डेली मन्ना
दिवस ०१: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Monday, 11th of December 2023
58
37
1059
Categories :
उपास व प्रार्थना
“हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे; माझे ओठ तुझे स्तवन करतील.” (स्तोत्र. ६३: १-३)
तुम्ही येशूचे अनुसरण करण्यास गंभीर आहात का?
तो “नेहमी एकटा निघून जायचा....आणि प्रार्थना करायचा” (लूक. ५:१६), आणि “तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता” (मत्तय. १४:२३). याकोब, जो फसवणारा, “इस्राएल, “देवाबरोबर राजकुमार” झाला? (उत्पत्ती ३२:२८ वाचा). बायबल म्हणते, “याकोब एकटाच मागे राहिला, तेव्हा कोणी पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली” (उत्पत्ती ३२:२४).
ज्याप्रमाणे एखादे वैवाहिक जीवन खालावत जाते जर पती किंवा पत्नी हे एकत्र कधीही एकाकी नसतात, त्याप्रमाणेच ख्रिस्ताबरोबरचे आपले नातेसंबंध कमकुवत होत जाते जर आपल्या आध्यात्मिक जीवनात त्याच्याबरोबर एकांतात घालवलेल्या वेळेचा अभाव येतो. आजच्या व्यत्ययांच्या काळात, देवासोबत घालवण्यासाठी वेळ काढणे हे महत्वाचे प्राधान्य होते.
देवासोबत एकटे कसे राहावे:
१. प्रार्थनेसाठी विशेष वेळ निश्चित करून ठेवा.
दिवसातून तीन वेळा प्रार्थना करण्याची दानीएलास सवय झालेली होती. “ह्या फर्मानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला.” (दानीएल ६:१०)
या उपासाच्या कालावधी दरम्यान, याची खात्री करा की देवासोबत प्रार्थना आणि संगतीमध्ये तुम्ही चांगला वेळ घालवावा. यिर्मयाने लिहिले, “तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकांती बसलो.” (यिर्मया १५:१७)
२. उपासना आणि स्तुती
आपल्याला देवाच्या सान्निध्यात धन्यवाद आणि स्तुतीसह प्रवेश करण्यास प्रोत्साहन दिले आहे. “त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा.” (स्तोत्र. १००:४)
उपासनेत, आपण देवाचे सार्वभौमत्व आणि चांगुलपणा मान्य करतो, आपल्या अंत:करणांना आपल्या परिस्थितीवरही उत्साहित करतो. स्तुती आपले लक्ष्य आपल्या गरजांपेक्षा देवाच्या महानतेकडे वळवते, ते आपल्या उपास आणि प्रार्थनेच्या कालावधी दरम्यान देखील विश्वास आणि कृतज्ञतेची भावना वाढवते.
३. आध्यात्मिक प्रार्थना करणे
प्रार्थना करण्याचे येथे दोन प्रकार आहेत:
१.मानसिक प्रार्थना करणे आणि
२.आध्यात्मिक प्रार्थना करणे
मानसिक प्रार्थना ही जेव्हा तुम्ही तुमची समज आणि मनाने प्रार्थना करीत आहात, तर आध्यात्मिक प्रार्थना ही जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करीत आहात. “कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार; मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. (१ करिंथ. १४:१४-१५)
आध्यात्मिक प्रार्थना करणे हे आपल्याला आपल्या बुद्धीमत्तेच्या मर्यादेपलीकडे देवाशी जुळू देते, जे उपासादरम्यान गहन आध्यात्मिक घनिष्ठता वाढवते.
४. वचनाचा अभ्यास करा आणि संशोधन करा:
जेव्हा तुम्ही वचन वाचता, तेव्हा तुम्ही देवासोबत थेट संबंधात आहात. वचन हे देव आहे, आणि देवाचे वचन वाचण्याचा अनुभव हा देवासोबत व्यक्तीशः संवाद करण्याप्रमाणे आहे.
आपल्या स्वतःला वचनात गढून घेणे हे केवळ देवासोबत आपल्या विचारांना एकरूप करणे नाही परंतु ते आपल्याला आध्यात्मिकरित्या देखील सुसज्ज आणि बलशाली करते. उपास आणि प्रार्थनेच्या वेळी, असे होवो की वचन हे तुमचे पोषण आणि मार्गदर्शक होवो, तुमच्या मार्गाला प्रज्वलित करो आणि तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला समृद्ध करो.
