"सर्वदा आनंदित असा; निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितीत उपकारस्तुति करा; कारण तुम्हांविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे." (१ थेस्सलनी ५:१६-१८)
सर्वदा धन्यवाद देणे हे सोपे नाही, परंतु तीच तर गोष्ट आपण केली पाहिजे जेणेकरून देवाची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण होताना आपण पाहावे. अशा प्रकारे आपण विश्वासाच्या उच्च स्तरावर जातो.
धन्यवाद देण्याचे आपल्या जीवनावर असंख्य अविश्वसनीय परिणाम आहेत. आपल्या विश्वासाला वाढविण्या व्यतिरिक्त, अभावाची भीती काढून टाकणे, कृतज्ञता आपल्या आचरणासपुन्हा केंद्रित करते, चिंता दूर करून शांतीने भरून काढते.
तुम्ही पाहा, हे नेहमीच सोपे आहे की समस्या शोधावी. बऱ्याच वेळा शत्रू आपल्याला कुरकुर व तक्रार करण्याकडे घेऊन जाण्यास यशस्वी होतो आणि आपले लक्ष हे नकारात्मक गोष्टीवर केंद्रित होते. आपण समस्या-केंद्रित होतो आणि तसे आचरण विकसित करतो जे लोकांना आपल्यापासून दूर नेते-बऱ्याच वेळा लोक आपल्याकडे लक्ष देत नाहीत.
परंतु जेव्हा आपण धन्यवादी राहण्यास आचरणात आणतो, धन्यवादी आचरण हे आकर्षित करणारी शक्ति होते! वास्तवात, धन्यवादी होण्याची संस्कृती विकसित करणे, चुका-शोधणे किंवा कोणाला तरी अडचणीत आणणे यावरच केवळ केंद्रित राहणे हे आपल्याला आपले संबंध,घर, आपला व्यवसाय व आपल्या चर्च ला पुढील स्तरावर जाण्यापासून रोखते.
जर तुम्ही प्रेषित १६:१६-३४ वाचले, पौल व सीलास यांना तुरुंगात टाकलेले, फटके मारलेले, रक्तबंबाळ झालेले व साखळदंडानी जखडून अंधार कोठडीत टाकलेले आहे. यापेक्षा अधिक काहीही वाईट असू शकत नाही. तक्रार किंवा कुरकुर करण्याऐवजी, पौल व सीलास ह्यांनी देवाची स्तुति व गीते गाणे निवडले.
ह्या आचरणामुळे देवाची चमत्कारिक शक्ति त्यांच्या वतीने मोकळी केली
तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले. सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. (प्रेषित १६:२६)
आता, पाहा, की तुम्हाला आजार, गरिबी किंवा समस्यांसाठी धन्यवाद देण्याची गरज नाही. परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा, सतत धन्यवाद देणे हा तुमचा निर्णय आहे, आणि"सर्व बुद्धीसामर्थ्याच्याही पलीकडे असलेली शांति तुमची[अंत:करणे] व तुमचे [विचार] ख्रिस्तयेशूच्या ठायी राखील." (फिलिप्पै ४:७)
अंगीकार
माझा प्रभु व तारणारा येशू ख्रिस्ता द्वारे, मी परमेश्वराला 'स्तुतीचा यज्ञ' व 'ओठाचे फळ'नित्य अर्पण करीत राहीन. (इब्री १३:१५)
Join our WhatsApp Channel
Most Read
● बीज चे सामर्थ्य - २● बदलण्यासाठी अडथळा
● २१ दिवस उपवासः दिवस १४
● देवदुतांकडे आपण प्रार्थना करू शकतो काय?
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● तुम्ही एका उद्देशा साठी जन्मला आहात
● परमेश्वराला प्रथम स्थान देणे # ३
टिप्पण्या