डेली मन्ना
तुम्ही किती मोठ्याने बोलू शकता?
Friday, 19th of July 2024
29
19
487
Categories :
वचन कबूल करणे
मी एकदा दोन वजनदार बाँक्सरची सामान्यापुर्वीची त्यांची मुलाखत पाहीली?
जशी बऱ्याच महत्वाच्या सामान्यामध्ये होते, ते त्यांच्या विजयाबद्दल हजारो लोकांसमोर धाडसाने बोलत होते. खरे पाहता, तुम्ही जवळजवळ आश्चर्यचकीत झाला असता त्यांचे बोलणे ऐकून कि नक्की कोण जिंकेल.
त्यांचे शब्द तीव्र आणि कठोर होते. बॉक्सिंग रिंगमध्ये प्रवेश करण्यापूर्वी किंवा पहिला धक्का देण्यापूर्वीच प्रत्येक विधान आत्मविश्वासाने चमकत होते. मला आश्चर्य वाटत होते कि त्यांच्या मनात काय चालले असेल जसे ते जगभरातील कोट्यावधी लोक पहात असलेल्या कॅमेऱ्यासमोर ते बोलत असताना हा बॉक्सिंगचा लढा कोण जिंकणार?
ते इतक्या मोठ्याने आणि आत्मविश्वासाने का बोलले हे तुम्हाला माहिती आहे काय? त्या प्रत्येकाचा असा विश्वास होता की विजय त्याचा आहे, म्हणून त्यांनी ते धैर्याने आणि मोठ्याने बोलले. आपण बर्याच वेळा, एखाद्या गोष्टीबद्दल किंवा विशिष्ट परिणामासाठी आम्हाला देवावर विश्वास ठेवण्यास शिकविले आहे, परंतु आपण जे विश्वास ठेवतो त्यावर जोरात बोलायला शिकलो नाही.
बायबल म्हणते, “कारण जो अंत:करणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. (रोमकरांस १०:१०)
ते म्हणजे काय तुम्हाला माहीती आहे काय, फक्त आपल्या अंत: करणात विश्वास ठेवून तारण येत नाही; तुम्हाला कबुल करून धैर्याने आणि मोठ्याने बोलले पाहिजे सर्व ऐकण्याच्या पुर्वी. प्रेषित पौल २रे करिंथकरास पत्र 4:13 मध्ये म्हणतो, “मी विश्वास धरला म्हणून बोललो,’ ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही.
मित्रांनो, तुमच्या आरोग्याबद्दल तुमचा काय विचार आहे? तुमच्या आर्थिक, वैवाहीक, तुमच्या शैक्षणिक किंवा तुमच्या जोडीदाराविषयी काय विश्वास ठेवता? येशू तुम्हाला बरे करू शकतो असा तुमचा विश्वास आहे का? तुमची पत्नी अधिक चांगल्या प्रकारे बदलेल असा तुमचा विश्वास आहे का? तुमचा विश्वास आहे का तुमचे मूल व्यसनापासून मुक्त होईल? तुमचा विश्वास आहे की तुम्ही त्या कर्जावर विजय मिळवाल? तुम्हाला खात्री आहे का कि तुम्हाला पुर्नस्थापित केले जाईल? जर तुम्ही तसे करत असाल तर ते मोठ्याने आणि धैर्याने बोला. पौल म्हणाला, “आम्ही विश्वास ठेवतो आणि म्हणून बोलतो.
तुम्ही काय पहात आहात याकडे लक्ष देऊ नका. ती बातमी पाहून हार मानू नका.फक्त विश्वासाने तुम्ही जे बोलता त्यावर भरवसा ठेवा. तुम्ही काय पाहू इच्छित आहात हे सांगत रहा, जे तुम्हाला वाटते ते नाही. . बायबल म्हणते, “मी वीर आहे” असे अशक्तही म्हणो. (योएल ३:१०). जरी तो अशक्त असला तरी त्याने हे सिद्ध करावे की तो सामर्थ्यवान आहे, आणि मग त्याचे सामर्थ्य प्रगट होण्यास सुरवात होईल. आजच तुमची नेमुन दिलेले काम करा. तुम्हाला काय पहायचे आहे लोंकाची थट्टा होत असतांनाही धैर्याने घोषीत करा आणि तुम्ही ते पहाल.
प्रार्थना
हे पित्या, मी आज तुझ्या वचनाबद्दल धन्यवाद देतो. मी माझ्या आयुष्यावरील तुझ्या अभिवचनांबद्दल निर्भयपणे बोलण्यासाठी धैर्याच्या भावनेने प्रार्थना करतो. येशूच्या नावाने. आमेन
Join our WhatsApp Channel
Most Read
● चांगले हे उत्तमतेचे शत्रू आहे● दिवस १४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दिवस १७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● अनुकरण करा
● तुमचा संघर्ष तुमची ओळख होऊ देऊ नका -२
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -६
● शत्रूला तुमच्या परिवर्तनाची भीति वाटते
टिप्पण्या