डेली मन्ना
तुम्ही कशा साठी वाट पाहत आहात?
Monday, 29th of July 2024
27
23
454
Categories :
वेळेचे व्यवस्थापन
तेव्हा लागलाच तीचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो." (मार्क ५:२९. ३४)
शुभवर्तमानामध्ये सापडणाऱ्या रक्तस्राव होणाऱ्या स्त्री ची कथा तुम्ही कदाचित खातरीने ऐकली असेन. १२ वर्षे तिला रक्तस्राव होत होता, आणि केवळ एवढेच नाही, तर ती १२ वर्षांपासून वाट सुद्धा पाहत होती. वाट पाहणे ही कडू गोळी आहे जी कोणालाही गीळूशी वाटत नाही.
तिच्याकडे जे काही होते ते तिने खर्च केले होते, जे हे स्पष्ट करते की ती संपन्न असेन, आणि तरीही ती बरी झाली नव्हती. ती उत्तम ते उत्तम चिकित्सकांना भेटली होती, जे सर्व या शोधासाठी की त्यावर उपाय मिळवावा, परंतु ते सर्व काही व्यर्थ झाले होते. ह्याक्षणी, मित्र व कुटुंब तिच्या ह्या कायम असलेल्या अवस्थेच्या कारणामुळे कदाचित तिला एकटेच टाकून सुद्धा गेले असतील. ती कदाचित एकच प्रश्न तिच्या ओठावर घेऊन प्रतिदिवशी उठत असेन, "परंतु केव्हा? "हे सर्व केव्हा थांबेल?"
जर तुम्हाला काहीतरी जे पाहिजेच होते ज्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, कदाचित आरोग्य, संबंधांमध्ये पुनर्स्थापना किंवा भावनात्मक नवीन वाटचाल, तुम्ही खातरीने हे जाणले असते की वाट पाहणे हे ती असुरक्षितता व नाजूकपणा आणते. रक्तस्रावी स्त्रीने हे सर्व काही अनुभविले. जवळजवळ दहा वर्षांपेक्षा अधिक काळ ती बरे होण्याची वाट पाहत होती. शारीरिक पीडा तसेच भावनात्मक वेदनेचे दु:ख तिने भोगले होते, आणि तिच्या रक्त वाहण्याने नियमशास्त्रानुसार तिला अशुद्ध ठरविले होते. वाट पाहणे हा तीचा दुसरा स्वभाव झाला होता, आणि प्रतीदिवशी उपाय हा तिच्यापासून दूरच जात आहे असे दिसत होते.
परंतु त्या दशकाच्या वाट पाहण्याच्या समयामधून, असे दिसते की त्या रक्तस्त्रावी स्त्रीच्या जीवा मध्ये आशेची ज्योत सतत पेटलेली होती कारण जेव्हा येशू आला, तेव्हा तिला पुरेसे धैर्य होते की बरे होण्यासाठी प्रयत्न करावा व तेथपर्यंत जावे, त्यावर पुन्हा विश्वास व आशा ठेवावी. ती कदाचित त्या सकाळी उठली असेन व स्वतःला बोलली असेन, "मी केवळ आणखी एक वेळा प्रयत्न करेन."
जर तुम्ही अशीच प्रार्थना करीत असाल व फार काळापासून देवापासून आरोग्य प्राप्त होण्याची वाट पाहत असाल, आशे मध्ये तेथवर जाण्यात धैर्य सोडू नका. लूक १८ मधील त्या स्त्री सारखे व्हा. तिने न्याय मिळविण्यासाठी अनेक वेळेला प्रयत्न केला होता, परंतु तिला माघारी परतवून दिले होते, परंतु तिने चिकाटी धरून ठेवली. म्हणून मित्रांनो, देवा पर्यंत जाण्यासाठी धैर्य सोडू नका.
देवाला मागा की रक्तस्त्रावी स्त्री प्रमाणे अढळ आशेसह प्रत्युत्तर देण्यास तुम्हांस साहाय्य करावे, जरी जेव्हा तुम्ही काहीही बदल पाहत नाही. आपल्याला जेव्हा हे माहीत नाही की परमेश्वर आपल्या वतीने कसे किंवा केव्हा कार्य करणार आहे, आपण सतत ही निवड करावी की, बरे करणे, पुनर्स्थापना व आपल्या इच्छा पूर्ण करण्यास त्याच्या सामर्थ्यामध्ये भरंवसा ठेवत त्याच्याकडे धावा करावा.
अरे! मी तुला आदेश देत आहे की ह्या सकाळी इतर सर्व पर्याय व शक्य सर्व त्वरित उपाय जे सैतान सादर करतो ते सर्व जाळून टाक. इतर आकर्षणे विसरून जा व तुझी नजर केवळ परमेश्वर व परमेश्वरावरच राहू दे. मला ठाऊक आहे की तुम्ही दीर्घकाळापासून वाट पाहिली आहे, का नाही आणखी एक पाऊल उचलावे. पुन्हा प्रार्थना कर, पुन्हा उपास कर, पुन्हा उपासना कर, पुन्हा दानधर्म कर, पुन्हा तेथवर जा, आणि मला ठाऊक आहे शेवटी तुम्ही हसाल.
प्रार्थना
पित्या, मी तुला कृपे साठी मागत आहे की पुन्हा एकदा कळकळीने व आवेशपूर्णरित्या तुझ्यापर्यंत पोहचावे. इतर सर्व पर्याय सोडून देण्यास व केवळ तुलाच धरून राहण्यास मला समर्थ कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● काही अतिरिक्त भार घेऊ नये● द्वारपाळ
● परमेश्वराची महती वर्णा व तुमच्या विश्वासाला प्रेरणा दया
● युद्धासाठी प्रशिक्षण - २
● त्याच्या प्रकाशात नातेसंबंधांचे संगोपन करणे
● देवाने-दिलेले सर्वात उत्तम स्त्रोत
● अनुकरण करा
टिप्पण्या