डेली मन्ना
अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
Thursday, 15th of August 2024
19
15
306
Categories :
Deliverance
Pornography
मोहाने भरलेल्या जगात, एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे अश्लील चित्रे पाहण्याच्या मोहात पाडणे खूपच सोपे आहे –एक विनाशकारी शक्ती जी मानवी हृदयाच्या असुरक्षिततेवर घाला घालते. नुकतेच, मला एका तरुण मुलाकडून एक ईमेल आला ज्याने याबाबतीत संघर्ष करणारा आणि शेवटी या व्यसनावर मात करणारा त्याचा प्रवास मला सांगितला.
त्याने लिहिले, “मला तरुण वयातच एक मित्राने या अश्लील चित्रे पाहण्यास परिचित केले ज्याच्या वडिलांकडे काही मासिके होती आणि फार जलद मी त्याच्या व्यसनी लागलो. त्याने तर माझ्यावर पगडा घातला. मी हायस्कूलमध्ये असताना, वासनेचा संघर्ष माझ्यावर पूर्णपणे ताबा घेऊ लागला होता. पास्टर मायकल, मी तुमच्याबरोबर २१दिवसांच्या उपासात सामील झालो, आणि तेव्हापासून, मी या वाईटापासून मुक्त झालेलो आहे. या तरुण माणसाचा अश्लील चित्रे पाहण्यावर विजय मिळवणे हे केवळ त्याच्या स्वतःचे नव्हते; तो देवाच्या राज्यासाठी विजय होता आणि असंख्य इतरांसाठी प्रेरणा होती जे शांतपणे त्याशी संघर्ष करीत आहेत.
अश्लील चित्रे पाहण्याची मरी
अश्लील चित्रे पाहणे हे वैयक्तिक दुर्गुणपेक्षा अधिक आहे; ही एक मरी आहे जी व्यक्तीसाठी लैंगिक पापांमध्ये व्यस्त होण्यासाठी मार्ग उघडा करते. अश्लील चित्रे पाहण्याचा संपूर्ण उद्देश हा वासना उत्तेजित करणे आणि भडकावणे आहे, जे व्यक्तीला विनाशाच्या मार्गावर नेते. २ शमुवेल ११:२-४ मधील दावीद आणि बथशेबा यांची कथा पवित्र शास्त्रातील एक उदाहरण म्हणून काम करते की अनियंत्रित वासनेचे विनाशकारी परिणाम कसे होतात. दाविदाचे सुरुवातीची नजर टाकणे व्यभिचार आणि खून करण्याकडे नेले, जे एकाच पापी इच्छेचे दूरगामी परिणाम दाखवते.
वैवाहिक जीवनाचा आणि कुटुंबांचा नाश
अश्लील चित्रे पाहण्याचा एक सर्वात हृदयविदारक पैलू हा त्याचा वैवाहिक जीवन आणि कुटुंबावरील विनाशकारक परिणाम आहे. अश्लील चित्रे पाहण्यामुळे लाखो वैवाहिक जीवने उध्वस्त झाली आहेत असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. ते अवास्तविक अपेक्षा निर्माण करते, विश्वास काढून टाकते, आणि भावनात्मक आणि शारीरिक अशा दोन्हीही व्यभिचाराकडे सतत नेते. अश्लील चित्रे पाहण्याच्या आहारी गेलेला व्यक्ती एकाकी, रहस्यमय, आणि भावनात्मकदृष्ट्या अनुपलब्ध होतो, जे जोडीदारांमध्ये आडभिंत निर्माण करते, आणि शेवटी कुटुंबाला पूर्णपणे उध्वस्त करून टाकते.
ईयोब ३१:१ शक्तिशाली घोषणा प्रदान करते जे त्यांच्यासाठी मार्गदर्शन म्हणून काम करू शकते जे त्यांच्या हृदयाला आणि मनाला अश्लील चित्रे पाहण्याच्या मोहापासून संरक्षण देण्यास पाहतात. “मी तर आपल्या डोळ्याशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” ईयोबाचे शुद्धतेसाठी कटिबद्ध असणे हे केवळ शारीरिक कृत्य नव्हते, परंतु आध्यात्मिक आणि मानसिक देखील होते. आपल्या डोळ्याशी करार करणे हे या जगाच्या मोहाच्या विरोधात आपल्या अंत:करणाचे संरक्षण करण्यासाठी सक्रीय पाऊल उचलणे आहे.
कृत्य करण्यासाठी पाचारण ; ख्रिस्तामध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे
जर तुम्ही स्वतः किंवा तुम्हांला माहित असलेला कोणीतरी जो अश्लील चित्रे पाहण्यात संघर्ष करीत आहे, तर येथे आशा आहे हे समजा. ख्रिस्ताच्या शक्तीद्वारे या बंधनातून स्वतंत्रता शक्य आहे. तरुण माणूस ज्याने त्याची साक्ष सांगितली त्याने माझ्यासोबत २१ दिवसांच्या उपासात सामील होऊन स्वतंत्रता प्राप्त केली. उपासासह प्रार्थना आणि देवाचे वचन वाचणे, हे एक शक्तिशाली साधन आहे जे अगदी सर्वात जखडून टाकणाऱ्या सवयींपासून देखील सुटका आणू शकते.
याकोब ५:१६ आपल्याला प्रोत्साहन देते, “तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना करण्यात फार प्रबळ असते. अभिषिक्त पुरुष आणि महिलेकडून प्रार्थना करून घेण्यासाठी घाबरू नका. [फक्त काही व्यवहारिक सल्ला : पुरुषांसाठी पुरुषाने प्रार्थना करावी आणि महिलेसाठी महिलेने प्रार्थना करावी.]
