कोणीतरी म्हटले आहे, "तुम्हाला पेट्रोल ची आवश्यकता नाही की घर जाळून टाकावे, तुम्हाला केवळ शब्दाची गरज आहे."
हेकिती खरे आहे! शब्द हे संबंध बनवू शकतात आणि नष्ट करू शकतात. शब्द हे सामर्थ्यशाली आहेत जेव्हा ते संबंधाच्या संदर्भात पाहतात. शब्दात स्वस्थता आणि पुनर्स्थापना आणण्याचे सामर्थ्य आहे आणिउलट अर्थाने, शब्दाकडेकापणे आणि जखमा करण्याचे सामर्थ्य आहे.
सत्याची वाणी किती जोरदार असते! (ईयोब ६: २५)
अनेक वेळेला,लोकांना मी हे म्हणताना ऐकले आहे, माझ्या हृदयात काही नाही. मला त्या क्षणाला जे म्हणावयास वाटले ते मी म्हटले, आणि मी ते केले. वरवर पाहिले तर, हे अगदी बरे वाटते, आणि नाटकीय वाटते परंतु प्रत्यक्षात,ते अधिक पीडा आणि जखमा देऊ शकते ज्यास बराच वेळ लागू शकतो कीते स्वस्थ व्हावे. जरी बायबल आपल्याला आदेश देते की सत्य बोला, आपण सत्य हे प्रीतीने बोलण्यास शिकले पाहिजे. असे करून आपण अधिक आणि अधिक ख्रिस्ता समान होतो. (इफिस ४: १५)
अनेक वेळेला, जे आपल्या अगदी जवळ आहेत त्यांच्याबरोबर अपमानजनकरित्या वागतो. आपण त्यांना सहजपणे घेतो आणि त्यांना नित्याचेच आहे असे समजतो. आपण त्यांना नावाने बोलतो, सामान्य आचरण की तुमचे आभारी आहो असे म्हणत नाही वगैरे. अनेक हे अनोळखी लोकांसोबत सहज मिसळून जातात परंतु त्यांच्या स्वतःच्या लोकांसोबत कधी सहज मिसळत नाहीत. जर असे तुम्ही आहात, तर तुम्हाला तुमच्या रोजच्या संभाषणात वापरणाऱ्या शब्दांची काळजी घेण्याची गरज आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमचे जवळचे संबंधी हे किती जवळ येऊ लागतात जेव्हा तुम्ही तुमच्या प्रशंसे मध्ये अधिक आणि अधिक उदार होता आणि तुमच्या अपमानजनक आणि चेष्टात्मक बोलण्यात कंजूश होता. उदाहरणार्थ, तुमची पत्नी किंवा आई ने चांगले भोजन तयार केले आहे, उदारपणे त्यांची प्रशंसा करा. जर कोणी घरी, किंवा कार्यालयात जरी लहानशी कृपा केली, त्यांना हे कळू दया तुम्ही त्याची किती प्रशंसा करीत आहात.
लक्षात ठेवा, प्रोत्साहन देणारे शब्द व्यक्तीला संबंधात अधिक दृढ करतात आणिप्रामाणिक प्रशंसा व्यक्तीला समर्थ करते.
अनेक लेकरे त्यांच्या आई-वडिलांना भिऊन असताना तरुण होतात, ज्यांनी त्याना कधीही शारीरिकपणे ताडना दिली नसते, परंतु त्यांनी कटू, क्रोधीत आणि निष्काळजीपणे शब्द वापरण्या द्वारे त्यांना पिडीत करण्याचेकधीही सोडलेले नसते.
कधीही हे विसरू नका की ख्रिस्ती जीवन हे ख्रिस्ती ओठांद्वारे प्रसारित होते. तुम्ही कसे बोलता याकडे लक्ष दया. तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठीकी, तेणेकडूनऐकणाऱ्यांनाकृपादान प्राप्त व्हावे. सर्व प्रकारचे, कडुपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हांपासून दूर करण्यात येवोत. (इफिस ४: २९, ३१).
प्रार्थना
पित्या, माझे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे मी समजावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आपल्यामध्येच खजिना● कृपेवर कृपा
● वचनाचा प्रभाव
● बायबल प्रभावीपणे कसे वाचावे
● हुशारीने कार्य करा
● परमेश्वर पुरवठा करेल
● दिवस ०६: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या