डेली मन्ना
तुम्ही अजूनही का थांबून आहात?
Monday, 19th of April 2021
22
18
1041
Categories :
आत्मसंतुष्टता
परंतु इस्राएल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे सात वंश अद्यापि राहिले होते (यहोशवा १८:२).
बायबल विद्यानी आपल्याला सांगतात की ५ इस्राएली वंश त्यांना दिलेल्या भागांमध्ये स्थिर राहून बराच अवधी निघून गेला होता. उरलेले ७ वंश आत्मसंतुष्टतेच्या जीवनासाठी स्थिर झालेले होते. गोष्टी जशा होत्या त्यासाठी ते समाधानी होते. ते आश्वासना मध्ये जगत नव्हते. परमेश्वराने त्यांना आश्वासन दिले होते की तो त्यांना त्यांची स्वतःची भूमि देईल. आणि परमेश्वर विश्वसनीय होता की त्यांच्या स्वतःच्या बंधूंना त्यांच्या भागा मध्ये आणावे. तर मग, हे सर्व पाहून त्यांनी पुढे नाही गेले पाहिजे होते काय आणि देवाने जे त्यांच्यासाठी ठेवले आहे ते घ्यावयाचे नव्हते काय? नाहीतरी, परमेश्वर हा त्यांच्याबरोबर होता, त्यांच्या विरोधात नव्हता.
तर मग विषय तेव्हा काय होता? काय ते घाबरलेले असू शकतात काय की विश्वासात त्या कशामध्ये तरी पुढे पाऊल टाकावे ज्याशी ते परिचित नव्हते-जरी ते त्यांच्या भल्यासाठी होते? "का पुढे पाऊल टाकावे? येथे इतके चांगले व परिचित आहे" हा त्यांचा न्यायोचितपणा असू शकतो? स्पष्ट आहे, की त्यांच्या न्यायोचितपणाने त्यांना त्या स्थानापर्यंत आणले होते जेथे ते देवाच्या वचनाच्या पूर्णतः अवज्ञेमध्ये जगत होते. हे त्याचवेळी यहोशवाला त्यांना हे म्हणत कठोर शब्द बोलावे लागले, "तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार?" (यहोशवा १८:३).
अनेक ख्रिस्ती आज स्वतःला अशाच समान परिस्थिती मध्ये पाहतात. ते नावे मध्ये बसून राहण्यास प्राधान्य देतात याऐवजी कि पेत्राला देवाच्या वचनावरून विश्वासाने बाहेर पडून व पाण्यावर चालत आहेत हे पाहत बसावे. येथे देवाचे अनेक लोक आहेत जे त्यांची जीवने जशी देवाने त्यांच्यासाठी योजना केली आहे तसे जगत नाहीत कारण त्यांनी अजून देवाच्या आश्वासनावर भरंवसा ठेवलेला नाही.
ख्रिस्ती म्हणून, आपण आपल्या जीवनात आत्मसंतुष्टतेने शिरकाव करण्याच्या विरोधात गंभीरपणे रक्षण केले पाहिजे. आत्मसंतुष्टता आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यास जखडवून ठेवते, आणि हे, मग आपले दृष्टीकोण व दृष्टांत गमाविण्यास कारणीभूत होतात. कारण हे की का अनेक ख्रिस्ती लोकांनी देवाने जे त्यांच्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये प्रवेश केलेला नाही कारण देवाने जो दृष्टांत त्यांना दिला होता त्यावरील दृष्टीकोन त्यांनी गमाविला आहे. (नीतिसूत्रे २९:१८ वाचा)
यहोशवा ने प्रोत्साहन देणारी सेवा त्यांना प्रोत्साहन देण्याद्वारे पूर्ण केली की तेथपर्यंत पोहचावे व देवाने जे सर्व आश्वासन त्यांना दिले आहे त्यामध्ये प्रवेश करावा. आपल्या सर्वाना यहोशवा सारख्या लोकांची गरज आहे जे आपल्याला प्रोत्साहन देतील की आज्ञाधारक कार्य करावे.
प्रार्थना
पित्या, मी तुला धन्यवाद देतो की तूं आश्वासन-पाळणारा परमेश्वर आहे. तुझा कोणताही शब्द अपयशी ठरलेला नाही. तुझ्या आश्वासनाला धरून राहण्यास मला साहाय्य कर म्हणजे तू जे सर्व काही माझ्यासाठी योजिले आहे त्यामध्ये मी प्रवेश करावा.
पित्या, मला त्या लोकांद्वारे घेरून ठेव जे माझ्या आध्यात्मिक प्रवासात मला प्रोत्साहन देतील. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दुसऱ्यावर दोष लावणे● रागावर उपाय करणे
● देवाचे ७ आत्मे: उपदेशाचाआत्मा
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -३
● देव पुरस्कार देणारा आहे
● परमेश्वर वेगळ्या प्रकारे पाहतो
● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग
टिप्पण्या