डेली मन्ना
दुष्ट विचार पद्धती विरुद्ध संघर्ष (दिवस 9)
Monday, 20th of December 2021
48
10
1946
Categories :
उपास व प्रार्थना
दुष्ट विचार पद्धतींचा लढा
सैतानाचे लक्ष हे तुमचे मन आहे
जेव्हा सैतानाला पहिला पुरुष (आदाम) व स्त्री (हव्वा) ला पापात पाडावयाचे होते, त्याने स्त्रीच्या मनावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. २ करिंथ ११:३ मध्ये हे स्पष्ट केलेले आहे.
तरी जसे 'सापाने कपट करून' हव्वेला 'ठकविले' तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयींचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.
सैतानाला तुमच्या मनावर आक्रमण करावयास का पाहिजे?
कारण, तुमचे मन हे परमेश्वराच्या प्रतिमेचा हिस्सा आहे जेथे परमेश्वर तुमच्याबरोबर संपर्क करतो आणि त्याची इच्छा तुम्हाला प्रगट करतो. हे दुर्दैव आहे की काही ख्रिस्ती लोकांनी मनाचे महत्त्व हे कमी केले आहे, कारण बायबल त्याच्या महत्वावर भर देते.
जर सैतानाने तुम्हाला खोटया गोष्टीवर विश्वास ठेवावयास लावले, तर मग तो तुमच्या जीवनात कार्य करण्यास सुरुवात करेल की तुम्हाला पापात पाडावे.
यामुळेच तो मनावर आक्रमण करतो आणि यामुळेच आपण आपल्या मनाचे रक्षण केले पाहिजे. तुमचे मन युद्धाचे क्षेत्र आहे.
मनन करण्यासाठी पवित्र शास्त्रातील वचने
रोम १२:१-२
फिलिप्पै ४:८
इफिस ४:२३
ईयोब ८:३२
४० दिवसांची बायबल वाचन योजना
1 थेस्सलनीकाकरांस १-५ ; 2 थेस्सलनीकाकरांस १-२
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा. (वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा व प्रत्येक प्रार्थना मुद्दया साठी हे कमीत कमी १ मिनीट करा.)
माझ्या जीवनातील संभ्रमाचा बालेकिल्ला मी येशूच्या नांवात ओढून काढला आहे.
प्रत्येक शक्ति जिला माझ्या जीवनास नष्ट करावयाचे आहे, मी तुला येशूच्या नांवात आदेश देत आहे की नष्ट होऊन जावो.
माझ्या जीवनातील प्रत्येक चुकीचा पाया, येशूच्या नांवात देवाचा अग्नि प्राप्त करो.
माझ्या मना, देवाकडून दैवी स्पर्श येशूच्या नांवात प्राप्त कर.
अनियंत्रित विचारांच्या प्रत्येक बालेकिल्ल्याला येशूच्या नावात मी ओढून काढत आहे.
माझ्या अंत:करणातून प्रत्येक दुष्ट कल्पना येशूच्या नांवात मी काढून देत आहे.
माझ्या आध्यात्मिक वाढीच्या विरोधातील प्रत्येक सर्व कल्पना मी तुम्हाला येशूच्या नांवात पराभूत होण्याचा आदेश देत आहे.
मी माझे शरीर, जीव व आत्म्याला प्रत्येक व्यर्थ कल्पनेच्या विरोधात येशूच्या रक्ता द्वारे प्रतिबंधित करीत आहे.
प्रत्येक सैतानी शिडी जी शत्रू वापरत आहे की माझ्या जीवनात उतरून यावे तिला येशूच्या नांवात ओढून काढत आहे.
माझ्या अंत:करणातील प्रत्येक दुष्ट विचारास येशूच्या नांवात मी बंधक करीत आहे.
येशूच्या रक्ता, माझ्या मस्तकाला दुष्ट विचारांपासून येशूच्या नांवात शुद्ध कर.
माझ्या मना, देवाच्या अग्नीचा स्पर्श येशूच्या नांवात प्राप्त कर.
माझ्या व माझ्या कुटुंबाच्या विरोधातील प्रत्येक सैतानी कल्पनेला येशूच्या सर्वशक्तिमान नांवात मी काढून टाकत व पूर्णपणे नष्ट करीत आहे.
माझ्या प्रार्थनांचे उत्तर देण्यासाठी परमेश्वरा, तुझा धन्यवाद होवो.
काही वेळ परमेश्वराचा धन्यवाद करीत घालवा.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वरा सोबत चालणे● दिवस ०८:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● धार्मिक सवयी
● दिवस २२:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● एक शास्वती होय
● प्रार्थना कशी करावी जेव्हा तुम्हाला देवापासून दूर आहोत असे वाटते
● याचा अर्थ काय आहे, येशूचे कार्य करणे आणि त्यापेक्षा मोठी कार्य करणे?
टिप्पण्या