डेली मन्ना
भविष्यात्मकदृष्टया शेवटच्या समयाचे संकेत काढणे
Wednesday, 10th of April 2024
27
21
621
Categories :
अंतिम क्षण
ख्रिस्त-विरोधक काय आहे?
शब्द 'विरोधक' याचा अर्थ कशाचा तरी विरोध किंवा कशाच्या तरी विरोधात असा आहे. म्हणून ख्रिस्त-विरोधक हा जे काही ख्रिस्ताच्या संबंधात आहेत त्याच्या विरोधात असेल: त्याचा संदेश, त्याचे गुणधर्म, त्याचे कार्य वगैरे.
ख्रिस्त विरोधक व ख्रिस्त-विरोधी यामधील फरक
मुलांनो, ही शेवटली घटका आहे, आणि ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे. (१ योहान २:१८)
आता मग येथे ख्रिस्तविरोधक व ख्रिस्त-विरोधी मध्ये फरक आहे
प्रथम शब्दात ख्रि हे मोठी लिपी आहे व दुसऱ्या शब्दात ख्रि हे लहान लिपी आहे.
येथे प्रेषित योहान ख्रिस्तविरोधक व ख्रिस्त-विरोधी मध्ये स्पष्ट फरक करीत आहे. हे वाक्य लक्षात घ्या, "आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत"
प्रेषित योहान पुढे म्हणतो, "येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे." (१ योहान २:२२)
तर मग ख्रिस्तविरोधकाचे सामान्य गुणधर्म हे तो जो येशूला ख्रिस्त (देवाचा अभिषिक्त जण) आहे हे नाकारतो.
प्रेषित योहान पुढे म्हणतो की जो कोणी येशूला ख्रिस्त किंवा मशीहा असे नाकारतो, तो पिता व पुत्राचा नकार करतो, आणि हा व्यक्ति व हे लोक ख्रिस्तविरोधक आहेत. येथे आज अनेक ख्रिस्तविरोधक उठले आहेत जसे योहानाच्या दिवसात होते. आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे म्हणजे आपण याबाबतीत फसविले जाणार नाही. उदाहरण. हिटलर हा 'ख्रिस्तविरोधक' होता.
तर मग हे स्पष्ट आहे की 'ख्रिस्तविरोधक' हे 'ख्रिस्तविरोधी' समान नाही.
ख्रिस्तविरोधकाचे गुणधर्म
कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल. (२ थेस्सलनी २:३)
प्रेषित पौलाने एका मनुष्या विषयी म्हटले "पापा चा मनुष्य किंवा अनीतिमान मनुष्य, किंवा 'विनाशाचा पुत्र किंवा तो मनुष्य जो विनाशाकडे जात आहे'. काही असे शिकवितात की ख्रिस्तविरोधी हे केवळ अत्युच्चकंप्युटर आहे ज्यामध्ये ह्या पृथ्वीवरील सर्वांची माहिती आहे. ही चूक आहे जी सुधारण्याची गरज आहे. बायबल स्पष्टपणे सांगत आहे की ख्रिस्तविरोधी हा मनुष्य आहे.
प्रेषित पौलाने 'अनीतिमान पुरुष" बद्दल इशारा दिला आहे जो ख्रिस्तविरोधी आहे (२ थेस्सलनी २:३; ८-९). हा व्यक्ति चुकीचे चिन्ह व चमत्कार करेल व अनेक लोकांना भविष्यातील महासंकटाच्या काळात फसवेल (२ थेस्सलनी २:९-१०).
प्रेषित योहान प्रकटीकरणाच्या पुस्तकात ह्या व्यक्तीला "श्वापद" असे वर्णन करतो (प्रकटीकरण १३:१-१०).
हा सैतानाद्वारे प्रेरित व्यक्ति हा महासंकटाच्या काळात उच्चपदावर येईल, प्रारंभी इस्राएल बरोबर शांतीचा करार करेल (दानीएल ९:२७). परंतु मग तो जगावर वर्चस्व करण्यास पाहील, विश्वासघात करेल व मग यहूदी लोकांचा नाश करण्यास पाहील, विश्वासणाऱ्यांचा छळ करेल आणि त्याचे स्वतःचे राज्य स्थापित करेन (प्रकटीकरण १३). तो स्वतःचे गौरव करण्यात उद्धट व गर्विष्ठ भाषा बोलेल (२ थेस्सलनी २:४).
प्रार्थना
पित्या, तुझा आत्मा व वचनाद्वारे, शेवटच्या समायासाठी मला आध्यात्मिकदृष्टया व शारीरिकदृष्टया तयार कर.
पित्या, मला, माझ्या प्रियजनांना व करुणा सदन सेवाकार्याला ह्या शेवटच्या समयात सर्व फसवणुकीपासून राख.
पित्या, माझे कान उघड की ह्या समयात तुझे वचन ऐकावे व ते पाळावे, येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्ताने कबरेवर विजय मिळविला आहे● आपल्या तारणाऱ्याची विनाअट प्रीति
● भूतकाळाच्या कबरेत पडून राहू नका
● वाट पाहण्यामुळे एका राष्ट्राचा उद्धार केला गेला
● दिवस ११ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● शर्यत धावण्यासाठी योजना
● तुम्ही सहज दुखविले जाता काय?
टिप्पण्या