डेली मन्ना
महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-२
Thursday, 9th of May 2024
25
17
687
Categories :
जीवनाचे धडे
आपण आपल्या ह्या शृंखलेमध्ये पुढे जात आहोत, "महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते", आपण दाविदाच्या जीवनाकडे पाहत आहोत आणि महत्वाच्या धड्यांची चाळण करीत आहोत जे आपल्याला खळगे व पीडा पासून वाचवितील.
संध्याकाळच्या समयी दावीद पलंगावरून उठून राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला. (२ शमुवेल ११:२)
पवित्र शास्त्र सांगते की तो त्याच्या पलंगावरून उठला. हे दर्शविते की राजा खूप उशिरा झोपला होता.
विशेषकरून, राजाचे निवास हे शहराच्या उंच ठिकाणी असत. त्याकाळी यरुशलेमेत घरांची छप्परे ही सपाट होती. लोकांचे पाण्याचे भांडे छतावर असत की दिवसा ते गरम व्हावे आणि मग संध्याकाळी त्यांना त्या गरम पाण्याने अंघोळ करता यावी. हा काही योगायोग नव्हता. दाविदाला हे अगोदरच ठाऊक होते की तो कोणत्या परीक्षेला तोंड देणार आहे जेव्हा तो शहराकडे त्यावेळी पाहिल. तरीही, तो त्यात गुंतला. तो चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी होता. याने पुढे दाविदाच्या पतनास खतपाणी पुरविले.
जेव्हा पेत्राने प्रभूचा नकार केला होता, तेव्हा तो कोठे होता? तो इतर शिष्यांकडून वेगळा केला गेला होता जेव्हा तो स्वतःला मुख्य याजकाच्या घराबाहेर शेकोटीने गरम करीत होता. अविश्वासू व निंदा करणाऱ्यांबरोबर तो बसला होता. आणि तेथे त्या अग्नीच्या प्रकाशात, तो प्रभूला ओळखत आहे हे त्याने तीन वेळा निर्लज्जपणे नाकारले. स्पष्टपणे पेत्र हा चुकीच्या लोकांबरोबर चुकीचे वेळी चुकीच्या ठिकाणी होता. त्याचे पतन होण्यामागे हे कारण होते.
बायबल मध्ये दावीद व पेत्र हेच केवळ व्यक्ति नाहीत जे पापामध्ये पडले कारण ते चुकीच्या वेळी एका चुकीच्या ठिकाणी होते. दाविदाची पत्नी मीखल ने सुद्द्धा स्वतःला संकटात टाकले होते कारण ह्या सिद्धांताचे उल्लंघन केले होते.
दावीद सणाचे एफोद कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करीत चालला. दाविदाने व सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वराचा कोश जयजयकार करीत व शिंगे फुंकीत वर आणिला. परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असता शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचतबागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला. (२ शमुवेल ६:१४-१६)
बायबल याची नोंद करते, "शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही." (२ शमुवेल ६:२३)
मीखल त्या मिरवणुकीस खिडकीतून का पाहत होती? ती त्या उत्सवामध्ये सहभागी का होत नव्हती? ती एक इस्राएली, अब्राहामाची वंशज होती. ती सुद्धा दाविदाप्रमाणे देवाचा कोश घरी येत आहे पाहून उत्साही व्हावयास पाहिजे होती. कदाचित तिच्याकडे कारण असेल की प्रत्यक्षात तेथे खाली जाऊ नये परंतु तिचे वागणे दाखविते की तिचे हृदय सुद्धा तेथे खाली नव्हते. ती तीचा बाप शौलाच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत होती ज्याने नेहमीच देव काय विचार करतो त्यापेक्षा लोक काय विचार करतात त्यावरच विचार केला होता.
एक व्यक्ति चुकीच्या ठिकाणी जाऊन व चुकीच्या वेळी चुकीच्या लोकांबरोबर राहण्याद्वारे अनावश्यकपणे स्वतःवर परीक्षा आणू शकतो. आपण आश्चर्य करू नये जेव्हा असे लोक शेवटी चुकीच्या गोष्टी करतील.
आता, मी असे म्हणत नाही की जर तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी असाल, तर सर्व परीक्षा ह्या निघून जातील. परंतु निश्चितपणे, तुम्ही अनावश्यक दबावात राहणार नाही जे तुम्ही स्वतःच तुमच्यावर आणता. तुम्ही जास्तकरून शांति मध्ये व देवाच्या इच्छे मध्ये राहाल.
प्रार्थना
पित्या, मी तुला धन्यवाद देतो की तूं आमच्या आयुष्याचे दिवस मोजून ठेवले आहेत. तूं जो वेळ मला दिला आहे त्याच्या बुद्धिमानपणे उपयोग करण्यास मला साहाय्य कर. योग्य लोकांसोबत योग्य वेळी योग्य ठिकाणी मला राहू दे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शांति तुम्हाला कसे बदलते ते शिका● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● पुढच्या स्तरावर जाणे
● एका उद्देशाने जन्म घेणे
● देवाच्या सिद्ध इच्छेसाठी प्रार्थना करा
● बारा मधील एक
● परमेश्वराला महिमा कसा दयावा
टिप्पण्या