यहूदा मध्ये परमेश्वर प्रगट झाला आहे. (स्तोत्र ७६:१)
यहूदा(किंवाइब्री भाषेत यहूदा) हा याकोबाचा चौथा पुत्र होता, ज्यातील एक वंशज हा मशीहा होता (उत्पत्ति २९:३५; ४९:८-१२)
मनोरंजकपणे, यहूदा चा अर्थ हा 'स्तुती' आहे. यहूदा(स्तुति) मध्ये परमेश्वर ओळखला किंवा प्रगट झाला आहे.
यहूदा मध्ये परमेश्वराचे गौरव झाले आहे.(स्तोत्र ७६:१)
परमेश्वराचे गौरव होते जेव्हा आपण त्याची स्तुति करतो.
याकोबाची पत्नी, लेआ, ने तिच्या चौथ्या पुत्राचे नांव यहूदा ठेवले. तुम्हाला ठाऊक आहे का?
तिला ठाऊक होते की याकोब तीचा पती तिला प्रेम करीत नव्हता, ह्या वास्तविकतेनंतर सुद्धा की तिने त्याच्यासाठी ३ पुत्रांना जन्म दिला होता. ह्याक्षणी, त्यामध्ये, तिने निर्णय घेतला कीतो विचार करण्याचे सोडून दयावे व तिच्यासाठी याकोबाच्या प्रीतीच्या अभाव साठी शोक करू नये. तिने हे म्हटले, "आता मी परमेश्वराचे स्तवन करीन" (उत्पत्ति २९:३५). हे तेव्हा जेव्हा यहूदा चा जन्म झाला होता.
जसे यहूदा ने परमेश्वराच्या अंत:करणात विशेष स्थान स्थिर केले होते, स्तुति सुद्धा आज, देवाच्या अंत:करणात एक विशेष स्थान स्थिर करते. स्तुति ही सामर्थ्यशाली आहे, एक आवश्यकता, व देवाच्या आशीर्वाद साठी एक किल्ली आहे.
यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराला विचारले की, कनानी लोकांशी लढण्यासाठी आमच्या वतीने प्रथम कोणी स्वारी करावी? परमेश्वर म्हणाला, यहूदाने स्वारी करावी; पाहा, हा देश मी त्याच्या हाती दिला आहे. (यहोशवा १:१-२)
यहोशवा २०:१८ मध्ये आपण तीच गोष्ट पाहतो, जेव्हा युद्ध होते तेव्हा यहूदा प्रथम गेले. हे एक भविष्यात्मक चित्र आहे की आपण युद्धात कसे गेले पाहिजे. मला ठाऊक नाही तुम्ही कोणत्या युद्धास तोंड देत आहात. मला तुम्हाला भविष्यात्मक सांगावयाचे आहे कीतुम्ही युद्धात एकटेच प्रवेश करू नये, आपण यहूदास प्रथम जाऊ दयावे, परमेश्वरालास्तुति ही प्रथम गेली पाहिजे.
तुमच्या समस्या व परिस्थिती विषयी परमेश्वराकडे कुरकुर व तक्रार करीत प्रार्थने मध्ये प्रवेश करू नका. चलायहूदास प्रथम जाऊ दया, त्यासस्तुतिही प्रथम.तुम्ही पाहा यहूदा हा कुटुंबात चौथा होता, तरीही परमेश्वराच्या क्रमात तो प्रथम झाला.
कदाचित तुम्हाला परमेश्वराची स्तुति करण्याची इच्छा नाही.
कदाचित तुमच्या जीवनात परमेश्वराची स्तुति करण्यासाठी काहीही नाही. तरीहीत्याचीस्तुति करा. तो सर्व स्तुतीस पात्र आहे.
२ इतिहास २० मध्ये, जेव्हा राजा यहोशाफाट ने वाळूसारख्या असंख्य सेनेला तोंड दिले. त्यास ठाऊक होते की हे युद्ध त्याच्या शक्तीच्या पलीकडे होते. याचवेळी त्याने परमेश्वराच्या मुखाचा शोध केला. तुम्हाला ठाऊक आहे काय की त्याने युद्धात कसा प्रवेश केला जे जिंकणे अशक्य होते.
ते हे स्तोत्र गाऊनस्तवन करू लागले, तेव्हा अम्मोनी, मवाबी व सेइर पहाडातले लोक जे यहूदावर चाल करून येत होते त्यांस गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. (२ इतिहास २०:२२)
मला ठाऊक नाही की तुम्ही कोणत्या युद्धाचा सामना करीत आहात. कदाचित तो एक आजार, कोर्ट केस, ग्राहक समस्या, काही सोसायटी विषय किंवा नातेवाईक संबंधात काही अनेक वर्षांचे वाद वगैरे असेल, असे होवो की तुमच्या मुखातून परमेश्वराची स्तुति ही बाहेर पडो. असे होवो की परमेश्वराची स्तुति ही तुमच्या पोटातून जिवंत पाण्याची नदी प्रवाहित होत आहे त्याप्रमाणे होवो (योहान ७:३८). तुमच्या मुखामध्ये स्तुतीच्या गीतासहतुम्ही २०२४ मध्ये प्रवेश कराल.
देवाचा पुत्र, आपला प्रभु येशू ख्रिस्त सुद्धा ह्या पृथ्वीवर नाताळच्या रात्री स्तुति द्वारे परिचित केला गेला.
तुमच्यासाठी आज दावीदाच्या गांवात तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभु आहे; इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुति करीत म्हणाले..." (लूक २:११, १३)
४० दिवसांची बायबल वाचन योजना
मत्तय १-६
प्रार्थना
कृपा करून नोहा ऐप मधील प्रार्थना विभाग वापरा की पिता, पुत्र व पवित्र आत्म्याची स्तुति करावी. पुढील २१ दिवस हे दररोज करीत राहा. (ही भविष्यात्मक सुचना आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करू नका.)
Join our WhatsApp Channel
Most Read
● चांगले हे उत्तमतेचे शत्रू आहे● तुम्ही किती विश्वसनीय आहात?
● भटकण्याचे सोडा
● विश्वासात परीक्षा
● काहीही लपलेले नाही
● सर्वांसाठी कृपा
● ते लहान तारणारे आहेत
टिप्पण्या