डेली मन्ना
ख्रिस्ता द्वारे विजय मिळवणे
Tuesday, 14th of May 2024
24
17
590
Categories :
परमेश्वराची योजना
विश्वास
प्रकटीकरणाच्या संपूर्ण पुस्तकात, प्रभू येशू ते जे विजय मिळवणारे आहेत त्यांच्यासाठी बक्षीस आणि आशीर्वादाबद्दल बोलत आहे. विजय मिळवणारा असणे हे परिपूर्ण असण्याबद्दल नाही, पण त्याऐवजी विश्वासाला जपणे आणि आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या विजयाला प्रकट करण्याबद्दल आहे. ख्रिस्ता द्वारे विजय मिळवणारा म्हणजे काय याचे स्पष्टीकरण पाहू या.
योहान १६:३३ मध्ये, प्रभू येशू घोषित करतो, “जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.” हे वचन आपल्याला स्मरण करून देते की आव्हाने आणि परीक्षा ह्या जीवनाच्या अपरिहार्य भाग आहेत. तथापि, येशूने आपल्या वतीने आधीच विजय मिळवून दिला आहे. त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे, त्याने पाप, मृत्यू आणि अंधाराच्या शक्तीवर विजय मिळवला आहे.
विजय मिळवणारा असणे म्हणजे आपला विश्वास ख्रिस्तावर ठेवणे आणि आपल्या नाही, तर त्याच्या शक्तीवर विसंबून राहणे आहे. याचा अर्थ कठीण परिस्थितीतून मार्ग काढणे, हे जाणून की देव आपल्यासोबत आहे आणि तो आपल्याला कधीही सोडणार नाही (अनुवाद ३१:८). याचा अर्थ देवाच्या आश्वासनावर दृढ राहणे आहे, जरी जेव्हा परिस्थिती ही त्याच्या उलट दिसत असते. प्रकटीकरण १२:११ मध्ये, आपण पाहतो की विजय मिळवणारे ते आहेत ज्यांनी “शत्रूवर कोकऱ्याच्या रक्ताने आणि त्यांच्या साक्षीने” विजय मिळवला आहे.
विजय मिळवणारे म्हणून, ख्रिस्ताने जे सर्व आशीर्वाद आणि संसाधने आपल्याला दिली आहेत त्याद्वारे आपल्याला प्रवेश आहे. आपण या खात्रीने परीक्षांना सामोरे जाऊ शकतो की देव त्यातून निघण्याचा मार्ग पुरवेल (१ करिंथ. १०:१३). आपण त्रास सहन करू शकतो हे जाणून की ते चारित्र्य आणि आशा निर्माण करेल (रोम. ५:३-४). आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालू शकतो, जो आपल्याला विजयी जीवन जगण्यास सक्षम करतो (गलती. ५:१६).
तुम्ही आज आव्हान किंवा परीक्षेला तोंड देत आहात का? लक्षात ठेवा की ख्रिस्ता द्वारे तुम्ही विजय मिळवणारे आहात. त्याने आधीच तुमच्यासाठी विजय जो मिळविला आहे त्यावर मनन करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुमच्या परिस्थितीवर देवाच्या आश्वासनाचा हक्क दाखवा आणि याच्या विश्वासूपणावर भरवसा ठेवा.
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर विसंबून राहा, त्याने तुम्हांला मार्गदर्शन आणि समर्थ करू द्या. तुमचे डोळे येशूवर केन्द्रीत करा, तुमच्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा. (इब्री. १२:२)
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, येशू ख्रिस्ता द्वारे विजय जो माझा आहे त्यासाठी तुझे आभार. तुझ्या विश्वासात टिकून आणि तुझ्या सामर्थ्यावर भरवसा ठेवून, विजय मिळवणारा म्हणून जगण्यास मला मदत कर, तुझी उपस्थिती आणि शक्तीच्या शास्वतीसह प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी मला धैर्य दे. माझे जीवन तुझी प्रीती आणि कृपेच्या महानतेची साक्ष देणारे व्हावे असे होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला● बदलण्यासाठी अडथळा
● तुमच्या प्रार्थनेच्या जीवनास प्रोत्साहन देण्यासाठी व्यवहारिक पायऱ्या
● त्याच्या धार्मिकतेस परिधान करा
● चालण्यास शिकणे
● येशूचे रक्त लावणे
● पुढच्या स्तरावर जाणे
टिप्पण्या