मित्रांनो: मला चुकीचे समजू नका: ह्याबाबतीत मी स्वतःला कोणत्याही दृष्टीने खूप कुशल असे समजत नाही, परंतु माझी दृष्टिध्येयावर आहे, जेथे परमेश्वर आपल्याला पुढे मार्गदर्शन करीत आहे जेथे येशू आहे.मी सुरुवात केली आहे, आणिधावत आहे, मी आता मागे वळून पाहणार नाही.
बंधुनो, मी अद्यापि, ते आपल्या कह्यात घेतले असे मानीत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडेलक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जें वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.
तर जेवढे आपण पोक्त आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी आणि तुम्ही एखादया गोष्टींविषयी निराळी चित्तवृत्ती ठेविली, तरी देव तेही तुम्हांला प्रगट करील; तथापि, आपण जी मजल मारली, तिच्याप्रमाणे पुढे चालावे. (फिलिप्पै ३:१५-१६)
आपल्यापैकी बरेच लोक हे काही निराशाजनक परिस्थिती मधून गेले असतील. हे कधी मागे घडले असेन किंवा आता सध्या आज सुद्धा घडले असेन. दु:खद गोष्ट ही आहे की यातून कोणीही सुटलेला नाही परंतु सत्य हे सुद्धा आहे की त्या निराशाजनक प्रसंगांवरविचार करीत राहण्याद्वारे ते आपल्याला परिस्थिती बाहेर काढून टाकू शकते.
योग्य दृष्टीकोण ठेवणे हे महत्वाचे आहे कारण ज्याकडे तुम्ही सतत पाहत राहता तेच केवळ तुमच्या विचारात वाढत जाते.
जेव्हा केव्हा मी संदेश देत आहे किंवा शिकवीत आहे, जे लोक माझ्या समोर असतातत्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव मी पाहिले आहे. जमावात, तेथे काही लोक असतात जे संदेश स्वीकारतात आणि पवित्र आत्म्या द्वारे प्रेरित होतात. मग तेथे काही थोडे आहेत, ते असे दिसतात जसे काही त्यांना जबरदस्तीने तेथे ओढून आणलेले आहे. ते प्रत्युत्तर देत नाहीत, ते दाखल्यामधील भटकलेल्या मेंढरा पेक्षा जास्त भटकलेले असे दिसतात.
माझ्या सेवाकार्याच्या सुरुवातीच्या काळात, मी ह्यावर केंद्रित असे आणि अधिक त्रासत असे. मी माझा संदेश योग्यपणे पूर्ण करू शकत नसे. मी निराश होत असे हा विचार करीत असेकी कोणालाहीसंदेश हा कळला नाही आहे. ह्याने मला अधिकच कटू असे केले होते.
एके दिवशी, मी जेव्हा फिलिप्पै ३ वाचत होतो, योग्य व्यक्तींवर केंद्रित राहा, यावर माझे लक्ष गेले. मी हे जाणले की 100 टक्क्यातून, कमी रुची ठेवणारे हे 1 टक्का सुद्धा नव्हते. चुकीच्या लोकांवर लक्ष देऊन मी केवळ अधिक लोकांवर उपासने प्रती अरुची दाखवीत नव्हतो परंतु माझ्या आत्मिक मनुष्या मध्ये सुद्धा अशांतता होत होती.
प्रतीदिवशी, आपल्या सभोवती येथे सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी होत आहेत. जितके अधिक तुम्ही तुमचे लक्ष सकारात्मक गोष्टींकडे लावाल तुम्हाला तितकेच सकारात्मक आणि परिपूर्ण असे वाटेल. जसे तुम्ही हे करता तुमच्या आत्मिक मनुष्यत्वामध्ये काहीतरी विलक्षण असे घडू लागते-आशा ही प्रेरित होते आणि तुम्ही देवाच्या आश्वासनाच्या प्रकटीकरणाचा अनुभव करण्यास सुरुवात करता.
आज तुम्ही कशावर लक्ष केंद्रित केले आहे? काय ते सकारात्मक आहे? काय ते उन्नति करण्यास योग्य आहे?
ह्यानुसार परीक्षण करा आणि तुमचे संपूर्ण लक्ष केंद्रित करून ह्यावर लक्ष दया.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, योग्य गोष्टींवर लक्ष देण्यापासून ज्या गोष्टी मला अडथळा करितात त्या सर्व माझ्यापासून काढून टाक.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शत्रूला तुमच्या परिवर्तनाची भीति वाटते● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● रागावर उपाय करणे
● देवाच्या वाणीवर विश्वास ठेवण्याचे सामर्थ्य
● मध्यस्थी वर एक भविष्यात्मक शिकवण १
● दिवस ०९ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● आपल्या आध्यात्मिक पात्याचे रक्षण करणे
टिप्पण्या