डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस ०५
Thursday, 16th of December 2021
60
12
3989
Categories :
उपास व प्रार्थना
पुढील वचने एका आजारी व्यक्तीच्या भयंकर अवस्थेचे वर्णन करते
"त्याने माझ्या भाऊबंदास मजपासून दूर केले आहे; माझ्या ओळखीपाळखीचे मला पारखे झाले आहेत. माझे आप्त मला अंतरले आहेत; माझे इष्टमित्र मला विसरले आहेत.
माझ्या घराचे दास व दासी मला परका समजतात; त्यांच्या दृष्टीने मी विदेशी झालो आहे. माझ्या दासाला मी हाका मारितो तरी तो मला उत्तर देत नाही; मला तोंडाने त्याचे आर्जव करावे लागतात. माझा श्वास माझ्या स्त्रीस अप्रिय वाटतो; माझ्या सहोदारास माझी किळस येते. पोरेसोरे देखील मला तुच्छ लेखितात; मी उठावयास लागलो असता माझी चेष्टा करितात.
माझे सगळे जिवलग मित्र माझा तिटकारा करितात; ज्यांवर मी प्रेम करी ते मजवर उलटले आहेत. माझे मांसचर्म जीर्ण होऊन हाडांना लागले आहे; मी केवळ दातांच्या कातडीनिशी बचावलो आहे. (ईयोब १९:१३-२०)
प्रभु येशूने जे सर्व त्याजकडे आले त्यांना बरे केले. त्याने कोणालाही माघारी घालवून दिले नाही. त्याने एकदाही एखादया आजारी व्यक्तीला असे म्हटले नाही की त्यांनी असा त्रास भोगावा अशी त्यांच्यासाठी देवाची इच्छा आहे. प्रभु येशू आला की पित्याची इच्छा पूर्ण करावी. यावरुन आपण हे समजू शकतो कीसर्वांना आरोग्य देणे ही देवाची इच्छा आहे. नेहमी शत्रू (सैतान) खोटेपणाचा वापर करतो की देवाच्या लेकरांना आजार व रोगाच्या बंधनात ठेवावे.
प्रेषित १०:३८ म्हणते, "नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता."
लक्षात घ्या, प्रेषित १०:३८ म्हणते, "तोसैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला". हे प्रगट करते की आजार हे प्रत्यक्षात काय आहे. ते देवापासून काही आशीर्वाद नाही की आपल्याला काहीतरी शिकवावे. ना ही ती देवापासून शिक्षा आहे. जर परमेश्वर हा आजाराचे स्त्रोत असता, तर मग त्याने त्याच्या पुत्राला पाठविले नसते की आपल्याला आरोग्य दयावे.
आरोग्य हे अगोदरच पूर्ण केलेले कार्य आहे. १ पेत्र २:२४ म्हणते, "त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठीकी, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहा."
मनन करण्यासाठी पवित्र शास्त्राची वचने
निर्गम १५:२६
यशया ५३
स्त्रोत १०३:१-५
४० दिवसांची बायबल वाचन योजना
२ करिंथ ८-१३: गलती १
अंगीकार
[प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा. वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा व प्रत्येक प्रार्थना मुद्दा कमीत कमी एक मिनीट असे करा.]
प्रभु येशू, तूं आलाकी मला जीवन प्राप्त व्हावे आणि ते मला विपुलापणे प्राप्त व्हावे.(योहान १०:१०)
माझे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. देवाचा आत्मा मजमध्ये निवास करतो आणि माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला जीवन देतो. म्हणून आजार, रोग, विकलता, पीडा व संसर्ग यांस माझ्या शरीरात स्थान नाही. येशूच्या नांवात.
ख्रिस्ताने मला नियमशास्त्राच्या शापापासून तारले आहे.
आजाराचा प्रत्येक जंतू व प्रत्येक विषाणू जो ह्या शरीराला स्पर्श करतो तो त्वरित येशूच्या नांवात मरण पावतो.
ह्या शरीराचे प्रत्येक अवयव व प्रत्येक पेशी सिद्धपणे कार्य करतात जे कार्य करण्यासाठी देवाने त्यास निर्माण केले आहे, आणि ह्या शरीरात कोणत्याही बिघाड ला मी प्रतिबंधित करतो, येशूच्या नांवात. (गलती ३:१३; रोम ८:११, उत्पत्ति १:३१; मत्तय १६:१९)
माझ्या अपराधांमुळे येशू घायाळ झाला, माझ्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, मलाशांति देणारी अशी शिक्षा त्यांस झाली; त्यास बसलेल्या फटक्यांनी मला येशूच्या सामर्थ्यी नांवात आरोग्य प्राप्त झाले आहे.
(जेव्हा तुम्ही उल्लेख करता तेव्हा शरीराच्या त्या भागांना स्पर्श करा.)
माझ्या डोक्याच्या केसा मध्ये देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
माझ्याडोळ्यांमध्येदेवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
माझ्याकानांमध्ये देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
माझ्यानाका मध्ये देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
माझ्यामुखामध्ये देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
माझे दांत व हिरड्यांमध्ये देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशींमध्ये देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
माझ्या शरीराच्या रक्ता मध्ये देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
माझ्या शरीराच्या हाडांमध्ये देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
माझ्या शरीराच्या त्वचे मध्ये देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवांमध्ये देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
माझ्या शरीराच्या प्रत्येक नसा, मज्जातंतू व रक्तवाहिन्यांमध्ये देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
(जर तुम्हाला कोणताहीआजार आहे, तर तुमचा हाथ शरीराच्या त्या भागावर ठेवा, व पुढील गोष्ट बोला.)
माझ्या(त्या शरीराचे भागाचे नाव घ्या)देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
(तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांची नावे घ्या)देवाचे जीवन येशूच्या नावात मी बोलतो.
(पुढील प्रार्थना अस्त्र तुम्ही म्हणत असताना एक हाथ तुमच्या छातीवर ठेवा.)
१. माझ्या शरीरातून प्रत्येक विषारी द्रव्य अग्निद्वारे येशूच्या नांवात काढून टाकले जावो.
२. माझ्या जीवनातून प्रत्येक सैतानी रोपटे हे येशूच्या नांवात उपटून काढले जावो.
३. माझ्या जीवनात पेरलेले प्रत्येक दुष्ट बी हे येशूच्या नांवात उपटून काढले जावो.
४. माझे जीवन व शरीरातून प्रत्येक सैतानी ठेव येशूच्या नांवात व येशूच्या रक्ता द्वारे धुऊन काढली जावो.
५. पित्या, येशूच्या नांवात, प्रत्येकव्यक्ति जो ह्या २१ दिवस
प्रार्थना कार्यक्रमाचा हिस्सा आहे त्यांच्या जीवनात देवाचे जीवन मी बोलतो. हे परमेश्वरा, त्यांना आरोग्य दे. (यावर काही वेळ घालवा.)
जर तुमच्या कुटुंबात कोणीही आजारी आहे, त्याला किंवा तिला तेलाने अभिषेक करा व वरील प्रार्थना अस्त्र वापरून त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
परमेश्वराचीस्तुति व उपासना करीत काही चांगला वेळ घालवा.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पारख उलट न्याय● अपराध-मुक्त जीवन जगणे
● अनुकरण करा
● मुळा बद्दल विचार करणे
● केवळ इतरत्र धावू नका
● पवित्रतेचे दुहेरी पैलू
● जगण्याचे चिन्ह (पद्धत)
टिप्पण्या