डेली मन्ना
24
20
417
देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा
Monday, 18th of August 2025
Categories :
आत्म्याची नावे आणि शीर्षके
देवाचे ७ आत्मे
सात आत्म्यांपैकी पहिला ज्याचा उल्लेख संदेष्टा यशया ने केला तो परमेश्वराचा आत्मा आहे. यास प्रभूतेचा आत्मा किंवा वर्चस्वाचा आत्मा सुद्धा म्हणतात.
तोच एकमेव आहे जो आपल्याला सेवा करण्याच्या सामर्थ्या सह अभिषिक्त करतो. प्रत्येक वेळी तुम्ही त्यास जुना आणि नवीन करार मध्ये पाहता, तो नेहमीच "आपल्यावर येतो."
शास्ते ६ मध्ये,जेव्हा इस्राएल सीमे वर शत्रूच्या सेने ने डेरा दिला, हे स्पष्ट करते: परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला, तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबियेजरी त्याला येऊन मिळाले.
जेव्हा शमशोन ला बांधण्यात आले आणि पलिष्टी लोकांद्वारे धरून देण्यासाठी तसेच सोडून देण्यात आले, बायबल स्पष्ट करते: तो लेहीपर्यंत येऊन पोहचला तेव्हा पलिष्टी त्याला पाहून जयघोष करू लागले. इतक्यात परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्यांच्यावर झडप घातली. त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीने जळलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली. मग गाढवाचे नवे जाभाड त्याला सापडले; ते हातात घेऊन एक हजार लोकांना त्याने ठार केले. (शास्ते १५: १४-१५)
एकदाकी देवाचा आत्मा तुमच्यावर येतो, तेव्हा तुम्ही एक साधारण व्यक्ति राहत नाही. तुम्हांला देवाचे धैर्य येते कीकाहीही करावे जे काही त्याच्या इच्छेनुसार आहे. "कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे." (२ तीमथ्यी १: ७)
प्रभु येशूने जोर देऊन घोषित केले,
"परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठविले आहे, ते अशांसाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांस सोडवून पाठवावे; परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षांची घोषणा करावी." (लूक ४: १८-१९)
अनेक वेळेला मी संदेश देण्याअगोदर, मी परमेश्वराच्या आत्म्याचा अभिषेक माझ्यावर येण्यासाठी वाट पाहतो. तेव्हा तुम्ही निश्चित होता की आता येथून पुढे तुम्ही नाही. मी आता पूर्णपणे वेगळा व्यक्ति आहे.
सुवार्ता ही आहे की तोच देवाचा आत्मा जो प्रभु येशू वर उतरला तो आपल्यावर सुद्धा आहे. तुम्ही आणि मी आता सर्व सामर्थ्याची कार्ये करू शकतो जी प्रभु येशूने केली आणि त्याहूनही अधिक.
Bible Reading: Jeremiah 23-24
अंगीकार
देवाचा आत्मा हा माझ्यावर आहे. मी मोठमोठी कार्ये येशूच्या नांवात करेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● अद्भुतरित्या नवीन मार्ग सापडणे (दिवस 13)● अडथळ्यांची भिंत
● संयम आत्मसात करणे
● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- १
● जिवासाठी देवाचे औषध
● प्रीति-जिंकण्याची योजना -१
● याबेस ची प्रार्थना
टिप्पण्या