डेली मन्ना
आध्यात्मिक प्रवेश द्वारांचे रहस्य
Tuesday, 23rd of July 2024
30
29
457
Categories :
प्रवेशद्वारे
आज, मला तुम्हांला रहस्यांमध्ये जाण्याची गहन समज दाखवायची आहे, जे तुम्हाला आत्म्याच्या स्तरा मध्ये असामान्य प्रसिद्धी व नवीन वाटचालीस कारणीभूत होईल. तुमच्यापैकी किती जण आज रात्री काहीतरी असामान्य पाहण्यास तयार आहात?
त्याने (परमेश्वराने) आपले मार्ग मोशेला आणि
आपली कृत्ये इस्राएलाच्या वंशजांना विदित केली." (स्तोत्र १०३:७)
फरक ओळखा! त्याची कृत्ये संपूर्ण इस्राएली राष्ट्राला विदित केली गेली; परंतु त्याचे "मार्ग" हे केवळ मोशेला. आज सुद्धा, असंख्य लोक देवाची "कृत्ये" पाहून व त्याचा शोध घेण्याद्वारे समाधानी होण्यास इच्छूक आहेत परंतु काही थोडे आहेत जे मोशे प्रमाणे इच्छूक आहेत की त्याचे "मार्ग" जाणावे. वचन, उपासना, प्रार्थना व आज्ञाधारकपणा मध्ये देवाच्या जवळ जाण्याद्वारे.
परमेश्वराला पाहिजे की त्याचे मार्ग आपल्याला दाखवावे. युद्धाच्या दरम्यान, तातडीच्या प्रसंगादरम्यान, येथे काही निश्चित मार्ग आहेत जे राजा व त्याचे सरदार वापरतात. हे मार्ग सामान्य जनतेसाठी उपलब्ध नाहीत. त्याप्रमाणेच आत्म्यामध्ये असामान्य मार्ग आहेत. जेव्हा येथे दुष्काळ, युद्ध आहे, परमेश्वर हे असामान्य मार्ग वापरेल की त्याच्या लोकांची सेवा करावी.
ईयोब २८:७-८ मध्ये बायबल म्हणते,
"ती वाट कोणा हिंस्र पक्ष्यास ठाऊक नाही; कोणा घारीचीही दृष्टी तिजवर गेली नाही. तिच्यावर कोणा उन्मत्त पशूने पाय ठेविला नाही; तिच्यावरून उग्र सिंह कधी चालला नाही."
मी विश्वास ठेवतो की परमेश्वरास पाहिजे की त्याच्या लोकांनी आत्म्याच्या उच्च स्तरा मध्ये यावे जेथे सैतान व त्याच्या भूतांना प्रवेश नाही. सैतान हा दोष देणारा म्हणून कदाचित जितके पाहिजे तितकी गर्जना करेल, परंतु येथे मार्ग आहेत, जेथे त्यास प्रवेश नाही. हे प्राचीन मार्ग आहेत. अनेक जण यांस देवाची गुप्त स्थाने असे सुद्धा संबोधितात. आणि मी विश्वास ठेवतो परमेश्वर हे केवळ त्यांस दाखवेल जे त्याच्या कार्यक्रमात- राज्याचे कार्यक्रम, यात रुची ठेवतात.
आत्म्याच्या स्तरा मध्ये येथे प्रवेशद्वारे आहेत, येथे मार्ग आहेत जे पुरुष व स्त्रियांस आत्म्याच्या स्तरातील कृपा व समजेचे विविध परिमाण उघडे करते.
प्रेषित योहानाने पात्म बेटावर लिहिले, ".....पाहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले." (प्रकटीकरण ४:१)
स्वर्गामध्ये हे एक खरी वाट होती. हेल्लेणी भाषे मध्ये शब्द वाट हे "थूरा" असे आहे याचा अर्थ:
१. एक प्रवेशद्वार किंवा प्रवेश मार्ग
२. दार
३. फाटक
हा शब्द पवित्र शास्त्रात विशेषपणे वापरलेला नाही, परंतु कल्पना ही तेथे निश्चितच आहे.
हे फारच मनोरंजक आहे हे लक्षात घेणे की योहान त्या प्रवेशद्वार, त्या दाराने आत गेला आणि लगेचच तो स्वर्गात होता. तो पृथ्वीवर होता, ज्यावेळेस त्याने त्या दाराने प्रवेश केला, त्या प्रवेशद्वाराने, त्या फाटका द्वारे तेव्हा तो स्वर्गात होता. हे जसे काही ते दार पृथ्वीला स्वर्गास जोडलेले होते, आत्म्यामध्ये प्रवेशद्वार, एक दार किंवा फाटक द्वारे हाच काय तो माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. काही धर्मनिरपेक्ष वैज्ञानिक आता किड्यांचे छिद याविषयी बोलत आहेत.
आज, जगभर, येथे अनेक लोक आहेत, जे देवा-द्वारे दिले गेलेल्या दृष्टांतांची नवीन द्वारे उघडी होत आहेत हे पाहत आहेत. ह्यापैंकी काही द्वारे ही वावटळ, तेजस्वी सोनेरी द्वार असे आहेत. हे लोक प्रत्यक्षात काय पाहत होते ते आत्म्यामध्ये प्रवेशद्वारे किंवा फाटके होती. कदाचित तुम्ही सुद्धा त्यांना पाहिले असेल आणि समजेच्या अभावामुळे त्याशी संबंध जोडू शकला नसाल. मी आज तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहे की तुम्ही आत्म्याच्या स्तरा मध्ये ह्या प्रवेशद्वारांच्या समजेस प्राप्त करावे.
प्रार्थना
पित्या, माझे डोळे व कान उघड की देवाचा आत्मा काय म्हणत आहे ते ऐकावे. प्रकटीकरण ३:१८ नुसार, "अंजन सह माझ्या डोळ्यांस अभिषेक कर की येशूच्या नांवात मी पाहू शकावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● गमाविलेले रहस्य● देवासारखा विश्वास
● आश्वासित देशामध्ये बालेकिल्ल्यांना हाताळणे
● यशाची परीक्षा
● धन्य व्यक्ती
● दिवस १२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● देवाच्या प्रकारची प्रीति
टिप्पण्या