प्रार्थना ही स्वाभाविक कृती नाही. स्वाभाविक मनुष्यास, प्रार्थना ही फार सहज येत नाही आणि ह्या क्षेत्रात अनेक जण संघर्ष करतात. ह्या स्वप्नमय युगात, जेथे लोकांना ध्वनीच्या वेगाभोवती वळसे घ्यावेसे वाटते, गोष्टी जलद व जलद करावयास वाटतात, प्रार्थना करणे हे त्रासदायक उद्धेश पूर्ण करण्यासारखे दिसते. तथापि, येथे प्रत्येकाच्या जीवनात वेळ येते जेव्हा व्यक्ति त्याच्या किंवा तिच्या गुडघ्यावर येतो, व त्याच्याकडे ओरड करतात ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी ह्या निर्माण केल्या गेल्या आहेत- दृश्य व अदृश्य. (योहान १:३)
जर तुम्हाला केवळ लोकांना विचारावयाचे झाले की कोणी शोकांतिका, अंत:करणात निराशा किंवा अपयश हे सहन केली आहे, "तुम्ही जेव्हा तुमच्या गुडघ्यावर आला व तुमचे अंत:करण देवासमोर उघडे केले तेव्हा काय घडले?" काहींनी मला सांगितले की, त्यांस गहन शांति मिळाली, जी ते स्पष्ट करू शकत नाही, इतरांनी म्हटले, "हे जसे काही एक ओझे हे काढून घेतले गेले आहे," असे मला पूर्वी कधीही वाटले नाही.
जेव्हा मला डॉक्टर कडून बातमी मिळाली की माझी आई देवा घरी गेली आहे, माझ्या अंत:करणात एका गहन पीडे ने प्रवेश केला. मी रडू सुद्धा शकलो नाही. माझ्याभोवतालचे सर्व जण रडत होते परंतु सरळपणे मी ते व्यक्त करू शकत नव्हतो. अनेक दिवस प्रार्थने मध्ये मी संघर्ष केला.
एके दिवशी, मी रात्री उशिरापर्यंत प्रार्थना करीत होतो, एका गहन खातरी माझ्या जीवा मध्ये भरून गेली. मी त्यास स्पष्ट करू शकलो नाही. मला प्रामाणिक असू दया, मी देवाची वाणी मोठयाने ऐकली नाही परंतु मला वाटले की त्याची वाणी माझ्या आंतरिक मनुष्यास हे म्हणताना मी ऐकले, "ह्या सर्वांमध्ये तूं माझ्यावर विश्वास ठेवशील काय?" मी मोठयाने रडण्यास सुरु केले व म्हटले, "होय प्रभु!" एक गहन शांति जी माझ्या जीवात भरून गेली जी मी स्पष्ट करू शकत नाही. ते असे होते जसे काही एक मोठे ओझे माझ्यावरून काढण्यात आले होते!
हे त्याच दिवशी मी फिलिप्पै ४:६-७ ची नवीन समज प्राप्त केली
"कशाविषयीही चिंता किंवा काळजी करू नका, त्याऐवजी, सर्व गोष्टींविषयी प्रार्थना करा. तुम्हाला कशाची गरज आहे ते देवाला सांगा आणि ते जे सर्व काही केले आहे त्यासाठी त्यास धन्यवाद दया. तेव्हा तुम्ही देवाची शांति अनुभवाल जे मानवी मन समजू शकते त्यापेक्षा अत्यंत अद्भुत आहे. जेव्हा तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये भरंवसा ठेवता तेव्हा त्याची शांति तुमचे मन व अंत:करणाचे रक्षण करील."
ही शांति अनुभविण्यासाठी, तुम्हाला काही डोंगर चढून जाण्याची किंवा शेकडो मैल प्रवास करण्याची गरज नाही. तुम्ही ती दैवी शांति जेथे तुम्ही आहात तेथेच अनुभवू शकता. जेव्हा तुम्ही दररोज देवाकडे येता, व त्याच्याबरोबर घनिष्ठ सह्भागीतेसाठी स्वतःला समर्पण करता, त्याची शांति ही तुमचे रक्षक होईल जी भीतीला काढून टाकते व आनंद आणते. देवाची शांति ही प्रत्यक्षता आहे व मी प्रार्थना करेन की तुम्ही ही प्रत्यक्षता दररोज अनुभवावी.
प्रार्थना
पित्या, मजवर कृपाशील राह, हे परमेश्वरा! तुझ्या कायम, व प्रामाणिक प्रीति नुसार; तुझ्या दयेच्या महानते नुसार. जेव्हा मी तुझ्याजवळ येतो, ह्या दिवशी व माझ्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी ही दैवी शांति अनुभविण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सुटकेचा दिवस (दिवस १०)● येशू स्वर्गात काय करीत आहे
● आत्म्यात उत्सुक असा
● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● तुमचे हृद्य तपासा
● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- २
● पवित्रआत्म्याच्या सर्व वरदानांची मी इच्छा करू शकतो काय?
टिप्पण्या