आपण जेव्हा पवित्र आत्म्याची संवेदनशीलता जोपासण्यास वेळ आणि प्रयत्न करतो, आपण पवित्र आत्म्याच्या स्तरात गोष्टी ऐकू आणि पाहू जे इतर समजू शकत नाही. चांगल्यासंधी ऐवजी आपल्याला "देवाची संधी" मिळेल, जेव्हा आपण त्यावर कार्य करू, जे आपल्या जीवनाला अधिक फळ निर्माण करू देईल, त्यामुळे हे दर्शवेल की आपण त्याचे परिपक्व शिष्य आहोत (योहान १५: ८).
येथे काही महत्वाच्या किल्ल्या आहेत की पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी
१. आत्म्यामध्ये प्रार्थना करा.
१ करिंथ १४: १४, "कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, तरमाझा आत्मा पवित्र आत्म्या द्वारे जो मजमध्ये आहे प्रार्थना करतो, परंतुमाझ्या मनाला याचा काही उपयोग होत नाही; ते काही फळ निर्माण करीत नाही आणि कोणालाही साहाय्य करीत नाही."
तुम्ही पाहा पवित्र आत्मा हा माझ्या आत्म्या मध्ये राहतो. माझ्या मानवी व्यक्तीमत्वात त्याचा पहिला संपर्क हा माझ्या मनाशी नाही, परंतु माझ्या आत्म्याशी आहे. अन्य भाषेत प्रार्थना करणे हे मला नियमितपणे साहाय्य करतेकीमाझ्या मानवी आत्म्याशी संवेदनशील राहावे. आणि कारण की पवित्र आत्मा हा माझ्या आत्म्यामध्ये आहे, अन्य भाषे मध्ये प्रार्थना करण्या द्वारे मी त्याच्याशी सुद्धा संवेदनशील राहतो.
२. देवाला मागा की त्याच्या अंत:करणासाठी संवेदनशील असावे
"मागा म्हणजे तुम्हांस दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांस सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल; कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल." (मत्तय ७: ७-८)
येथे अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही केवळ विचारल्याने प्राप्त करता.अनेक वेळेला आपण प्राप्त करीत नाही कारण आपण विचारत नाही. (याकोब ४:३)
३. त्याच्याबरोबर वेळ घालवा
कोणत्याही संबधात वेळेची मागणी असते. परमेश्वराबरोबर घनिष्ठता हा प्राथमिकतेचा विषय आहे. जीवनात तुम्ही कशाला अधिक महत्वाचे समजता? तुम्हाला कदाचित तुमच्यादिवसाच्या कार्याला व्यवस्थित करण्याची गरज आहे,वेळेचे काही व्यवस्थापन कौशल्य शिकावे, काही वेळेकरिता तुमचा स्मार्टफोन बंद करून ठेवावा आणि पुन्हा त्यात जाण्यास निश्चित व्हा. तुम्ही तुमच्या वेळेकरिता जबाबदार आहात आणि प्रत्येक बदल हा योग्य निर्णय घेतल्याने सुरु होतो.
४. देवाच्या उपस्थितीचा सराव करा
त्याच्या उपस्थिती विषयी अवगत होण्याची जोपासना करा.
दिवसभर त्याच्याशी बोला.मार्गदर्शन आणि कृपे साठी आणि जे काही तुम्हाला गरज आहेत्यास मागा.त्यास धन्यवाद दया, त्याचीस्तुति करा आणि तुमच्या हृदयात त्याचे गौरव करा. तुम्ही काहीही खाणे किंवा पिण्याअगोदर त्याची प्रार्थना करा. तुम्ही वाहन चालविण्याअगोदर त्याची प्रार्थना करा इत्यादी. हे तुमचे विचार व जीवनास योग्य वळण देईल.
५. पवित्रतेचा मार्ग धरा
पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. (रोम १: ४)
लक्षात घ्या, त्यास'पवित्रतेचा आत्मा' असे म्हटले आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याला आकर्षित करावयाचे आहे, तुम्हाला स्वतःला अधिक आणिअधिक पवित्र व्हावयाचे आहे. त्या कार्यांना काढून टाका ज्या त्यास प्रसन्न करीत नाही किंवा तुमची वृद्धि करीत नाही. त्या गोष्टी जाणूनबुजून करू नका ज्या त्यास दु:ख देतात. जर तुम्ही खरेच कोणाला प्रेम करता तर तुम्ही त्यास असे करणार नाही.
"..............ते जे पवित्र आत्म्यानुसार चालतात ते त्यांची मने जी आत्म्याची इच्छा आहे त्यावर स्थित करतात." (रोम ८:५)
मला आठवते एक देवाचा संदेष्टा म्हणत होता, "जर आपल्याला सतत पवित्र आत्म्याच्यास्पर्शा द्वारे जगावयाचे आहे, तर मग आपली जीवनशैली ही सुद्धा त्यास अनुरूप अशी राहिली पाहिजे. आपल्याला त्याच्याशी एकरूप असे राहण्याची गरज आहे."
Bible Reading: Song of Solomon 5-8 ; Isaiah 1
प्रार्थना
पित्या, मी प्रार्थना करतो की जो प्रत्येक जण माझ्या संपर्कात येतो त्याने माझ्या द्वारे तुझ्या आत्म्याच्या स्पर्शाचा अनुभव करावा. येशूच्या नांवात. आमेन. (दिवसभर ही प्रार्थना करीत राहा.)
Join our WhatsApp Channel

Most Read
● भविष्यात्मक मध्यस्थी काय आहे?● विश्वास काय आहे?
● चिंता करीत वाट पाहणे
● देवाच्या मंदिरातील स्तंभ
● मानवी भ्रष्टतेमध्ये देवाचा अपरिवर्तनीय स्वभाव
● दिवस ३८ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● तुमच्या मनाची वृत्ती चांगली करणे
टिप्पण्या