हे जरुब्बाबेला, हिम्मत धर, असे परमेश्वर म्हणतो, हे मुख्य याजका, यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर; परमेश्वर म्हणतो, देशांतल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा; मीतुम्हांबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. (हाग्गय २: ४)
देवाचे मंदिर हे यरुशलेमेत बऱ्याच कालावधीपासून पडीक असे राहिलेले होते, यहूदी लोकांनी अगोदर ते बांधण्यास सुरुवात केली होती, परंतु त्यांनी अत्यंत आवाहनांचा आणि टीकांचासामना केला होता की त्यांनी ते काम थांबविले होते आणि पुढील १४ वर्षांसाठी त्यात काहीच काम केले नव्हते!
हे लक्षात ठेवा, जेव्हाकेव्हा तुम्ही काहीतरी चांगले करण्यासाठी तयार होता, तेथे नेहमीच आवाहने आणि टीका ह्या असणार.
येथे हिंदी भाषेत अशी म्हण आहे: "दगड हे नेहमीच फळांनी भरलेल्या झाडावरच मारले जातात."
तर ह्या अशा पार्श्वभूमी मध्ये परमेश्वराने संदेष्टा हाग्गय ला पाठविले की त्यांनी पूर्वी कधी केले नसेल अशा महत्वाच्या आणि विलक्षण कामासाठी त्यांना सांगावे आणि त्यांना प्रेरणा दयावी! भविष्यात्मक वचन: रीमा(आता देवाचे वचन) शब्दाने त्यांना साहाय्य केले की ते जी आवाहने आणि दोष चा सामना करीत आहेत त्यावर वर्चस्व मिळवावे. तेच रीमा शब्द तुम्ही ज्या आवाहनांचा सामना करीत आहात त्यात तुम्हाला सुद्धा साहाय्य करेल.
जेव्हा प्रभु येशूची रानात सैताना द्वारे परीक्षा झाली, त्याने प्रत्येक परीक्षेचा सामना "रीमा" शब्द बोलण्याद्वारे केला. मत्तय ४: ४ मध्ये, त्याने म्हटले, "मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक [रीमा शब्द]शब्दाने जगेल." येशूने लिहिलेले शब्द बोलले जे त्या परिस्थिती मध्ये आवश्यक होते. म्हणून रीमा शब्द हे देवाचे वचन असू शकते.
लिहिलेले शब्द आपला पाया म्हणून आपल्याला गरज आहे परंतु मार्गदर्शना साठी आपल्याला बोललेल्या शब्दाची [रीमा]सुद्धा गरज आहे. आपल्याकडे लिहिलेले शब्द आहेकी त्यावर स्थिर राहावे. आपल्याकडे रीमा, बोललेले शब्द आहे, म्हणजे आपल्याला माहीत आहे की काय करावे आणि कोठे जावे.
परंतु पुन्हा काही अधिक खूपच निराश होतात जेव्हा ते पुन्हा बांधण्यासाठी पाया घालीत असतात. एज्रा ३: १२ याची नोंद देते, ".......तेव्हा बरेच याजक, लेवी आणि पितृकुळाचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी या मंदिराचा पाया घातलेला पाहिला तेव्हा त्यांस रडू आले."
नवीन मंदिर पूर्ण होण्यास अजून खूप अवकाश होता, परंतु देव जे करीत आहे त्याबद्दल स्तुती आणि उत्सव साजरा करण्याऐवजी काही हे रडत होते आणि निराशा ने त्यांच्यावर वर्चस्व मिळवावे असे होऊ देत होते!
निराशा ही सर्वात सामर्थ्यशाली विनाशकारी साधन आहे जे शत्रू देवाच्या लोकांविरुद्ध वापरतो.गरज ही आहे की तुम्ही उपासना आणि वचनात जावे. जेव्हा तुम्ही असे करता, परमेश्वरतुमच्याशी बोलू लागेल. जेव्हा परमेश्वर बोलू लागतो, त्या वचनाला [रीमा]धरून राहा. हे तुम्हाला शत्रूच्या प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यास साहाय्य करेल.
प्रार्थना
येशूच्या नांवात, मी प्रबळ आणि धैर्यशाली होईन! मी घाबरणार किंवा निराश होणार नाही कारण जेथेकोठे मी जाईन तेथे माझा परमेश्वर देव माझ्याबरोबर आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● लहान बियापासून ते उंच झाडांपर्यंत● एक मुख्य किल्ली
● तुम्ही त्यांच्यावर प्रभाव टाकला पाहिजे
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२
● तुमची सुटका आणि स्वास्थ्याचा उद्देश
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -३
● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
टिप्पण्या