तू ही वचने ऐकून दीन झालास, आणि हे स्थान व यातील रहिवासीही विस्मयाला व शापाला विषय होतील असे जे मी बोललो आहे ते ऐकून परमेश्वरापुढे नम्र झालास, तूं आपली वस्त्रे फाडीली व माझ्यासमोर रडलास यामुळे मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो. (२ राजे २२:१९)
जेव्हा राजा योशिया ने देवाचे वचन ऐकले, त्याचा पूर्णपणे विश्वास बसला आणि पश्चातापी झाल्याचे चिन्ह म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडीली.
मग परमेश्वराने संदेष्टा हिल्कीया द्वारे म्हटले. या वाक्प्रचार कडे लक्ष दया: "जेव्हा तूं ऐकलेकी मी या स्थानाविषयी काय बोललो."
मनोरंजक गोष्ट येथे ही आहे की योशिया ने काही देवदूत पाहिला नाही किंवा कोणतीही वाणी ऐकली नाही. तो केवळ वचन ऐकत होता जे शाफान जो शास्त्री मोठयाने वाचत होता आणि तरीही परमेश्वराने म्हटले, "जेव्हा तूं ऐकले जे मी म्हटले."
हे मला सांगते की जेव्हाकेव्हा मी वचन वाचत आहे किंवा वचन ऐकत आहे, हे परमेश्वर सरळपणे आपल्याला बोलत आहे. आपल्याला काही विशेष नाटकीय प्रकाराची गरज नाही; हे तो परमेश्वर स्वतःच बोलत आहे आणि आपल्याला ह्या वास्तविकतेला ध्यानात घेतले पाहिजे.
पुढे, परमेश्वराने संदेष्टा हिल्किया द्वारे म्हटले, "जेव्हातूं आपली वस्त्रे फाडीली व माझ्यासमोर रडलास, मी ते पाहिले आहे."
पुन्हा, बायबल याचा उल्लेख करीत नाही की योशिया ने कोणतीही विशेष प्रार्थना केली आहे. तो रडला व त्याने आपली वस्त्रे फाडीली (मनापासून पश्चातापाचे चिन्ह). आपल्या सर्वाना ठाऊक आहे की कार्ये ही बोलण्यापेक्षा अधिक स्पष्ट बोलतात.
हे मला सांगते की कार्ये जी वचनावर आधारित आहेत ती देवाला आपले ऐकावयास लावतात.
हे आणखी एक कारण असू शकते की का काही लोकांच्या प्रार्थना ह्या अनुत्तरीत होतात? ते केवळ शब्द असतात आणि कार्ये नाही. विश्वासाची माझी व्याख्या: कार्ये देवाच्या वचनावर आधारित.
माझ्या मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या प्रार्थना जलद उत्तरीत व्हाव्यात असे वाटते तर मी तुम्हाला विनंती करतो कीजे वचन तुम्ही ऐकता त्यावर आधारित कार्य करा.
उदाहरणार्थ, तुम्हाला सुटकेची गरज आहे
याकोब ४:७ म्हणते, "म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल."
जर येथे देवाच्या वचनास अधीनता नाही, सैतान हा पळणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही अधीन राहता, सैतानाकडे काही पर्याय नाही परंतु परत न येण्यासाठी तुमच्या जीवनातून निघून जावे.
Bible Reading: Daniel 10-11
अंगीकार
पित्या, येशूच्या नांवात, मी घोषित करतो कीमी तो आहे जे बायबल सांगते मी आहे, मी ते करू शकतो जे बायबल सांगते, ते मी करू शकतो, आणि मला ते मिळेल जे बायबल सांगते की जे माझ्याजवळ असू शकते.
पित्या, येशूच्या नांवात, मी घोषित करतो की जे दृश्य त्यानुसार मी चालत नाही तर विश्वासाने चालतो. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● मध्यस्थीचे महत्वाचे घटक● परमेश्वर कधी चुकत नाही
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
● पृथ्वीचे मीठ किंवा मिठाचा स्तंभ
● चमत्कारीक कार्य करणे: मुख्य बाब #२
● २१ दिवस उपवासः दिवस १२
● प्रीतीचे खरे स्वरूप
टिप्पण्या