डेली मन्ना
30
20
234
ख्रिस्ता मधील तुमच्या दैवी नियतीमध्ये प्रवेश करणे
Wednesday, 2nd of July 2025
Categories :
देवाचे आवाहन
माझ्या जीवनात अशी वेळ होती की परमेश्वराला मी कोठे असावे तेथे मी नव्हतो. म्हणून परमेश्वराने त्याच्या दयेमध्ये माझ्या भोवती काही घटना निर्माण केल्या आणि मला माझ्या जीवनात त्या ठिकाणी आणले ज्यांस दैवी मध्यस्थी म्हणतात. हेच ते ठिकाण होते जेथे परमेश्वराने माझे सर्व वरदान, कौशल्य व आवेश आणले की जो त्याचा हेतू आहे त्यामध्ये एक करावे.
आपल्यापैंकी जे हे वाचत आहेत त्यामुळे कदाचित भारावून गेले असाल परंतु तुम्ही परमेश्वरावर भरंवसा ठेवा, तो तुम्हाला तुमच्या दैवी नियती साठी तयार करीत आहे. पवित्र शास्त्र काय सांगते त्याकडे पाहा, "आपल्या जीवनाचे एकंदर सर्व काही एकत्र ओवले जात आहे की देवाची सिद्ध योजना आपल्या जीवनात पूर्णपणे व्यवस्थित करावी कारण आपण त्याचे प्रियकर आहोत ज्यांस बोलाविण्यात आले आहे की त्याचा दैवी उद्देश पूर्ण करावा. (रोम ८:२८ टीपीटी)
तर मग प्रश्न उपस्थित होतो, माझ्या दैवी मध्यस्थी मध्ये प्रवेश करण्यासाठी मी काय केले पाहिजे?" येथे उत्तर आहे. "तर मग, तुम्ही जेव्हा खाता किंवा पिता, किंवा जे काही तुम्ही करता, ते सर्व काही देवाच्या सन्मान व गौरवा साठी करा. (१ करिंथ १०:३१ टीपीटी)
जेव्हा तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनकार्याच्या जबाबदाऱ्या जीवनाच्या पूर्ण करता आणि जीवनाच्या लहानसहन गोष्टींमध्ये त्यांस गौरव व सन्मान देता जे त्याचे आहे, तुम्ही प्रत्यक्षात परमेश्वराला तुमच्या रोजच्या जीवनकार्यात सामावून घेत आहात. याचवेळी मग सामान्य हे अलौकिक होऊन जाते.
दुसरे, जेव्हा तुम्हाला देवाने दिलेली तुमची नियती पूर्ण करावयाची आहे, तेव्हा त्या मार्गात तुम्हाला ज्ञानी निर्णय घेण्याची गरज असते. मग तुम्ही तुमच्या कारकिर्दीसाठी मार्गदर्शन शोधत असाल, कोणाबरोबर विवाह करावा किंवा कोठे राहावे. बायबल म्हणते, "तूं आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तूं आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल." (नीतिसूत्रे ३:५-६)
मी विश्वास ठेवितो, जेव्हा तुम्ही ह्या सिद्धांतानुसार चालता, तेव्हा परमेश्वराला जे पाहिजे जेथे तुम्ही असावे तेथे तुम्ही लवकरच पोहोचाल. वाट पाहत राहा. तुम्ही लवकरच त्याच्या चांगुलपणाची साक्ष तुमच्या जीवनात देणार आहात.
Bible Reading: Psalms 64-69
अंगीकार
माझी पाऊले ही परमेश्वरा द्वारे दैवी पणे व्यवस्थित केली आहे. ख्रिस्ता मधील देवाने दिलेली माझी नियती मी पूर्ण करेन. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुमच्या पडीक जमिनीस नांगरा● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
● स्वप्न हे देवाकडून आहे हे कसे ओळखावे
● तुम्ही त्यांच्यावर प्रभाव टाकला पाहिजे
● चांगले यश काय आहे?
● मार्गहीन प्रवास
● दिवस ०४: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या