तुम्ही तुमच्या जीवनात निर्णय घेतला आहे काय केवळ मागेचराहावे? हे अनेकांमध्ये निराशा आणते ज्यांना खरेच वाटते की चांगल्या साठी बदलावे.
अशा प्रकारच्या अविचल अवस्थेसाठी एक कारण हे की अनेक लोक केवळ बाह्य बदल करण्यावरच केंद्रित असतात. जर तुम्हाला कायमच्या बदलाची इच्छा आहे, तुम्हालाखोलवर कार्य करण्याची गरज आहे- तुमच्या हृदयावर कार्य करा.
मग तो (येशू) हे म्हणत बोलला: "पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला, आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले .......काही खडकाळावर पडले, काही कांटेरी झाडांमध्ये पडले,......काही चांगल्या जमिनीत पडले. याला कान आहेत तो ऐको. (मत्तय १३: ३-९)
प्रभु येशूने मानवी हृदयास माती असे संबोधले. वरीलवचनात, प्रभु येशूने 4 प्रकार ओळखले:
१. वाटेवर
२. खडकाळ
३. काटेरी
४. चांगली जमीन
ही चार प्रकारची जमीन ४ प्रकारच्या मानवी हृदयास दर्शविते. पहिला सिद्धांत जो आपल्याला समजण्याची गरज आहे तो हा की, जे काही जमिनीत पेरले जाते ते काही अंशापर्यंत वाढते. आणि म्हणून, हे मानवी हृदयात सुद्धा तसेच आहे-तुमचे हृदय त्यास वाढविते जे काही त्यात पेरले जाते.
जर तुम्ही नागडे चित्र आणि इतर अशुद्ध गोष्टी पेरत असाल, त्या गोष्टी ह्या वाढतील. जर तुम्ही नकारात्मकता आणि कटुता पेरता, तेच उत्पन्न जे तुम्ही प्राप्त कराल.
दुसरे, आपल्याला आपल्या हृदयाच्याअवस्थेकडे निरंतर लक्ष द्यावयाचे आहे. जेव्हा असे दिसते की आपण परमेश्वरापासून दूर जात आहोत, आपल्याला तातडीच्या गोष्टी करण्याची गरज आहे की आपल्या हृदयाच्या अवस्थेच्या बाबतीत लवकर कार्य करावे यासाठी की जे चांगले बी हे पेरले आहे ते व्यर्थ जाऊ नये.
आज, आपल्या स्वतःला विचारा, "मी कोणत्या प्रकारची जमीन आहे?" तुमच्यासाठीह्या प्रश्नाचे इतर कोणीही उत्तर देऊ शकत नाही-केवळ तुम्हीच.
Bible Reading: Isaiah 10-13
प्रार्थना
१. पित्या, येशूच्या नांवात, मला पारख दे की माझ्या आत्म्यात योग्य गोष्टी पेराव्या.
२. पित्या, तुझे वचन म्हणते, "आत्मा गहन गोष्टींचा शोध घेतो." माझे हृदय तपास आणि त्या सर्व गोष्टींना उपटून टाक जे तुला अप्रसन्न करतात. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुमच्या आत्म्याची पुनर्स्थापना● देवाच्या उद्धेशासाठी तुम्ही निश्चित केलेले आहात
● आत्म्यात उत्सुक असा
● पुढच्या स्तरावर जाणे
● फसवणुकीच्या जगात सत्याची पारख करणे
● वाईट विचारांवरील युद्ध जिंकणे
● देव महान द्वार उघडतो
टिप्पण्या