पवित्र शास्त्र योसेफ च्या यशाचे रहस्य मत्सराच्या मध्यस्पष्टकरते. "परमेश्वर योसेफ बरोबर होता, आणि तो एक यशस्वी मनुष्य झाला..." (उत्पत्ति 39:2).
याची पर्वा नाही की किती लोक हे तुमच्या विषयी मत्सरात आहेत, याची पर्वा नाही की ते तुमच्या विरुद्ध काय बोलतात आणि काय करतात, केवळ याची खात्री करा की तुम्ही देवाच्या उपस्थितीत सतत राहत आहात. काहीही झाले तरी देवा बरोबर तुमचे संबंध सांभाळून ठेवा. मत्सराच्या नकारात्मकपणास तुम्हाला देवाच्या उपस्थितीपासून दूर घेऊन जाऊ देऊ नका. नकारात्मकपणाच्याबाणास तुम्हाला देवाच्या घरापासून दूर घेऊन जाऊ देऊ नका. त्याऐवजी तुम्ही देवाच्या घनिष्ठतेत जवळ या.
मनुष्य ज्याने योसेफ ला एक गुलाम म्हणून विकत आणले होते त्याने सुद्धा पाहिले की परमेश्वर योसेफ बरोबर होता आणि मग त्यास त्याच्या संपूर्ण घरावर अधिकारी असे नेमले.
आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदारव सर्व काही केले; तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिसरी मनुष्याच्या घरादाराचे कल्याण केले; आणि त्याचे घरदार व शेतीवाडी या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. (उत्पत्ति 39: 5)
दुसरे, पोटीफरच्या घरादारास आशीर्वाद मिळाला कारण तो त्या व्यक्ति बरोबर संबंधात होता जो देवाची कृपा आणि अभिषेक त्याच्या जीवनात घेऊन चालत होता. हा एक सामर्थ्यशाली सिद्धांत आहे. तुम्हाला योग्य व्यक्तींबरोबर जुडण्याची गरज आहे. जे लोक तुमच्या यशा बद्दल मत्सर करतात त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा किंवा त्यांच्या सहवासात अधिक जवळीक ठेवू नका.
तो जो बुद्धिमान मनुष्याबरोबर चालतो तो बुद्धिमान होईल,
परंतु मूर्खांचे सोबती हे नष्ट केले जातील. (नीतिसूत्रे 13:20)
सैतानाची एक योजना ही आहे की तो प्रयत्नकरेल आणि तुम्हाला अशा लोकांपासून वेगळे करेल कारण त्यास हे ठाऊक आहे की जोपर्यंत तुम्ही अशा लोकांशी जुडलेले आहात जे देवाची कृपा आणि सामर्थ्य त्यांच्या जीवनात घेऊन चालतात, तुम्ही वाढत जाल.
शेवटी चला मला तुम्हाला काही व्यवहारिक सुचना देऊ दया.
आज, सामाजिक माध्यमाने लोकांसाठीखूपच सोपे केले आहे की त्यांचे मुखवटे लपवावे आणि त्या लोकांवर अपमानजनक टिप्पणी करीत राहावे ज्यांस ते ठीकपणे जाणत सुद्धा नाहीत.
जर कोणी तुमच्या व्यक्तिगत मुखपृष्ठावर किंवा गटात तुमच्या विषयी काहीतरी नकारात्मक बोलत आहे तर मगसरळपणे त्यांच्या टिप्पण्या काढून टाका. जर त्यांची वागणूक तशीच राहते, तर मग त्या व्यक्तीला मित्राच्या गटातून काढून टाका किंवा त्या व्यक्तीच्यासंपर्कास प्रतिबंध करा. तुम्हाला ऑनलाईनवरील धमकावण्यास सहन करण्याची गरज नाही.
Bible Reading: Proverbs 20-24
                अंगीकार
                हे सेनाधीश परमेश्वरा. मी येशूच्या नावांत तुला हांक मारीत आहे. मी कबूल करतो कोणतेही शस्त्र जे माझ्या विरुद्ध तयार केले गेले आहे त्याचीसरशी होणार नाही. मत्सराचेप्रत्येक जळते बाण जे माझ्या विरुद्ध सोडले गेले आहे ते पवित्र आत्म्याच्या अग्नीद्वारे भस्म केले जातील. प्रत्येक अडथळे व आडकाठी जे माझ्या मार्गात मत्सरा द्वारे निर्माण केले जाते ते उपटून टाकले जावो. हे परमेश्वरा, माझ्या विश्वसनीयतेला झालेले कोणतेही नुकसान पुनर्स्थापित कर. प्रत्येक चुकीच्या व्यक्तीकडून मला दूर कर आणि मला योग्य व्यक्तींबरोबर जोड. मी त्यांच्यावर आशीर्वाद बोलतो जे मला शाप देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आशीर्वाद पाहू दे जे तू अगोदरच त्यांना दिले आहे. त्यांना तो मार्ग दाखव जो तुझा त्यांच्यासाठी आहे आणि त्यांना कृपा पुरव कीत्या मार्गावर चालावे जे तू त्यांच्यासाठी स्थापित केले आहे. मी प्रार्थना करतो की माझे बोलणे हे कृपेने चविष्ठ असावेआणि मी गर्विष्ठ होऊ नये जेव्हा मी तुला गौरव देतो की तू मला कसे आशीर्वादित केले आहे. येशूच्या नांवात, आमेन.
        Join our WhatsApp Channel 
         
    
    
  
                
                 
    Most Read
● दिवस ३५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● पावित्रीकरण स्पष्टपणे सांगितले आहे
● दिवस १७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● फसवणुकीच्या जगात सत्याची पारख करणे
● विश्वास काय आहे?
● ओरडण्यापेक्षा दयेसाठी रडणे
● प्रार्थना कशी करावी जेव्हा तुम्हाला देवापासून दूर आहोत असे वाटते
टिप्पण्या
                    
                    
                