देवासोबत एकटे राहण्याचे लाभ:
१. रहस्ये ही प्रकट केली जातील:
देव सर्व-ज्ञानी आणि सर्व-जाणणारा आहे. तुम्ही त्याच्यासोबत केवळ वेळ घालवून अज्ञानी राहू शकत नाही. “तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करतो; अंधारात काय आहे हे त्याला ठाऊक असते; त्याच्याजवळ प्रकाश वसतो.” (दानीएल २:२२)
२. तुम्हांला सशक्त केले जाईल:
जेव्हा तुम्ही देवासोबत एकटे वेळ घालवता, तेव्हा तुम्ही केवळ शारीरिक शक्तीचे नुतनीकरण प्राप्त करत नाहीत परंतु आध्यात्मिक पुन्हा भरणे आणि पुन्हा ताजेतवाने होण्याचा आनंद देखील अनुभवता. यशया ४०:३१ म्हणते, “तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.”
स्तोत्र. 68:३५ नुसार, “तुझ्या पवित्रस्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे; इस्राएलाचा देव आपल्या लोकांना बल व सामर्थ्य देतो. देव धन्यवादीत असो.
३. तुम्ही पवित्र आत्म्याने भरून जाल.
“द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा” (इफिस. ५:१८). जेव्हा तुम्ही देवाच्या आत्म्याने भरून जाता, तेव्हा तुमचे जीवन पवित्र आत्म्याच्या गहनतेने प्रभावित होऊन जाईल.
४. देवासोबतच्या तुमच्या वेळेदरम्यान तुमचा अभिषेक सैतानी ओझ्याला मोडेल.
“त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल’ आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल.” (यशया १०:२७)
५. देवाच्या प्रतिमेत तुमचे रुपांतर करण्यात येईल.
परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत, आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रुपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.” (२ करिंथ. ३:१८)
देवाला तुमचे संपूर्ण हृदय तसेच तुमचा चांगला वेळ द्या. देवासोबत गहन नातेसंबंधात जाण्यासाठी ह्या दोन मुख्य अटी आहेत.

प्रार्थना
तुमच्या अंत:करणापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार म्हणा, त्यास वैयक्तिक करा आणि कमीत कमी १ मिनिटासाठी तसे प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी करा.)
१. “हे देवा, पापाने जे मला तुजपासून दूर केले आहे त्या प्रत्येक मार्गाने मजवर दया कर. (स्तोत्र. ५१:१०)
२. देवासोबतच्या माझ्या नातेसंबंधास पापाचा प्रत्येक भार जो प्रभावित करीत आहे त्यास मी येशूच्या नावाने ओढून काढतो. (इब्री. १२:१)
३. मी माझ्या मनात असलेल्या चुका, खोटेपणा, शंका आणि भीती येशूच्या नावाने काढून टाकतो. (२ करिंथ. १०:३-४)
४. पित्या! तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी येशूच्या नावाने मी पहाव्यात म्हणून माझे नेत्र उघड. (स्तोत्र. ११९:१८)
५. माझ्या स्वर्गीय पित्यासोबत नातेसंबंध पुनर्स्थापित होण्यासाठी मी येशूच्या नावाने कृपा प्राप्त केली आहे. (याकोब ४:६)
६. हे परमेश्वरा! माझ्या आत्मिक मनुष्यास सक्षम कर. (प्रेषित. १:८)
७. जे काही माझ्या आध्यात्मिक शक्तीला कमी करत आहे ते येशूच्या नावाने नष्ट होवो. (योहान. १०:१०)
८. देवाच्या गोष्टींपासून मला दूर नेण्यास रचलेल्या श्रीमंतीच्या प्रत्येक फसवणुकीला मी ओढून काढत आहे. (१ तीमथ्य. ६:१०)
९. पित्या, तुझी प्रीती आणि तुझ्या ज्ञानात वाढावे म्हणून येशूच्या नावाने मला प्रवृत्त कर. (२ पेत्र. ३:१८)
१०. परमेश्वरा, मला तुझ्याबरोबर आणि मनुष्यांबरोबर शहाणपण, प्रतिष्ठा आणि पसंतीमध्ये वाढण्यास येशूच्या नावाने प्रवृत्त कर. (लूक. २:५२)
११. परमेश्वरा, सर्व आव्हानांवर मात करण्यास आणि तुझ्या अभिवचनांवर दृढ राहण्यासाठी माझ्या विश्वासाला मजबूत कर. (२ तीमथ्य. ४:७)
१२. पित्या, तुझी शांती, जी सर्व समजेपलीकडील आहे, तिने ख्रिस्त येशूमध्ये माझ्या मनाचे आणि हृदयाचे सरंक्षण करू दे. (फिलिप्पै. ४:७)
Join our WhatsApp Channel
Most Read
● ईश्वरीय शिस्तबद्धतेचे स्वरूप-२● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-२
● मध्यस्थी वर एक भविष्यात्मक शिकवण १
● वातावरणावर महत्वाची समज - २
● आपल्या तारणाऱ्याची विनाअट प्रीति
● २१ दिवस उपवासः दिवस ०४
● विश्वासाने चालणे
टिप्पण्या