोबर मी युद्ध करीन व तुझ्या मुलांचा उद्धार करीन.” (यशया ४९:२५)
६. अग्नीने बाप्तिस्मा होण्याची तुम्हांला आवश्यकता आहे म्हणजे तुम्ही सैतानाला काढून टाकू शकता, आणि त्यांच्या राज्यासाठी आतंक होऊ शकता.
“१७ आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील: ते माझ्या नावाने भुते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, १८ सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.” (मार्क. १६:१७-१८)
७. शक्तीवाचून, भुते गुप्त ठिकाणी लपतील. हे केवळ शक्तीनेच त्यांना त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून पळवून लावले जाईल. बचावणे आणि विजयासाठी शक्तीची आवश्यकता असते.
“४४ माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच; ते माझ्या अधीन झाले; परदेशीय लोकांनी माझी खुशामत केली. ४५ परदेशीय लोक गलित झाले; ते आपल्या कोटांतून कापत कापत बाहेर आले.” (स्तोत्र. १८:४४-४५)
आत्म्याच्या अग्नीला कोणत्या गोष्टी विझवू शकतात?
“आत्म्याला विझवू नका” (१ थेस्सलनीका. ५:१९)
१. वासना आणि पापी विचार (मत्तय १५:१०-११; १७-२०)
२. या आयुष्याची चिंता (मार्क. ४;१९)
३. प्रार्थनाहीनता (लूक. १८;१)
४. क्षमाहीनता (इफिस. ४:३०)
५. खोटेपण, भीती, शंका आणि अविश्वास (रोम. १४:२३)
आध्यात्मिक शक्ती तुम्ही कशी वाढवू शकता?
१. उपास आणि प्रार्थना करा
उपास तुम्हांला आध्यात्मिक अधिकाराच्या उच्च क्षेत्रामध्ये नेऊ शकतो.
जेव्हाजेव्हा आपण उपास करत असतो, तेव्हा तेव्हा आपण देवासोबत एका नवीन भेटीसाठी आपल्याला योग्य करत असतो. तुम्हांला देवासोबत नवीन भेट होऊन तुम्ही कमकुवत असे राहू शकत नाही. प्रत्येक भेट नवीन अग्नी निर्माण करतो.
२. देवाचे वचन
देवाचे वचन सामर्थ्याने भरलेले आहे, ज्या प्रत्येकवेळी तुम्ही त्याचा अभ्यास करता, त्यावेळी तुम्ही शक्तीची नवीन ठेव प्राप्त करता.
“कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री. ४;१२)
देवाच्या वचनात सामर्थ्य आणि उर्जा आहे. देवाच्या वचनाचा अभिषेक देवाच्या आत्म्याने होतो. जर तुम्ही वचनात वेळ घालवला, तर तुम्ही आध्यात्मिक शक्ती निर्माण कराल.
“मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.” (यिर्मया २०:९)
३. स्वयंचा मृत्यू
स्वयंचा मृत्यू झाल्याशिवाय, आत्म्याची शक्ती तुमच्या जीवनात वाढू शकत नाही. देवाची शक्ती देवाच्या उद्देशासाठी पाहिजे. जेव्हा स्वयं क्रुसित केले जात नाही, तेव्हा देवाची शक्ती स्वार्थी उद्देशासाठी वापरली जाऊ शकते.
“मी तुम्हांला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो.” (योहान. १२:२४)
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. पित्या, येशूच्या नावाने मला अग्नीने बाप्तिस्मा दे. (मत्तय. ३:११)
पित्या, येशूच्या नावाने नवीन कामे करण्यासाठी मला समर्थ कर. (दानीएल ११:३२)
२. पित्या, संपत्ती प्राप्त करण्यासाठी येशूच्या नावाने मला शक्ती प्रदान कर. (अनुवाद ८:१८)
३. सैतानी बालेकिल्ले आणि मर्यादा मोडण्यासाठी येशूच्या नावाने मी शक्ती प्राप्त करतो. (२ करिंथ. १०:४)
४. पित्या, येशूच्या नावाने मला आत्मे जिंकण्यासाठी नवीन अग्नी हवा आहे. (लूक. १२:४९)
५. पित्या, आत्म्याच्या नऊ वरदानांनी माझ्या जीवनात कार्य करावे अशी येशूच्या नावाने मी इच्छा करतो. (१ करिंथ. १२:४-११)
६. पित्या, येशूच्या नावाने, कृपा करून ते काहीही माझ्या जीवनातून उपटून टाक जे मला अग्नीचा बाप्तिस्मा घेण्यापासून अडथळा करत आहे. (मत्तय. १५:१३)
७. हे परमेश्वरा, तुझ्या अग्नीने, माझ्या जीवनातून पापी इच्छा आणि सवयी येशूच्या नावाने नष्ट होवोत. (रोम. ६:१२-१४)
८. पित्या, तुझ्या पवित्र अग्नीने माझे शरीर, जीव आणि आत्मा येशूच्या नावाने शुद्ध कर. (१ थेस्सलनीका. ५:२३)
९. पित्या, तुझ्या पवित्र आत्म्याने नवीनरित्या भरण्याची येशूच्या नावाने मी इच्छा करतो. (इफिस. ५:१८)
१०. मी वाया गेलेले जीवन जगणार नाही येशूच्या नावाने. (स्तोत्र. ९०:१२)
११. उत्कृष्टतेसाठी अभिषेक, येशूच्या नावाने मजवर आणि या उपास आणि प्रार्थनेच्या २१ दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांवर राहो. (यशया १०:२७)
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुम्हांला एकासदुपदेशकाची का गरज लागते● दिवस ०६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● प्रचलित अनैतिकतेमध्ये स्थिर राहणे
● जीवनाच्या चेतावणीचे पालन करणे
● कालेबचा आत्मा
● दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● अद्भुतरित्या नवीन मार्ग सापडणे (दिवस 13)
टिप्पण्या