“४१ मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला, ४२ जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.” (लूक १९:४१-४२)
यरुशलेमेच्या गजबजलेल्या रस्त्यावर, स्तुती आणि झावळ्यांच्या शाखांच्या गजरात, प्रभू येशूने तीव्र दु:खाने अश्रुपूर्ण नेत्रांनी शहराकडे पाहिले. लूक १९:४१-४२ येशूच्या हृदयातील गहन समज आणि करुणेचा क्षण वेधून घेतला होता. त्याचे अश्रू हे शहरावर येणाऱ्या विनाशासाठीच केवळ नव्हते, परंतु तेथील रहिवाशांच्या समोर जो शांततेचा मार्ग ठेवला होता त्याकडे त्यांनी डोळेझाक केली होती. हा ऐतिहासिक क्षण आपल्याला आपल्या स्वतःच्या समजेवर चिंतन करण्यास आमंत्रित करतो-आपली शांती, आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करणारी साधी सत्ये आपण जाणतो का?
ज्याप्रमाणे प्रभू येशू यरुशलेम शहरासाठी रडला, त्याप्रमाणे आपल्या जीवनातील शांततेचे साधे क्षण पण गहन मार्ग आपण ओळखावेत अशी त्याची इच्छा आहे. बऱ्याचदा जे आपण जटीलतेमध्ये शोधतो ते साधेपणात वसलेले असते (१ करिंथ. १४:३३). जग सुखासाठी गुंतागुंतीच्या मार्गांनी भरलेले आहे, पण देवाचा मार्ग सोपा आहे. धन्योद्गार (मत्तय ५:३-१२) हे परिपूर्ण उदाहरण आहे, जे खऱ्या शांतीकडे नेणाऱ्या हृदयाची साधी वृत्ती प्रकाशित करते.
मग, ही साधी सत्ये वारंवार का चुकतात? एदेन बागेत, आज्ञापालनाचा साधेपणा सर्पाच्या जटील फसवणुकीमुळे झाकला गेला (उत्पत्ती ३:१-७). आपण मानवांची एक विचित्र प्रवृत्ती आहे की जे गुंतागुंतीचे आणि अवघड आहे त्यानुसार आपण चालतो आणि जे सोपे आणि प्रभावी आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आपण बऱ्याचदा नामान सारखे होतो, अरामी सेनापती ज्याने अपेक्षा केली की संदेष्टा अलीशा त्याला हाताने इशारा करेल आणि त्याला कुष्ठरोगापासून बरे करण्यासाठी काहीतरी भव्य आणि जटील असे करेल. तरीही, यार्देन नदीत जाऊन धुण्याच्या साध्या कृतीने त्याला पुनर्स्थापित केले. (२ राजे ५:१०-१४)
प्रभू येशू आपल्याला आपले आध्यात्मिक डोळे उच्च दृष्टीसाठी उघडण्यास बोलावत आहे. २ राजे ६:१७ मध्ये, अलीशाने सेवकाचे डोळे उघडावे म्हणून प्रार्थना केली, त्यास देवदूतांचे सैन्य दाखवले. ह्याच स्पष्टतेची आपल्याला आवश्यकता आहे- तात्कालिकच्या पलीकडे पाहणे, आपल्यामधील देवाचा साधेपणा ओळखणे. आमंत्रण हे विश्वासाने पाहणे आहे, कारण अदृश्य गोष्टी शाश्वत आहेत. (२ करिंथ. ४:१८)
येशू स्वतः साधेपणाचे प्रतिक आहे. गव्हाणीत जन्मला, सुतार म्हणून जगला, आणि दाखल्यांमध्ये शिकवले, त्याने शांततेच्या अलंकृत मार्गाचे आदर्श दिले ( फिलिप्पै. २:५-८). सुवार्ता ही सरळ आहे: विश्वास ठेवा आणि तारण प्राप्त करा (प्रेषित १६:३१). तरीही, पर्वत आणि जंगलांमध्ये अधिक जटील मुक्ती शोधणाऱ्यांकडून हे मुलभूत सत्य अनेकदा चुकते.
ही साधी सत्ये स्वीकारण्यासाठी, आपण मुलांप्रमाणे विश्वास जोपासला पाहिजे (मत्तय. १८:३). मुले सोप्या वास्तवाचा सहज स्वीकार करतात. प्रौढ म्हणून, आपण शंका दूर केली पाहिजे आणि देवाच्या साध्या अभिवचनांमध्ये विश्वास ठेवण्यास शिकावे. प्रभूची प्रार्थना ही साध्या आणि कळकळीच्या प्रार्थनेच्या शक्तीची साक्ष आहे. (मत्तय. ६:९-१३)
जेव्हा आपण साधेपणाला स्वीकारतो, तेव्हा त्याची फळे दिसून येतात. प्रीती, आनंद, शांती, आणि आत्म्याची सर्व फळे (गलती. ५:२२-२३) जगाच्या गुंतागुंतीच्या द्वारे गोधाळून न गेलेल्या जीवनात दिसतात. ते देवाच्या साध्या पण गहन सत्यांशी सुसंगत जीवनाची चिन्हे आहेत. आंधळा बार्तीमयसारखे, ज्याला येशूने पुन्हा दृष्टी दिली, आम्हांला आमची दुष्टी प्राप्त होऊ दे, आणि शांततेच्या साध्या मार्गावर त्याचे अनुसरण करणारे व्हावे. (मार्क. १०:५२)
बायबल वाचन योजना: निर्गम २९
प्रार्थना
पित्या, तुझ्या सत्याचा साधेपणा आणि वैभव पाहण्यासाठी आमचे डोळे उघड. आम्हांला तुझ्या मार्गाच्या साधेपणात शांती मिळू दे आणि तुझ्या दृष्टीच्या स्पष्टतेने चिन्हांकित जीवन जगू दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● युद्धासाठी प्रशिक्षण-१● देवाच्या सान्निध्यासह ओळखीत होणे
● तुमच्या मनाला शिस्त लावा
● विश्वासापासून मुर्खतेमध्ये फरक करणे
● सुवार्ता पसरवा
● गौरव आणि सामर्थ्याची भाषा-जीभ
● प्रीति साठी शोध
टिप्पण्या