याशिवाय, स्वतः देवाच्या वचनात रुची घ्या. वचन जसे फिलिप्पै. ४:८, जे आपल्याला आग्रह करते की त्या गोष्टींवर विचार करावा जे सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, प्रशंसनीय, श्रवणीय, सदगुण, स्तुती बद्दल आहे, जे आपल्या मनाला पुन्हा घडवण्यात आणि हानिकारक विचार आणि वागणुकीपासून आपल्याला दूर ठेवतात.
स्वातंत्र्याच्या प्रवासाला स्वीकारा
अश्लील चित्रे पाहण्याच्या व्यसनावर मात करणे हा एक सोपा प्रवास नाही, परंतु तो देवाच्या मदतीने शक्य होणारा एक प्रवास आहे. ज्याप्रमाणे त्या तरुण माणसाने स्वतंत्रता प्राप्त केली, त्याप्रमाणेच तुम्ही देखील प्राप्त करू शकता. स्वतंत्रता जिचा तुम्ही शोध घेत आहात ते आवाक्यात आहे, आणि त्यादृष्टीकोनात तुमचा प्रवास इतरांना ख्रिस्तामध्ये तेच स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो. परमेश्वर तुम्हांला शक्ती देवो आणि या विजयाच्या मार्गावर तुम्हांला मार्गदर्शन करो.
प्रार्थना
१. पित्या, येशूच्या नावाने, माझ्या अंत:करणाला आणि मनाला प्रत्येक अशुद्ध विचार आणि इच्छेपासून तू स्वच्छ करावे अशी मी तुला विनंती करतो. ज्या गोष्टी सत्य, आदरणीय, न्याय्य आहेत त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मला मदत कर, म्हणजे मी तुझ्या समोर पवित्रतेत चालावे. मी घोषित करतो की माझे मन वरील गोष्टींवर स्थित आहे, आणि पृथ्वीवरील मोहांवर नाही. (फिलिप्पै. ४:८)
२. पवित्र आत्म्या, माझ्या आत्म्याला संजीवित कर, आणि मला तुझ्या शक्तीने भर. माझ्या शरीराच्या इच्छा वधस्तंभावर खिळल्या जावोत, आणि माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूंमध्ये मी तुझ्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित व्हावे. मी माझी इच्छा तुला समर्पित करतो आणि आतून संपूर्ण परिवर्तनासाठी मागणी करत आहे. येशूच्या नावाने. (गलती. ५:१६)
३.स्वर्गीय पित्या, त्या भागांमध्ये मी तुझ्या स्वस्थतेसाठी मागणी करत आहे जेथे अश्लील चित्रे पाहण्याने माझ्या आत्म्याला आणि नातेसंबधाला जखमी केले आहे. जे तुटलेले आहे ते पुनःस्थापित कर आणि माझे मन, हृदय आणि नातेसंबंधाला स्वस्थता आण. सर्व गोष्टी नवीन करण्याच्या तुझ्या सक्षमतेवर मी भरवसा करतो. येशूच्या नावाने. (स्तोत्रसंहिता १४७:३)
४. पित्या, येशूच्या नावाने, अश्लील चित्रे पाहण्याच्या पापामध्ये पुन्हा ओढून घेण्याच्या शत्रूच्या योजनांच्या विरोधात मी तुझ्या दैवी संरक्षणासाठी प्रार्थना करत आहे. मी देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करत आहे, अंधाराच्या शक्तींच्या विरोधात ठामपणे उभा राहत आहे आणि आणि माझ्या जीवनातील प्रत्येक बालेकिल्ल्यावर आणि व्यसनांवर येशूच्या नावाने विजयाची घोषणा करीत आहे. (इफिस. ६:११-१२)
२. पवित्र आत्म्या, माझ्या आत्म्याला संजीवित कर, आणि मला तुझ्या शक्तीने भर. माझ्या शरीराच्या इच्छा वधस्तंभावर खिळल्या जावोत, आणि माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूंमध्ये मी तुझ्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित व्हावे. मी माझी इच्छा तुला समर्पित करतो आणि आतून संपूर्ण परिवर्तनासाठी मागणी करत आहे. येशूच्या नावाने. (गलती. ५:१६)
३.स्वर्गीय पित्या, त्या भागांमध्ये मी तुझ्या स्वस्थतेसाठी मागणी करत आहे जेथे अश्लील चित्रे पाहण्याने माझ्या आत्म्याला आणि नातेसंबधाला जखमी केले आहे. जे तुटलेले आहे ते पुनःस्थापित कर आणि माझे मन, हृदय आणि नातेसंबंधाला स्वस्थता आण. सर्व गोष्टी नवीन करण्याच्या तुझ्या सक्षमतेवर मी भरवसा करतो. येशूच्या नावाने. (स्तोत्रसंहिता १४७:३)
४. पित्या, येशूच्या नावाने, अश्लील चित्रे पाहण्याच्या पापामध्ये पुन्हा ओढून घेण्याच्या शत्रूच्या योजनांच्या विरोधात मी तुझ्या दैवी संरक्षणासाठी प्रार्थना करत आहे. मी देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करत आहे, अंधाराच्या शक्तींच्या विरोधात ठामपणे उभा राहत आहे आणि आणि माझ्या जीवनातील प्रत्येक बालेकिल्ल्यावर आणि व्यसनांवर येशूच्या नावाने विजयाची घोषणा करीत आहे. (इफिस. ६:११-१२)
Join our WhatsApp Channel
Most Read
● संबंधामध्ये आदराचा नियम● येशूने गाढवावर स्वारी का केली?
● चिंता करीत वाट पाहणे
● पुढच्या स्तरावर जाणे
● सात-पदरी आशीर्वाद
● परमेश्वर वेगळ्या प्रकारे पाहतो
● दिवस २१ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या