फसवणुकीचा सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे स्वतःची- फसवणूक आहे. पवित्र शास्त्र आपल्या स्वतःला फसविण्याबद्दल चेतावणी देते. "कोणी स्वतःला फसवून घेऊ नये; ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे." (१ करिंथ ३९:१८).
स्वतःची फसवणूक तेव्हा होते जेव्हा कोणीतरी:
अ. ते स्वतःला ते नसतात तसे मानतात:
गलती. ६:३ आपल्याला पुढे आणखी चेतावणी देते, "कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो."
या प्रकारच्या स्वतःच्या फसवणुकीमध्ये एक व्यक्ति स्वतःची एक चुकीची प्रतिमा बनवितो, नेहमी या इच्छेने की स्वतःबद्दल उत्तम असे वाटावे किंवा कठीण अनुभवास हाताळावे. ते त्यांच्या क्षमतांचा अतिरेक करू शकतात किंवा वास्तविकतेशी जुळत नसलेल्या भूमिका स्वीकारू शकतात. हे येशूने शिकविलेला परुशी व जकातदार यांच्या दाखल्यामध्ये पाहिले जाऊ शकते.
"९आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा: १०एक परुशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. ११परुश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, 'हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. १२मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.' १३जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, 'हे देवा, मज पाप्यावर दया कर,' १४मी तुम्हांला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल." (लुक १८:९-१४)
परुशी स्वतःला धार्मिक आहे असा विश्वास ठेवत होता, परंतु त्याच्या स्वयं-धार्मिकतेने त्याच्या खऱ्या आध्यात्मिक अवस्थेकडे त्यास आंधळे केले होते. आजच्या संदर्भात, एखादा व्यक्ति विविध कारणांनी विश्वास ठेवू शकतो की तो धार्मिक आहे; तथापि, दाखल्यामधील परुश्यासारखे, हा व्यक्ति देखील गर्व आणि स्वतःच्या धार्मिकतेने आंधळा झालेला असू शकतो, जे त्यांना त्यांच्या खऱ्या आध्यात्मिक अवस्थेस ओळखण्यास प्रतिबंध करू शकते. स्वतःच्या फसवणूकीच्या खड्ड्याला टाळण्यासाठी आपण अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
१ योहान १:८ आपल्याला चेतावणी देते, "आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही." शेवटी, तुम्ही विश्वास ठेवाल जेव्हा तुम्ही पाप करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात योग्य गोष्ट करत आहात. हे या कारणासाठी की असे तुम्ही दिर्घकालापासून करत आहात की तुमची खात्री पटली आहे की ही योग्य गोष्ट आहे.
नाझी जर्मनीच्या अंधाऱ्या आणि विनाशकारक समया दरम्यान, नाझी हे स्वतःच्या फसवणुकीच्या धोकादायक प्रकारा द्वारे ग्रासले होते ज्यामुळे अकथनीय अत्याचार झाले. त्यांच्या वांशिक श्रेष्ठतेवर त्यांनी ठामपणे विश्वास ठेवला होता आणि स्वतःला पटवून दिले होते की यहूदी लोक हेच त्यांच्या सर्व समस्यांचे मूळ कारण आहेत. द्वेष आणि भीतीने भरलेल्या या दुरावलेल्या जागतिक दृष्टिकोनाचा, राजकीय भाषणांपासून ते शालेय अभ्यासक्रमांपर्यंत समाजाच्या प्रत्येक घटकातून प्रचार करण्यात आला.
नाझी लोकांनी मग अशी योजना आखली ज्यास ते "अंतिम उपाय" म्हणतात, एक पद्धतशीर योजना की यहूदी लोकांना नष्ट करावे. या भयानक रणनीतीवर त्यांनी इतका गाढ विश्वास ठेवला की ते यहूदी लोकांचा मोठ्या प्रमाणावर संहार करू शकले, त्या प्रक्रीयेमध्ये त्यांनी लाखो लोकांना मारले.
जर्मन लोकांनी वापरलेली पद्धती ही धक्कादायकरित्या क्रूर होती आणि त्याने त्यांच्या स्वतःच्या फसवणुकीच्या गहनतेस प्रदर्शित केले. काही प्रकरणात, यहूदी लोकांना खड्डे खणण्यास सांगण्यात आले जे त्यांच्या स्वतःच्या अनेक लोकांच्या कबरा म्हणून कार्य करतील. मग त्यांना या खड्ड्यांजवळ रांगेत उभे करण्यात आले आणि त्यांना गोळ्या मारण्यात आल्या. संवेदनाहीन असे कृत्ये, सामान्य दिसणाऱ्या लोकांद्वारे करण्यात आले, ज्याने स्वतःची फसवणूक किती शक्तिशाली आणि धोकादायक असू शकते हे दाखवून दिले. मानवी विध्वंसाची शोकांतिका अनियंत्रित स्वयं-फसवणुकीच्या परिणामांची एक स्पष्ट आठवण म्हणून कार्य करते. जेव्हा व्यक्ति आणि समाज स्वतःला खोटेपणा आणि विकृतीवर विश्वास ठेवू देतात, तेव्हा ते मानवी सभ्यतेचा अवमान करणारी जघन्य कृत्ये करण्यास सक्षम होऊ शकतात.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने मला पाहावे म्हणून डोळे आणि ऐकावे म्हणून कान दे, जेणेकरून मी फसवणुकीपासून जागरूक होऊ शकेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वैराचारास पूर्ण उपाय● दिवस ०१: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● विश्वासापासून मुर्खतेमध्ये फरक करणे
● ४०वा दिवस: उपास आणि प्रार्थनेचे ४० दिवस
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
● धार्मिक सवयी
● एक आदर्श व्हा
टिप्पण्या